फास्टर फेणे

Faster-Fene-Title-1

फास्टर फेणे १९६०च्या दशकातला पुस्तकातला सुपरहिरो आता चित्रपट रूपाने आपल्या समोर आला आहे .१९१८० साली दूरदर्शन वर २६ एपिसोड मध्ये फास्टर फेणे आला होता ! त्या आधी फास्टर फेणे ची पुस्तके फार गाजली

This slideshow requires JavaScript.

म्हणजे आधी पुस्तक रूपात नंतर मालिका आणि आता चित्रपट असा आत्तापर्यंत चा फाफे चा प्रवास झाला आहे !

Loading...

3

रितेश देशमुख निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित फास्टर फेणे कसा आहे ते पाहू….

Loading...

मेडिकल एंट्रन्स परीक्षेसाठी पुण्याला आलेला बनेश्वर फेणेला  (अमेय वाघ ) परीक्षा केंद्रावर एक मुलगा भेटतो.परीक्षा झाल्यावर मात्र त्याला त्याच्या आत्महत्येची बातमी पेपर मध्ये वाचायला भेटते. काहीतरी गडबड आहे याची मनोमन खात्री होताच बन्याच्या आतला डिटेक्टिव्ह जागा होतो आणि शोध सुरु होतो एका खुनाचा ज्याला आत्महत्या ठरवलेली असते.Faster Fene13

या सर्व प्रवासामध्ये त्याला त्याची बालपणीची पत्रकार मैत्रीण अबोली (पर्ना पेठे )मदत करत असते .जसा जसा शोध पुढे जातो बन्याला अनेक धक्कादायक गोष्ट समजतात ! maxresdefault

ऍडमिशन माफिया अप्पा (गिरीश कुलकर्णी ) ची चित्रपतील एंट्री खूपच युनिक आहे! संपूर्ण चित्रपटात गिरीश कुलकर्णींनी अप्पा हे पात्र फार उठावदार पणे सादर केले आहे!

620176-amey-wagh-faster-fene

रिव्हर्स किंग अंबादास (भरत जाधव )चा छोटा पण मस्त रोल आहे ,आवडेल तुम्हाला ..

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कॅमेरा दिग्दर्शन !पुणे शहराला छान दाखवलं आहे चित्रपटात .विशेषतः ड्रोन सीन  पुण्याचे प्रथमच दिसले आहे !

fene-new3

हा चित्रपट अनेक भागांसाठी बनवला आहे ! याचे सिक्वल बनणार …याचा इशारा चित्रपटाच्या शेवटच्या शॉट मध्ये दिला आहे….!

akck तर्फे चित्रपटाला देत आहोत ४ स्टार !

64NRk

 

 

Please follow and like us:

Leave a Reply