पत्नी …..

काय हवं असत एका पत्नीला सकाळी पहाटे उठून ती चहा आणि नास्ता बनवते एक छोटीशी दाद आपल्या पतीकडून आणि एक कप चहा त्याच्यासोबत पिण्यासाठी तो मात्र घाईघाईत डबा घेऊन निघून जातो आणि त्याच्याबरोबर पिण्यासाठी ठेवलेला चहा तसाच थंड पडून राहतो,,,,,,,,,,,

नंतरही तिच मन शांत राहत नाही खूप बेचैन होतं आणि नवऱ्याला अहो पोचलात का विचारल्यावर खूप बरं वाटत तो मात्र मूर्खासारखं पोहोचलो का विचारायला मी लहान आहे का बोलून फोन दणकून आपटतो,,,, तीच मन मात्र तो व्यवस्थित पोचला म्हणून शांत होत,,,,,

तीहि आटपते पटापट काम घासावर घास मारते डब्बा पर्स मध्ये कोंबते धावत पळत ऑफिसला पोचते कामात मग गढून जाते दुपार झाल्यावर जेवणाआधी तिला परत त्याची आठवण येते आणी मग जेवलात का विचारण्यासाठी फोन लावते तो हि मग उत्तर देतो तिला खसकन ओरडतो मीटिंग मध्ये आहे मी समजत नाही तुला ,,,, जेवलोय मी आता जेव तू ,,,,,, आपला नवरा जेवल्यावर काय समाधान मिळत कदाचित हे एका स्त्रीलाच कळत,,,,

Loading...

ती ही खूप दमलेली असते धापा टाकत घरी जाते पोचल्यावर मग त्याला काय आवडेल ते बनवायला लागते तो मग आल्यावर दमून येतो पटकन जेवण उरकून घेतो ती मात्र त्याच्या साठी प्रेमाने त्याच्या आवडीच्या बनवलेल्या जेवणाची थोडीशी तो दाद देईल म्हणून वाट पाहते तो मात्र उठून जातो हि आपली आवराआवर सुरु करते,,,,

दिवसभर आपला नवरा कामात असतो मी पण नोकरी करते तरीही त्याच्यासाठी नेहमीच वेळ राखून ठेवते आतातरी तो थोडासा बोलेल मनमोकळेपणाने कधीतरी तिच्याशी असं ती मनातल्या मनात बोलत राहते हा मात्र मस्त online सर्वांबरोबर बोलून झाल्यावर तुला वेळेच महत्व समजत का कामावर जायच असत मी माझी काम वेळेवर करतो असा ओरडून तिला झोपायला लावतो ती मनातलं मनातच ठेवून झोपी जाते,,,,,

Loading...

पहाट होते परत तिचीच तिच धावपळ आणि तोच थंड झालेला चहा,,,,,

Please follow and like us:

Leave a Reply