महाराष्ट्राची खाद्य संपत्ती!

मराठी मनोरंजनात्मक पोस्ट साठी लाईक करा : https://www.facebook.com/aamachkahi/

================================================================

महाराष्ट्र हा विविधतेने समृद्ध एक राज्य आहे .भौगोलिक दृष्टया देशाच्या मध्यभागी असल्याने इथे आजूबाजूच्या राज्यांचा काहीप्रमाणात प्रभाव जाणवतो.महाराष्ट्राला स्वतःची अशी एक खाद्य परंपरा आहे.मराठमोळे पदार्थ आता सातासमुद्रापार नावलौकिक वाढवत आहे.

Loading...

चला तर मग पाहू या महाराष्ट्राची खाद्य संपत्ती !

महाराष्ट्राची खाद्य संपत्ती!

१)पोहे 

Loading...

महाराष्ट्र राहून कोणी पोहे खाल्ले नाही असा कोणी दुर्मिळच म्हणावा लागेल .महाराष्ट्राच्या संस्कृतीत पोहे ला महत्वाचे स्थान आहे.महाराष्ट्रात लग्नाची बोलणी हे ‘कांदे पोह्यानेच ‘सुरु होते .शेंगदाणे घातलेले पोहे हे सर्वांच्या आवडीचे असते !साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव दिसून येतो.

मिसळ 

मिसळ म्हणजे मटकीची पातळ भाजी आणि फरसाण यांचे कांदे घालून केलेले मिश्रण ..मिसळ !
महाराष्ट्रात प्रत्येक भागात मिसळ त्या त्या भागाच्या वैशिष्ट्यांनी बनलेली आढळते.पुणेरी मिसळ ,कोल्हापुरी मिसळ !नागपुरी सॅम्पल मिसळ !मुंबई ची मिसळ ! आणि ठाण्यातली मामलेदार मिसळ ! एकुणात पुणेरी मिसळ जरा जास्त प्रसिद्ध आहे !

झुणका भाकर

झुणका भाकर प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची ओळख आहे !शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न म्हणून हे ओळखले जाते !
झुणका भाकरीची क्रेझ आता शहरी भागाला सुद्धा लागली आहे !डाळीचं पीठ तव्यावर आटवून ,मसाला वैगैरे घालून हा पदार्थ बनवला जातो ! झुणका भाकर -मिरचीचा ठेचा -कांदा (हाताने फोडलेला !) म्हणजेच स्वर्गीय आनंद !

वडापाव

वडा पावचे महाराष्ट्रात एक वेगळे स्थान आहे !बर्गर च्या तोडीस तोड असा किंबहुना त्यापेक्षा सरस असा हा पदार्थ आहे !
वडापाव महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो ! पुण्याचे प्रसिद्ध ‘जोशी वडा ‘ एक नावाजलेला फ्रॅन्चायजी ब्रँड आहे !या वडापाव ने अनेकांच्या आयुष्याची सुरुवात करून दिली आहे…कोणी याला विकून तर कोणी याला सुरुवातीच्या खडतर दिवसात मुख्य अन्न म्हणून खाऊन पुढं समृद्ध झाले आहेत !

======================================================================

रहा अपडेट : आमचे इतर लेख वाचण्यासाठी https://akck.in/ वर क्लीक करा व फेसबुक वर पोस्ट वाचण्यासाठी https://www.facebook.com/aamachkahi/ क्लीक करून पेज लाईक करा !

Please follow and like us:

Leave a Reply