गैरसमज…. 

20476050_321676441626171_79404309309115110_n
ही गोष्ट मी मुंबईत शिफ्ट झालो तेव्हाची आहे.मी मुळचा कर्नाटक चा.लग्नानंतर काही दिवसांनी इकडे शिफ्ट झालो.माझी पत्नी राधीका तिही कर्नाटकचीच पण तिचे बालपण मुंबईतच गेले होते.स्वभावाने फार अहंकारी,तिखट आणि फटकळ अडजेस्ट्मेंट हा शब्द तिच्या रक्तातच नव्हता.तिच्या या स्वभावामुळे तिने कधीही माझ्या घरच्यांना पटवून घेतले नाही.घरात तिच्यामुळे सतत वाद व्हायचे.माझे लग्न झाल्यापासून आमच्या घरचे वातावरण खुप खराब झाले होते.शेवटी वैतागून आईने आम्हाला घरातून निघून जायला सांगीतले.त्यानंतर आम्ही मुंबईला आलोत.राधिकाच्या आईच्या घराजवळच रेंट वर एक घर घेतले.माझे घर,माझा गाव सोडून येताना फार त्रास होत होता मला.पण माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता खुप वाटायचे तिला सोडून द्यावे,पण माझ्या घरात आजवर कोणीही डिव्होर्स घेतलेला नव्हता.म्हणून सगळे निमूटपणे सहण करत राहीलो.आशा होती मुले झाल्यावर मातृत्वाची जाणीव तिला बदलून टाकेल.पण तिला आई होऊण स्वतःची फिगर खराब नाही होऊ द्यायची होती.
मुंबईत आल्यावर मला एका कॉल सेंटरमधे मँनेजर ची नोकरी मिळाली.ऑफीस एकमेव ठिकाण होते माझ्या समाधानाचे.घरी जायची तर इच्छाच व्हायची नाही.दरम्यान ऑफीस मधे इंटरव्ह्यु चालू होते.ऑफीसचा टिमलिडर “निक” त्याचे आणि माझे रिलेशन खुप छान होते.तो माझ्याकडे आला आणि म्हणाला महेश सर माझी एक मैत्रीण इंटरव्ह्यु साठी येत आहे.या आधी तिने कधी कॉल सेंटर मधे जॉब केलेला नाही.प्लिज तिला सिलेक्ट करा.स्ट्रगलर आहे तिला या जॉबची फार गरज आहे.मी त्याला तेव्हाच त्याला सांगीतले होते करेन सिलेक्ट म्हणून. इंटरव्ह्यु फक्त औपचारीकता म्हणून घेणार होतो.थोड्यावेळाने निक पुन्हा आला.आणि म्हणाला सर ती आली पाठवतो तिला.त्यानंतर मी खोट खोट सेट होऊण बसलो,चेह-यावर उगीचच गंभीर भाव आणून इंटरव्ह्यु घेण्याचे नाटक करू लागलो.तितक्यात दरवाजातून एक गोड आवाज आला “मे आय कम इन सर”तिचा आवाज एैकल्या एैकल्या माझी नजर माझ्या मनाला घेऊण तिच्यापाशी जाऊण थांबली.जेवढा तिचा आवाज गोड होता तेवढीच तिही.नाव “गार्गी”कोणाच्याही मनात पटकन बसेल अशी ती.कमनिय बांधा,लांबसडक कमरेच्या खाली पडणारे काळे भोर रेशमी केस,चेहरातर देवाने वेळात वेळ काढून रेखाटल्या सारखा.रेखीव भुवया आणि छान टपोरे डोळे कोणालाही स्वतःकडे खेचून घेतील असे,छोटेसेच पण सरळ नाक,ओठ तर गुलाबांच्या पाकळयांनाही लाजवतील इतके नाजूक आणि गुलाबी,आणि चेह-यावर पडणारी ती बट.बघताच क्षणी काळजात घर केले तिने माझ्या.इंटरव्ह्यु अगदी टाईमपास म्हणून झाला.इंटरव्ह्यु कसला निव्वळ गप्पा होत्या त्या. पहीलाच इंटरव्ह्यु असल्यामूळे थोडी घाबरली होती ती पण, नंतर बोलूण बोलूण नॉर्मल केले मी तिला.इंटरव्ह्युच्या नावा खाली तब्बल पाऊनतास गप्पा मारल्या आम्ही.खरतर निक ने सांगीतले नसते तरीही मी तिला सिलेक्ट केले असते.केवळ दिसायला सुंदर होती म्हणून न्हवे तर ती हुशारही तितकीच होती.अश्याच हुशार मुलीची माझ्या ऑफीसला गरज होती.मी तिला लगेचच दुस-या दिवशी पासूनच ऑफीस जॉईन करायला सांगीतले.दुस-या दिवशी बरोबर दहाला तिला हजर व्हायचे होते.घरी गेल्यावरही रात्र भर मी तिचाच विचार करत होतो. सतत तिचा चेहरा माझ्या डोळयांसमोर येत होता.कधी एकदाचा उद्याचा दिवस येतो असे झाले होते.इतर दिवशी बाराला ऑफीसात जाणारा मी त्यादिवशी 9.50 लाच ऑफीसला हजर झालो.चातका सारखी वाट पहात होतो तिची.10 वाजले तरी ती आली नाही.मला फार अस्वस्थ वाटू लागले.शेवटी न राहून मी तिला 10.02 ला कॉल केला.आणि तिला विचारले 10 ला हजर व्हायचे होते तुम्हाला पण तुम्ही अजून पोहोचला नाहीत.त्यावर ती म्हणाली सॉरी सर मला इकडच्या लोकलच्या वेळा अजून नीट माहीत नाहीत त्यामुळे लेट झाले.ऑफीसच्या खालीच आहे 2 मिनीटात पोहोचते.तितक्यात वा-याच्या झुळूके सोबत एक छान सुगंध आला तो सुगंध तिच्या परफ्यूमचा होता.काल पासून त्या वासाने मला वेड लावले होते.त्यानंतर सुरू झाली ट्रेनिंग तिच्या सोबत आणखी नऊ जण होते.पहीला दिवस ओळख आवडी निवडी आणि ऑफीसचे नियम यात गेला.वैयक्तीक आवडी मधे तिने सिंगींगही सांगीतले.सगळे अगदी माझ्या मनासारखे घडत होते.माझे कान आतूरलेले तिच्या तोंडुन एखादे गाणे एैकण्यासाठी.मी तिला खुप फोर्स केला तिने गाण्यासाठी.आजही ते गाण मी रोज एेकतो.तिने जगजीत सिंगची माझी प्रचंड फेव्हरेट गझल गायली होती.आजही ते बोल तोंड पाठ आहेत मला.

होश वालो को खबर क्या मैकशी क्या चिज है…
इश्क किजीए फिर सामझीये जिंदगी चिज है ..
हम लबोसे केह ना पाए उनसे हाले दिल कभी
ओर वो समझे नही के खामोशी क्या चिज है…

जे या गाण्याचे बोल आहेत तिच अवस्था होती तेव्हा तेव्हा माझी.त्यानंतर तीन दिवसांनी ट्रेनींगही संपली.मला ती सतत माझ्या नजरे समोर हवी हवीशी वाटायची.म्हणून मी तिला मँनेजमेंट डिपार्टमेंट मधे घेतले.जवाबदारी मोठी होती पण मला विश्वास होता ती ते काम व्यवस्थित पार पाडेल.आणि नाहीच जमले तर मी होतोच ना तिला संभाळून घ्यायला.ती तिच्या कामा बद्दल अतिशय प्रामाणिक होती.कामात इतकी गुंग असायची की तिला बाकीचे काहीही दिसायचे नाही.मी मुद्दाम तिच्याकडे जायचो तिचे काम पहाण्याच्या निमित्ताने.इतका वेडा झालो होतो मी तिच्यासाठी जराही तिच्या शिवाय रहावत नव्हते मला. मँनेजमेंट मधील एक मुलगी सिया तिच्यावर फार जळायची माझ्या अनुपस्थितीत एकदा तिने गार्गीला बडबड केली.ते काही तिला सहण झाले नाही ट्रेनींग रुम मधे जाऊन ती रडत होती निक तिला समजावत होता.मी गेल्यावर मला सगळा प्रकार कळाला ती रडत आहे हे एेकूण मला रहावले नाही.मी लगेचच ट्रेनींग रुम कडे गेलो.रडतानाही इतकी गोड दिसत होती ती अगदी एखाद्या बाहूली सारखी.रडून रडून नाक आणि डोळे लाल बुंद झाले होते क्षणभर तर वाटले जावे आणि तिला छातीशी कवटाळून घ्यावी.मी समजावत असताना ती पटकन म्हणाली मी नाही इथे काम करू शकणार सर….तिचा निर्णय एेकूण माझ्या काळजाचा ठोकाच चुकला मला सिया वर प्रचंड राग आला मी लगेच ब्रिफींग घेतली आणि सर्वांना वॉर्निंग दिली ऑफीस मधे कोणीही कोणावर पर्सनल कमेंट करायची नाही.कोणाबद्दल काहीही तक्रार असेल तर मला येऊण सांगायचे नाही तर पुढच्या वेळी वॉर्निंग नाही देणार सरळ टर्मीनेट करणार.
त्यानंतर सर्व छान चालु होते.मला खुप सवय लागली होती तिची.ऑफीस मधे तासनतास मी तिला एक टक पहात रहायचो.हळू हळू ही गोष्ट तिच्याही लक्षात आली.आणि तिही त्याला दुजोरा दुजोरा देऊ लागली.माझे तिच्यावर प्रेम होते हे सांगण्याची मात्र मला हिंम्मत झाली नाही.जेव्हा जेव्हा तिच्यासोबत माझी नजरानजर व्हायची तेव्हा तेव्हा मी मोहरून जायचो अचानक आणखी तरूण झाल्या सारखे वाटायचे.
त्यानंतर एक दिवस तिने माझ्या फोन मधे राधिकाचे फोटो पाहीले तिने मला ती कोण आहे हे विचारले.खरतर मी तिला आधीच सांगणार होतो राधिका बद्दल पण हिम्मंतच झाली नाही कधी.थोडा वेळ ती शांतच होती काहीच बोलत नव्हती. मग मी तिला राधिका आणि माझ्या रिलेशन बद्दल सर्व काही सांगीतले अगदी मी डिव्होर्स फाईल केला आहे इथ पर्यंत.त्यानंतर तिनेही मला तिच्या बॉयफ्रेंड बद्दल सांगीतले.तिचे आणि त्याचे त्यादरम्यान फार वाद चालले होते.त्याचे आणखी दोन मुलींसोबर अफेअर चालू होते.घरात त्यांच्या रिलेशन बद्दल कळाले आणि त्यांनी त्या दोघांचे लग्नही ठरवून टाकले तिचीच निवड असल्याने तिला आता काहीच करता येत नव्हते त्यामुळे ती त्याला सहण करत होती.
पावसाचे दिवस होते.संध्याकाळी ऑफीस बंद झाल्यावर आम्ही घरी जायला निघालो.अचानक खुप पाऊस पडू लागला. तिने भिजण्याचा हट्ट केला.मी एका झाडाच्या आडोशाला उभा राहून तिला ओरडत होतो.खुप पाऊस आहे आजारी पडशील पण ती माझे काहीच ऎकत नव्हती.खुप पाऊस असल्याने माणसांची वर्दळ खुप कमी होती तिथे.आणि जे होते त्यांची घरी जाण्याची घाई चालू होती.तिने खुप वेळा मलाही बोलावले भिजण्यासाठी पण मी काही गेलो नाही.एखाद्या लहाण मुलाप्रमाणे ती मनसोक्त आनंद घेत होती पावसाचा.मी मात्र भान हरवून तिच्याकडे पहात होतो.शेवटी तिच्या चिंब ओल्या देहाकडे पाहून मला रहावले नाही आणि मी ही खेचला गेलो तिच्याकडे दोर बांधल्या सारखा.त्यानंतर आम्ही दोघेही प्रचंड भिजलो.पावसामुळे घसरट्या झालेल्या चिखलात तिचा पाय घसरला पहील्यांदा जरा घाबरतच मी तिला पकडले.पण थोड्यावेळाने ती पुन्हा घसरली.तेव्हाही मी तिला सावरले त्यावेळी ती माझ्या खुप जवळ होती.माझा मनावरचा ताबा सुटत चालला होता.ती बरोबर माझ्यासमोर उभी होती.मी व्यक्त होणारच होतो की तिने माझ्या ओठांवर तिचा हात ठेवला.त्या स्पर्शाने मात्र मी अधीर झालो आणि तिच्या कमरेकडे हात नेऊन तिला माझ्याकडे खेचून घेतली.जे होत होतं.त्याला तीही विरोध करत नव्हती.लाजेने तिचा चेहरा लाल बुंद झाला होता.तिच्या थरथरणा-या ओठांची कंपने मला साद घालत होती.मीे सरसावलो बेधूंद होऊण तिच्याकडे.तिच्या ओठांत माझे ओठ गुंतवले.आणि त्यानंतरची जवळ जवळ विस मिनीटे एकमेकांना एकमेकांच्या स्वाधीन केले.तिचे माझ्या पाठीवरून फिरणारे हात आजही मी विसरलेलो नाही.थोड्यावेळाने आम्ही घरी जायला निघालो घर येई पर्यंत ती माझ्या छातीवर डोक ठेऊण विसावली होती.मी रिक्षातून उतरताना तिने माझा हात पकडला आणि माझ्याकडे पाहूण मला मानेने खुणवूण न जाण्याचा हट्ट केला.मी तिच्या माथ्यावर ओठ टेकवून तिला उद्या ऑफीस मधे भेटू असे सांगून निरोप दिला.त्यादिवसा नंतर आम्हाला एकमेकांचे व्यसन लागले होतेे.जिथे जिथे संधी मिळेल तिथेतिथे आम्ही ओठांशी ओठांना एकरूप करू लागलो.लिफ्ट मधे,ऑफीस मधे अगदी रिक्षामधे सुद्धा.
रविवार ऑफीसला सुट्टी होती.राधिकाच्या आग्रहास्थव आम्ही जेवायला बाहेर गेलो.तिकडे मला गार्गी तिच्या बॉयफ्रेंड सोबत दिसली.त्याच्यासोबत ती फार खुश दिसत होती.मला तिला त्याच्या सोबत पहाणे सहण झाले नाही.त्यानंतर सार काही बदलून गेल.मी तिच्यासोबत खराब वागू लागलो,तिच्यावर कामाचे प्रेशर देऊ लागलो.त्याच दरम्यान ऑफीस मधे श्रद्धा नावाची एक नवीन मुलगी आली.जेवढा क्लोज मी गार्गीच्या होतो तेवढाच क्लोज मी श्रद्धा सोबत राहू लागलो गार्गीला जळवण्यासाठी.खरतर गार्गी तिच्या आयुष्यात खुप खुश होती. माझ्यामूळे ती भरकटत चालली होती तिला दुर ठेवण्यासाठी मी मुद्दाम तसा वागत होतो.तिला माझे तसे वागणे सहण झाले नाही.आणि त्यानंतर तिने रेझीग्नेशन दिले मीही ते लगेच एक्सेप्ट केले.गार्गी ऑफीस मधे सर्वांची फार प्रिय होती तीने रेझीग्नेशन दिले आणि मी ते स्विकारले ही गोष्ट कळाल्यावर ऑफीस मधे गोंधळ झाला असता त्यामुळे मी तिला कोणाला काहीही न सांगता निघुन जायला सांगीतले. रेझीग्नेशन एक्सेप्ट केल्यानंतर कंपनीच्या नियमांप्रमाणे तिला आणखी पंधरा दिवस काम करायचे होते.ते पंधरा दिवस मी कसे काढले ते मी शब्दात नाही सांगू शकणार.अखेर तो दिवस आला ज्यादिवशी ती ऑफीस सोडून जाणार त्यादिवशी मी घरी जाई पर्यंत तीही ऑफीस मधे बसून राहीली.मी नेहमीच ऑफीसचे रिपोर्ट मेल करून घरी जायचो.सगळे गेल्यावर ती माझ्याकडे आली तिने मला घट्ट मिठी मारली आणि टेक केअर म्हणून निघुण गेली.खुप वाटत होते तिला थांबवावे पण स्वतःला आवरले.आणि धक्का बसल्यासारखा ती दिसेनाशी होई पर्यंत तिच्या निघुण चाललेल्या पाठमो-या आकृतीकडे पहात राहीलो.त्यानंतर ती मुंबई सोडून कायमची तिच्या गावी गेली.आणि मीही डिवोर्स घेऊण कर्नाटक गाठले.
तिच्या लग्नाच्या दोन दिवस आधी तिने मला आमंत्रण देण्यासाठी कॉल केला.मला नसते सहण झाले तिला दुस-या कोणाची तरी होताना पाहणे मी तिला हे सांगितल्यावर ती म्हणाली इतके प्रेम करत होतात तर का वागलात माझ्यासोबत असे? मी तिला सर्व हकीकत सांगीतले मी तिला तिच्या बॉयफ्रेंड सोबत पाहीलेली आणि मला ते सहण झाले नाही म्हणून.त्यावर तिने जे उत्तर दिले त्यामुळे मी आजही पश्चातापात जगत आहे.ती म्हणाली ति भेट तिची आणि तिच्या बॉयफ्रेंडची शेवटची भेट होती.तिने त्याच दिवशी त्याच्या सोबत ब्रेक अप केले होते.आणि त्यानंतर ती आमच्या नात्याबद्दल तिच्या घरात बोलणार होती.नेहमीच कानाने ऎकलेल्या आणि डोळयांनी पाहीलेल्या गोष्टी ख-या नसतात हे तेव्हा मला कळाले.आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरचे समज गैरसमज तिथेच क्लिअर करावे हे ही कळाले पण आता हे कळून काय उपयोग जिच्यावर मनापासून प्रेम केले तिलाच मी या जिवघेण्या गैरसमजातून गमावून बसलो.गार्गी नंतर कोणावरही प्रेम करण्याची मी हिंम्मतही केली नाही.खरतर माझी कोणावर प्रेम करण्याची इच्छाही राहीली नव्हती…..

Loading...

आयूष्याच्या खडतर वळणावर एकटाच चालत होतो मनात खुप सा-या वेदना घेऊण…
तु आलीस अण नव्याने जगू लागलो सार काही मागे ठेऊण…
तू आल्याने जगण्याचे खरे अर्थ कळाले …
सुखाःचा पाऊस झाला अण दुःख दुर पळाले….
तु सहज बहरून टाकलेस माझ्या विस्कटलेल्या क्षणांना
कोमेजलेल्या माझ्या मनाच्या फुलांना अण पानांना…
मी मात्र भटकत राहीलो माझ्याच नकारर्थी दुनीयेत
सार काही गमावून बसलो तुझ्यावर संशय घेत…
हल्ली काय एकटाच जगण्याचा प्रयत्न करतो तुझ्या आठवणी सोबत घेऊण…
जरी तुझ्या सोबत पाहीलेली स्वप्ने कधीच गेली आहेत अश्रूं सोबत वाहूण….
आजही तुझ्या आठवणीत रोज झुरते माझे प्रेम खुळे
जे कधी काळी गमावून बसलो होतो मी एका शुल्लक गैरसमजामूळे…..

Loading...

Please follow and like us:

Leave a Reply