चायनीज अन्न (?)पदार्थ : विषारी चीनी ड्रैगनची भारतीय मनाला पडलेली भयानक भुरळ …

चायनीज अन्न (?)पदार्थ : विषारी चीनी ड्रैगनची भारतीय मनाला पडलेली भयानक भुरळ …

हा लेख लिहायचा खरं तर काही वर्षांपासून माझ्या मनांत होतं …पण व्यवस्थित माहिती संकलित झाल्याशिवाय लिहणे अशक्य होते …चायनीज पदार्थांच्या विषारी गुणधर्माची ओळख झाली ती एका किडनी फेल झालेल्या रुग्णाचा अभ्यास करताना …

डायलिसीस साठी दवाखान्याच्या चकरा मारणारा हा रुग्ण वयाने तरुण, शरीराने दणकट असलेल्या हा रुग्ण आमच्या दूरच्या नात्यातलाच आहे …

त्याची केस अभ्यासताना लक्षात आले की त्याला चायनीज पदार्थ भरपूर खायची भयानक सवय होती ….

Loading...

म्हणजे त्याच्या या आहाराच्या सवयीचा नक्कीच काहीतरी परिणाम त्याच्या किडनीवर झालेला होता …पण हि एक केस पर्याप्त पुरावा नव्हती …म्हणून किडनी निकामी झालेल्या प्रत्येक रुग्णाला मी हा प्रश्न विचारायला सुरवात केली …

आणि आश्चर्य म्हणजे तरुण वयात किडनी निकामी झालेल्या रुग्णांपैकी ७० ते ८० टक्के रुग्ण सातत्याने चायनीज आहार खात होते ….चायनीज आहारात असे आहे तरी काय ज्याचा इतका विषारी परिणाम आपल्यावर होतो ???

Loading...

प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण सोयासॉस आणि अजिनोमोटो बद्दल माहिती पाहू …

१. सोया सॉस :

चीनमध्ये सोयाबीन आणि गहू वर्षभर कुजवून सोया सॉस तयार करतात … https://www.youtube.com/watch?v=queVlA4xLgI या लिंक वर जाऊन आपण हि प्रक्रिया बघू शकता ….

कोणताही दीर्घकाळ कुजवलेला पदार्थ खाल्ला कि म्हणजे मानवी शरीरातील ओज आणि तेज कमी होते … पचनसंस्था बिघडून लवकर म्हातारपण येते …
सोया सॉस मध्ये प्रमाणापेक्षा मिठाचे प्रमाण खूप जास्त असते जे तुमच्या यकृताला हानी पोचवते ….त्यापेक्षा मोठा कहर म्हणजे भारतात जो सोया सॉस मिळतो तो वर्षभर कुजेपर्यंत कुणाला दमधीर नसतो……

म्हणून वेगवेगळी रसायने वापरून आणि कृत्रिम पद्धतीने हा सॉस बनवतात … जो आधीच्या विषारी सोया सॉस चे विषारी गुणधर्म आणि अनेक पटीने वाढवतो ….

२. अजिनोमोटो :

अजिनोमोटो भाज्या मऊ करणारा एक पदार्थ आहे ….थोडाफार मिठासारखा म्हणू शकतो …..हल्लीच्या संशोधनानुसार कर्करोगास हमखास कारणीभूत ठरणारा हा पदार्थ आहे

अन्नाची चव आणि रंग कृत्रिमरित्या वाढवणारा हा पदार्थ असून याने भाज्यांचा रंग खुलतो आणि त्या आकर्षक वाढतात …

हा एक असा विचित्र पदार्थ आहे कि एका व्यक्तीच्या भाजीत एक चिमुट अजिनोमोटो पुरत असेल तर दहा व्यक्तींच्या भाजीतसुद्धा एक चिमुटच पुरेशी होते …

यावरून त्याच्या हानिकारक गुणधर्मांची कल्पना आपणास येईल ….

असेच ढीगभर पदार्थ वापरून चायनीज अन्न (?) तयार केले जाते जे आपल्या आरोग्यास हानिकारक आहे …अर्धकच्या भाज्या आणि मांस याचे प्रमाण चायनीज आहारात भरपूर असते …

आपल्याकडे मिळणारे चायनीज पदार्थ म्हणजे मेघालय आणि मणिपूर इथल्या लोकांनी चित्रविचित्र बदल केलेले एक व्यंजन आहे

त्याचे एक उदाहरण म्हणजे मंचाव सूप आपल्याकडे घेतात तो चायनीज पदार्थच नाहीये ….

आणि भात आणि भाज्या तळण्याची पद्धत मूळ चीनी नसून तीपण या मेघालय वाल्यांची देणगी आहे ….
जी अत्यंत चुकीची आहार पद्धत आहे

डॉ सचिन जाधव
सुखायु हेल्थकेअर,
कैनडा कॉर्नर
नासिक
संपर्क क्रमांक : 0922512839

Please follow and like us:

Leave a Reply