कोहळा

कोहळा हे काकडीच्या जातीतील फळ होय. भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे; पण साधारण दहा-बारा पट मोठे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते, काही काळाने ही लव गळून जाते. कोहळा हिरव्या रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल असतो, पाने खरखरीत असतात, तर फुले पिवळ्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये फुले येतात. ग्रीष्मात फळे धरतात. ही फळे तयार होईपर्यंत शरद-हेमंत ऋतू उजाडतो.

ch053

स्वयंपाक, औषधीकरणात तर कोहळा वापरला जातोच, पण यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्य कता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ औषधी गुणधर्माचे असतात. कोवळा कोहळा खाण्यास निषिद्ध समजला जातो. पूर्ण वाढ झालेला, तयार झालेला कोहळा वापरण्यास योग्य असतो. असा कोहळा वेलावरून काढून घेतल्यावर वर्षभर टिकू शकतो.

Loading...

कोहळ्याला संस्कृत भाषेत कुष्मांड असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो.

3
१. शरीरात उष्णता वाढली की शरीर नाकावाटे किंवा गुदद्वारावाटे रक्तस्त्राव करून हि उष्णता बाहेर टाकते, अशा वेळी कोहळ्याचा चार चमचे रस साखर घालून घेतला कि शरीरातली उष्णता भरपूर कमी होते आणि रक्तस्त्राव थांबतो.
२.वेडसरपणा , भ्रमिष्टपणा , विचित्र बडबड अशी लक्षणे असतील तर कोहळ्याचा रस खडीसाखर मिसळून साधारण तीन आठवडे सकाळ संध्याकाळ घेतल्यास ही लक्षणे वेगाने कमी होतात.
कफातून रक्त पडत असेल तर कोहळ्याचा रस साखरेतून घेतल्यास आराम पडतो.
४. कोहळेपाक बाजारात विकत मिळतो त्याचे काही गुणधर्म पाहूया .
अ) जुनाट ताप असेल आणि त्याने शक्ती क्षीण झाली तर कोहळेपाक दोन दोन चमचे दिवसातून दोनदा खावा …
आ) आम्लपित्ताचा त्रास असेलतर हा पाक जेवणाआधी खावा .
इ) बाळंतपणानंतर होणाऱ्या आजारांत कोहळेपाक अमृताचे काम करतो .
ई) रात्री झोप येत नसेल तर कोहळापाक झोपताना खावा .
फ) डोकेदुखी जास्त असेल कोहळापाक नियमित खावा .
५) पांडुरोग (अनिमिया ) या आजारात कोहळ्याचे सेवन उत्तम .
६) वीर्यशुद्धी आणि वीर्यवृद्धी साठी कोहळ्यापासून तयार केलेला कुष्मांड अवलेह सेवन करावा .
७) फिट्स येणाऱ्या रुग्णांमध्ये दिवसातून दोनदा कोहळ्याचे १० ग्राम वजनाचे ताजे तुकडे खाऊन दुध प्यायला द्यावे … हा उपाय दीर्घकाळ करावा .

Loading...

Please follow and like us:

Leave a Reply