बहुगुणी कांदा -कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

कच्चा कांदा खाल्ल्यावर काय होते :

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा चाट, कांदा सर्वच खाण्याची चव वाढवते. जर तुम्हांला कांदा खाल्ल्यावर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर खाल्ल्यानंतर माउथफ्रेशनर खा किंवा ब्रश करा पण कांदा जरूर खा. आज आम्ही तुम्हांला कांद्याचे काही खास उपयोग आणि गुणे सांगणार आहोत जे आचरणात आणून तुम्ही बहुतेक समस्या सोडवू शकता.

कांद्याचे 100 ग्रॅममध्ये पोषक घटक –

प्रथिने 1.2 जी कार्बोहायड्रेट 11.1 व्हिटॅमिन 15 मिग्रॅचरबी 0.1 जी कॅल्शियम 46.9 एमजी व्हिटॅमिन 11 मिग्रॅखनिज 0.4 ग्रॅम फॉस्फरस 50 मिग्रॅ कॅलरीज 50 मीटरफायबर 0.6 ग्रॅम लोह 0.7 मिग्रॅ पाणी 86.6 ग्रॅम

Loading...

१. बद्धकोष्ठता (कफ) दूर करते :

कांद्यात असलेले फायबर पोटासाठी खूप फायदेशीर आहे. कांदा खाल्याने कफ दूर होते. जर तुम्हांला वारंवार बद्धकोष्टता होत असेल तर नियमित कांदा खाणे सुरु करा.

२. गळ्याची खाज (खवासपणा) दूर करतो :

जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला होत असेल तर कांद्याचा ताजा रस प्या. ह्यामध्ये गूळ किंवा मध मिसळून प्यायल्याने अधिक फायदेशीर ठरेल.

Loading...

३. रक्तस्त्राव थांबवणे :

नाकातून रक्तस्त्राव होत असेल तर कच्चा कांदा कापून त्याचा वास घ्या. ह्याशिवाय जर पाइल्सची समस्या असेल तर सफेद कांदा खाणे सुरु करा.

४. मधुमेहावर नियंत्रण ठेवते :

नियमित कांदा खाल्ल्याने इन्सुलिन तयार होतात. जर तुम्हांला मधुमेह असेल तर दररोज जेवणाबरोबर सलाड च्या स्वरूपात कांदा खाणे सुरु करा.

५. हृदयाशी संबंधित आजार नष्ट करते :

कच्चा कांदा रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रित करते. ह्यामध्ये मिथाईल सल्फाइड आणि अमिनो ऍसिड असते. ह्यामुळे हे कोलेस्ट्रॉलला सुद्धा नियंत्रित ठेवते आणि हृदयाच्या आजारांपासून वाचवते.

६. रक्ताची कमतरता (एनिमिया) दूर करते :

नियमित कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते.


हिरवा कांदा (कांद्याची पात?) सुद्धा आहे खूप फायदेशीर :

१.हिरवा कांदा खाण्याचे खूप फायदे आहेत. हे कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी ठेवण्याचे काम करते. ह्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. हिरव्या कांद्यामध्ये क्रोमियम असते.

२.हिरवा कांदा खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. हिरवा कांदा चेहऱ्याच्या सुरकुत्या दूर करते. हे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. हिरवा कांदा मॅक्रोन्यूट्रिशयन कायम राखतात. प्रत्येक कांद्यात अँटी इंफ्लोमेंटरी आणि अँटी हिस्टामाइन गुण असतात. ह्यामुळे हे संधीवाद आणि दम्याच्या (अस्थमा) रुग्णांना फायदेशीर ठरतात.


पांढरा कांद्याचे काही औषधी गुण :

*१. ३ चमचे कांद्याचा रस आणि एक चमचा मध मिसळून घेतल्याने महिलांच्या मासिक पाळीची अनियमितता आणि त्यादरम्यानच्या वेदनांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात कांदा रोज खाल्ला पाहिजे. कांद्याचा रस आणि मोहरीचे तेल समान प्रमाणात घेऊन त्यांना एकत्र करून मालिश केल्याने संधिवाताच्या वेदनांपासून आराम मिळतो.

२.कांद्याच्या ३-४ चमचे रसामध्ये तूप मिसळून प्यायल्याने शरीरात शक्ती वाढते. कांद्याच्या रसात साखर मिसळून रिकामी पोटी घेतल्याने मुतखडा निघून जातो. ह्याचे सेवन दिवसातून एकदाच करा. मूळव्याध ची समस्या असेल तर कांद्याच्या ४-५ चमच्यात मिश्री आणि पाणी मिसळून नियमित घ्या, रक्त पडणे थांबेल. जखमेवर लिंबाच्या पालाचा रस आणि कांद्याचा रस समान प्रमाणात मिसळून लावल्याने जखम लवकर भरते. कांद्याच्या रसात दही, तुळशीचा रस आणि लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. ह्यामुळे केसं गळणे बंद होईल आणि रुसी च्या समस्या पासून आराम मिळेल.

३. जर हायस्टीरियाचा (फिट) रोगी जर बेशुद्ध झाला असेल तर कांदा कुटून नाकाला लावा. त्यामुळे रोगीला लवकर शुद्धीत आणले जाईल.

४.केसं गाळण्याची समस्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी कांदा खूपच फायदेशीर आहे. केसांवर कांद्याच्या रसाची मालिश केल्याने केसं गळणं बंद होते. ह्याशिवाय कांद्याचा लेप लावल्याने कमी वयात सफेद झालेले केसं पुन्हा काळे होऊ लागतात.

५.मूत्र थांबल्यास दोन चमचे कांद्याचा रस आणि गव्हाचे पीठ घेऊन हलवा बनवा. हलवा गरम करून पोटावर त्याचा लेप लावल्याने मूत्र येणास सुरुवात होईल. कांदा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने मूत्रसंबंधित समस्या दूर होतात. सर्दी किंवा खोकला झाल्यावर कांदा खाल्ल्याने आराम मिळतो. कांद्याचा काही सामान्य शारीरिक समस्यांवर जसे मोतीबिंदू, डोकेदुखी, कानाचे दुखणे आणि साप चावल्यावर सुद्धा वापर केला जातो.

Please follow and like us:

Leave a Reply