ओढ…!

कधी कधी विश्वासच बसत नाही,बघता बघता दोन वर्षे झाली आमच्या लग्नाला दोन वर्षे कशी भूर्रकण उडूण गेली कळालच नाही .लग्न करुन आले तेव्हा या घरात मी माझे अहो, सासूबाई ,सासरे आणि नणंद एवढं कुटुंब होतं मागच्याच वर्षी नणंदेच लग्न झालं,

तसा सासूबाईंचा स्वभाव फार लोभस असल्याने सतत पाहुणे असतात घरी त्यामुळे दिवस कसा निघुण जायचा कळायचेच नाही,पण या सगळ्यांना खुष ठेवण्याच्या नादात माझं अहों कडे माञ नकळत दुर्लक्ष होत चाललं होतं.

एकमेकांसाठी वेळच नसायचा आम्हाला सकाळी त्यांची कामाला जायची घाई आणि माझी त्यांना नाश्ता जेवण देण्याची घाई दोन मिनिटं त्यांच्या सोबत निवांत बसूण चहा प्यावा असं नेहमी वाटायचं,पण वेळचं नसायचा,

एका घरात राहूण ही अनोळखी असल्यासारखे रहायचो आम्ही. संध्याकाळी ही त्यांना घरी यायला उशिर होत असे काम खूप असल्याने त्यांचा कंटाळा मला जाणवायचा.सुट्टीच्या दिवशीहि कुठे जायचं म्हणलं तर कोणी ना कोणी पाहुणे असायचेच घरी.

Loading...

आजकाल तर काय एकमेकांना पहायचेही बहाणे करु लागलो होतो आम्ही. कधी टाँवेलचा बहाणा, कधी किचन मधे पाणी पिण्याचा बहाणा,कधी मांडणी वरचा डबा काढण्याचा बहाणा,कधी मोजे, कधी रूमाल समोरासमोर असुणहि चोरट्यां सारखं भेटावं लागत असे.

पण खरं सांगू त्याच्यातही एक वेगळीच गंम्मत असायची एकमेकांच्या सहवासासाठी नुसती तगमग व्हायची आमची .शेवटी एक दिवस न राहुण त्यांनी नजरेणे मला खुणवलं. मी हि माझी कामे पटापट आवरुण जाण्याचा प्रयत्न केला,

Loading...

पण नेमक त्याच दिवशी सासूबाईंचे पाय खूप दुखतं होते,इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती माझी.शेवटी सासूबाईंचे पाय चेपून जाण्याचा निर्णय घेतला.जरा वेळाने न राहुन ते मला शोधत सासूबाईंच्या खोलीत आले.

मी काय करत आहे बघुण गुपचुप आमच्या खोलीकडे गेले.त्यावेळी राञीचे साडेबारा वाजले होते,इतर वेळी महाशय बारालाच झोपयचे पण त्यादिवशी त्यांची पुन्हा एक चक्कर झाली सासूबाईंच्या खोलीची.मी त्यांचे पाय चेपत अक्षरश: पेंगत होती,मला इतकी थकलेली बघुण ते काहीच न बोलता आमच्या खोलीत जाऊण झोपले.शेवटी सासूबाईच बोलल्या बास कर आता जाऊण झोप खूप उशीर झाला आहे राहिलेत आता पाय माझे.

मी ही पटकन उठले सासूबाईंच्या अंगावर चादर दिली आणि आमच्या खोलीत आले ,पहाते तर काय महाशय लाईट घालवुण झोपलेही होते. मलाच वाईट वाटले मग मी त्यांचा जवळ गेले त्यांच्या डोक्यातून हात फिरवला आणि त्यांना विचारलं अहो झोपलात?त्यांनी फक्त हं…

असं उत्तर दिलं मी समजुन गेले साहेब प्रचंड रागवले आहेत.मी ही काहीच न बोलता झोपुन गेले.. आईने सांगितल होतं नव-याच्या ह्रुदयाचा मार्ग त्यांच्या पोटाकडुण जातो ,म्हणुन सकाळी लवकर उठुण त्यांच्या आवडीचा नाश्ता आणि जेवण बणवलं.

त्यांना उठल्या उठल्या चहा लागतो म्हणुन काम बाजुला ठेऊण आधी चहा घेऊण गेले, पण मी जाण्याआधिच ते उठूण आंघोळीला गेले होते.त्यांच्या रागाचा अंदाज घेण्यासाठी मी मूद्दामच बाहेरुण आवाज दिला

“अहो चहा नाही घेतलात”? त्यांनी नको आहे मला असं रागातच उत्तर दिलं.मी हिरमुसून पुन्हा किचन मधे आली त्यांना राग आला आहे,आज चहा ही नाही घेतला,कसा घालवु आता राग काय केलं म्हणजे जाईल? या विचारांनी डोकं भंजाळूण गेलं होतं.

विचार केला नाश्ता देताना माफी मागेण पण सगळे एकञ नाश्ता करायला बसतात तेव्हा तर शक्यच नव्हतं.

पुन्हा विचार केला जेवनाचा डब्बा हातात देताना बोलेन तर नाश्ता करता करताच बोलले डब्बा भरला आहेस का? भरला असशिल तर दे आण उशिर झाला आहे.मी काहिच न बोलता डबा आणून दिला यांनी तो उचलला आणि आई येतो म्हणून घर सोडलं.माझ्याकडे तर बघितलं हि नाही.खुप रागवले होते गालांचा तर काय फुगाच झाला होता.

बिचारे आज पुर्ण दिवस भर याच मनस्थितित काम करणार या विचारानी खूप ञास होत होता. माझाही पुर्ण दिवस याच विचारात गेला.दोघांना एकमेकांसीठी कसलाच वेळ नव्हता.

पुढचे काहि दिवस असेच गेले,काय करावे कुणाला सांगावे काहिच कळेणा जिवाची नुसती घालमेल होत होती… त्यानंतर काही दिवसांनी सासूबाईंच्या बहिणीचा फोन आला त्यांच्या मुलीचे लग्न होते,आम्हाला सगळ्यांना आग्रहाचे निमंञण होते.

राञी जेवताना सासूबाईंनी यांच्याकडे विषय काढला आठ दिवस आधी सुटटी् घे बोलल्या, त्यांनी हो म्हणुन सांगितले. लग्न आठ दिवसांवर आलं आमची सर्वांची निघायची तयारी झाली,संध्याकाळी ते कामावरुण आल्यावर आम्ही निघणार होतो.

तितक्यात यांचा फोन आला त्यांची सुट्टी कँन्सल झाली होती मिळाले तर फक्तदोन दिवस मिळतील तूम्ही सगळे जा मी लग्नाच्या आदल्या दिवशी येईण असे म्हणाले सासूबाईंनी घरात सांगितले, मला म्हणाल्या बॅग मधून त्याचे कपडे काढुण ठेव तो नंतर येईल,

मी हो म्हणुन आत गेली खूप वाटत होतं सासूबाईंना विचाराव कि,मी हि थांबू का?आठ दिवस यांच्या जेवणाचं काय? पण हिम्मतच झाली नाही.थोड्यावेळाणे सासूबाईच आल्या आणि म्हणाल्या असं करा तुम्ही दोघेही राहुद्या आम्ही दोघे पुढे जातो सुटटी्च झालं कि,तुम्ही दोघे या तु हि आलिस तर त्याचे खाण्याचे हाल होतिल गं एकतर त्याला बाहेरचं खाल्यावर ञास होतो.

क्षणभर माझा माझ्याकानांवर विश्वासच बसेना,त्यावेळी मला एवढा आनंद झाली एवढा आनंद झाला कि शब्दांत सांगुच शकत नाही.
गाडीची वेळ झाली सासूबाई आणि सासरे निघाले आता घरात फक्त मिच होते. थोड्यावेळाणे अहो येणार या विचारांनी आता माञ भिती वाटु लागली होती.

भिती,लाज,ओढ,हुरहुर,तगमग,दडपण ,इच्छा या सगळ्या भावनांनी खूप गोंधळ उडाला होता.त्यातून स्वत:ला सावरलं पटापट घर आवरलं आणि लागले तयारीला अहोंना आश्चर्याचा धक्का देण्याच्या.

माझ्या अहोनां कि,नाही अबोली रंग फार आवडतो म्हणून त्याच रंगाची साडी घातली,मनसोक्त आवरुण घेतलं अहोनां माझे केस फार आवडतात आणि त्यात सैलसर वेणी घालुण गजरे लावलेले तर त्याहुन जास्त.आम्हा दोघांनाहि मोग-याच्या फुलांचा वास खुप आवडतो.

केलेल्या श्रुंगारा मधे आता फक्त मोग-याच्या गज-याची कमी होती पण म्हटलं जाऊदे त्यांचा रुसवा काढण्याची संधी मिळत आहे तेच खूप आहे. तितक्यात दारावर बेल वाजली घरात एकटीच असल्याने प्रचंड घाबरले.

छातीत धडधड होऊ लागली लाजेने दरवाजा पर्यंत जाण्याचीहि हिम्मत होईना, शेवटी कसाबसा दरवाजा उघडला मला तशी पाहुण त्यांना खरचं आश्चर्याचा धक्का बसला. ते तिथुनच माझ्याकडे एकटक पहात होते मी त्यांच्या हातातुन बॅग घेतली ते भानावर आले मी त्यांची बॅग जागेवर ठेऊण पाणी आणायला किचनमधे गेले तितक्यात हे माझ्या मागे येऊण उभे राहिले,

खिशातून पानांत गुंडळलेला गजरा काढला आणि माझ्या केसात माळला माझ्या खांदयाला स्पर्श करुन मला वळवलं,माझी तर हिम्मतच होत नव्हती त्यांच्याकडे पहायची शेवटी तेच बोलले ए, अगं वर बघना! ए, वेडाबाई लाजतेस काय अशी? एक सांगु आज तू खूप छान दिसत आहेस.

मी लाजुन माझ्या दोन्ही हाताच्या ओंजळीमधे माझा चेहरा लपवला, त्यांनी मला तशीच उचलुन बेडरुम मध्ये न्हेली.आणि ज्या क्षणांची आम्ही दोघेही आतुरतेने वाट पहात होतो तो क्षण आला आणि ती इतक्या दिवसांची जीवघेणी “ओढ ” आज ख-या अर्थाने संपणार होती..

ओढ अनामिक संपूण गेली
संपूण गेले दूरावे
राञ तूझ्यासव मोहरुण गेली
आयुष्याचे प्रत्येक क्षण ही असेच सरावे……

Please follow and like us:

Leave a Reply