मृगजळ….( ही कथा काल्पनिक नाही)

20476221_322838501509965_8469523826416667450_n
पुणे स्टेशन रात्री साधारण दहाची वेळ.सुजित त्याच्या गावी जळगावला निघाला होता.पुण्यात तो नोकरी निमित्त रहात असे.एका कॉलसेंटर मधे क्वॉलीटी डिपार्टमेंट मधे तो कार्यरत होता.तिकीट काढण्यासाठी काऊंटरला उभा असताना चौकशी करण्यासाठी एक गोड मुलगी काऊंटरला आली.गोड आवाजाची कुरळे केस रेखीव चेहरेपट्टी आणि समोरच्या व्यक्ती सोबत प्रेमाने बोलण्याची लकब कोणालाही पटकन आवडेल अशी ती.तीही पुण्यात एका एन जी ओ मधे नोकरी करत होती.तिलाही अर्जंट कोल्हापूरला तिच्या गावी जायचे होते.ट्रेन पहाटेची असल्याने ती खुप गोंधळून गेली होती.तिच्याकडे पहाटे पर्यंत वाट पहाण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. सुजितला तिची मनस्थिति कळाली. सुजितने तिला मदतीच्या उद्देशाने एक पर्याय सांगीतला.पहाटे पर्यंत स्टेशनवर एकटी थांबण्यापेक्षा ट्रॅव्हल्सने जाण्याचे त्याने तिला सुचवले.आजवर फक्त ट्रेनने प्रवास केल्यामूळे तिला ट्रॅव्हल्स कुठे लागतात या बद्दल काहीही माहीत नव्हते.तिने सुजितला विचारले कुठे लागतात ट्रॅव्हल्स.सुजितची ट्रेन यायलाही आणखी दोन तास अवकाश होता.तिला एकटे पाठवण्या ऎवजी तो स्वतःच तिला घेऊण स्वारगेटला गेला.जाता जाता दोघांच्यात काही गप्पा झाल्या त्या गप्पांमधे त्याला तिचे नाव कळाले तिचे नाव संध्या होते.सुजितला ती अगदी तिच्या नावा सारखी भासली.कडक पडलेल्या उन्हा नंतर हवाहवासा गारवा देणारी.आणि तिच्या येण्यासोबत सर्वांच्या आयुष्यात रंगांची मनसोक्त उधळन करनारी अशी ती.संध्यालाही त्याचा स्वभाव फार आवडला. त्यानंतर त्याने तिला ट्रॅव्हल्स मधे बसवून दिले.पहिल्यांदाच अशी प्रवास करत होती ती सुखरूप पोहोचली की नाही हे पहाण्यासाठी सुजितने तिला तिचा फोन नंबर मागीतला.तिनेही संकोच न करता त्याला स्वतःचा नंबर दिला.त्यानंतर तिची गाडी निघाली आणि तो ही ट्रेन पकडून जळगावला निघून गेला.दुस-या दिवशी सकाळी गावी पोहोचल्या बरोबर त्याने तिला फोन केला.त्याला ती सुखरूप पोहोचल्याचे कळाले. संध्याला त्याचा काळजी घेणारा स्वभाव फार आवडला त्यानंतर ते दोघांच्यातही छान मैत्री झाली.दोघेही एकमेकांना गुड मॉर्नींग,गुड नाईट आणि मैत्री वरचे छान छान मेसेज करू लागले.पुढे सुट्टी संपून दोघेही पुण्याला आले.मेसेज कॉल्स चालूच होते.काही दिवसांनी दोघे भेटूही लागले दोघांनाही एकमेकांची सवय लागत चालली होती.पहील्याच भेटीत संध्याने सुजितच्या मनात घर केले होते.रोज रोज बोलून बोलून त्याला संध्या खुप आवडू लागली.तो तिच्यावर मनापासून प्रेम करू लागला.एके दिवशी संधी पाहून त्याने तिच्याकडे स्वतःचे प्रेम व्यक्त केले.त्यावर तिने त्याला तिच्या बद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगीतली.जी एैकताच तो पुर्णपणे तुटला. तिने त्याला सांगीतले कि,तिचे एका मुलावर(रजत)खुप प्रेम आहे.आणि ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत.त्यानंतर सुजितने तिच्यापासून दुर रहाण्याचा निश्चय केला पण पुन्हा त्याला वाटले प्रेमच तर आहे.त्या दोघांचे एकमेकांवर लग्न कुठे झाले आहे.आपण अशी प्रयत्न न करता हार मानने चुकीचे आहे.तिच्या लग्नापर्यंतची वेळ तर आहे आपल्याकडे तो पर्यंत तिला आपले प्रेम पटवून द्यायचेच.त्यासाठी काय वाटेल ते करायची त्याची तयारी होती.पुढे तो जास्तीत जास्त वेळ तिला देऊ लागला.रोज स्वतःच्या ऑफीस मधून लवकर निघून तो तिला घरी सोडण्याच्या निमित्ताने तिला पहाता यावे म्हणून धावत पळत जाऊ लागला,तिला प्रत्येक सुट्टी दिवशी फिरायला घेऊण जायचा,तिच्यासोबत खरेदीलाही जायचा,आणि अधून मधून तिचा मुड पाहून पुन्हा तिच्याकडे स्वतःचे प्रेम व्यक्त करायचा.पण ती मात्र नेहमी प्रमाणे त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसून तु वेडा आहेस असे बोलुन विषय टाळायची.पुढे नेहमीच सुजित तिच्या सुखःत दुःखात तिच्या सोबत राहीला.तिच्या इतके प्रेम त्याने दुस-या कोणावरही केले असते तर त्या कोणीही जिव ओवाळून टाकला असता त्याच्यावर.पण संध्याला त्याच्या प्रेमाचा काहीही फरक पडत नव्हता.ती कायम तिच्या प्रेमासोबत एकनीष्ठ राहीली.भलेही सुजितला तिच्या प्रेमा बद्दल ठाऊक होते.तरीही तिच्या बद्दलच्या त्याच्या भावना अतीशय निरागस होत्या.एखाद्या लहाण मुलाने त्याच्या खेळण्यावर प्रेम करावे अगदी तश्याच.
संध्या आणि रजत नेहमी फोन वर बोलायचे.रजत दिल्लीला रहात असे.संध्याचे वडील काही वर्षांपुर्वी दिल्लीलाच कामाला होते तिथे असल्यापासूनच संध्या आणि रजतचे एकमेकांवर प्रेम होते.नंतर तिच्या बाबांची पुण्याला ट्रान्सफर झाली.इतके दुर रहात असल्यामुळे त्यांच्याकडे फोन वर बोलण्याशिवाय काही पर्याय नव्हता.त्यामुळे ती सतत फोनवर बिझी असायची. सुजीत जेव्हाही तिला कॉल करायचा तिचा फोन बिझीच असायचा.तासन तास तो तिचा फोन कनेक्ट होण्याची वाट पहायचा.आजही त्याला कोणी फोन होल्ड वर ठेवला की राग येतो.संध्याचे रजत सोबत बोलून झाल्यावर ती लगेच पुन्हा सुजितला कॉल लावायची.तिनेही कधी सुजितला जाणून बुजून दुखवले नाही कारण सुजित सारखा छान मित्र तिलाही गमवायचा नव्हता.रजत मनाच्या जवळ असला तरी सुजित तिच्या जास्त जवळ रहात होता.त्यामुळे तिलाही त्याची फार सवय लागली होती.
संध्याला अमीर खानचे फार वेड होते.त्यादरम्यान अमीरचा एक मुव्ही आला होता.काही केल्या तिला तो मुव्ही पहायचाच होता.पण त्याच्या तिकीट्सच मिळत नव्हत्या.ती फार नाराज झाली.सुजीतला हे कळताच तो वेड्यासारखा पुण्यातले थेटर पालथे घालू लागला.शेवटी त्याला इसक्वेअरला तिकीटे मिळाली.त्याने तिला फोन केला आणि सरप्राईज देण्यासाठी भेटायला बोलवले.ती पटकन त्याला बोलून गेली अरे बापरे आता भेटण्यासाठी लाच ही देऊ लागलास की काय.ही गोष्ट त्याच्या जिवाला लागली.क्षणभर त्याच्या मनात आले लाच देऊण तू भेटणार असतीस तर तुला मिळवण्यासाठी स्वतःचा जिवही गहान ठेवला असता.तिचे ते कडवट शब्द ऎकूण त्याने लगेच फोन कट केला.त्यानंतर तिने बराच वेळ त्याचा फोन ट्राय केला पण त्याने काही फोन उचललाच नाही.त्या दिवशी ती लवकर निघून त्याच्या ऑफीसला गेली.तिथे त्याला भेटून खुप बडबड करू लागली.ती स्वतःहून त्याला भेटण्यासाठी आलेली पाहून त्याला खुप आनंद झाला.त्यानंतर ते दोघे रिक्षा मधून घरी जायला निघाले.संध्याने त्याला सरप्राईज बद्दल विचारले.त्याने लगेच तिच्या हातात मुव्हीची तिकीटे ठेवली. तिला खुप आनंद झाला पण शो सातचा होता.कामावरून कसेही करून ती आठ पर्यंत घरी पोहोचत असे.दहा पर्यंत घरी गेली तर घरचे ओरडले असते म्हणून तिने नाईट आऊट साठी सुजितच्या घरी जाण्याचा प्लान केला.आणि घरी फोन करून सांगीतले की तीला ऑफीस मधे काम असल्याने तीला फार वेळ झाला तर मैत्रीणी कडे जाणार आहे. मुव्हीला बसल्या नंतर अमीरच्या एन्ट्रीला ती वेड्यासारखी ओरडू लागली सुजित तिच्याकडे पाहूच लागला.त्याने तिला विचारले काय वेड लागल की काय तुला?इतका आवडतो तो तुला?संध्या म्हणाली हो खुप आवडतो जगात कोणाही पेक्षा जास्त.त्यावर सुजीत म्हणाला रजत पेक्षाही?ती म्हणाली असे शंभर रजत कुर्बान अमीर वर.तिचे हे वाक्य ऐकून सुजीतला पुन्हा थोडी आशा वाटू लागली.मुव्ही संपल्यावर ते दोघे त्याच्या घरी आले.सुजितच्या घरचे वातावरण मोकळे असल्याने कोणीही त्याला तिच्या बद्दल काहीही विचारले नाही.घरच्यांना वाटायचे सुजित तिच्याच सोबत लग्न करेल.रात्रीचे जेवण साधारण अकरापर्यंत आवरले आणि सुजीत तिच्या आग्रहास्थव तिला घेऊन गच्चीवर गेला.त्यानंतर तिने रजतला फोन केला.आणि ती फोन वर बोलू लागली तास होऊन गेला तरीही तिचे बोलणे काही थांबलेच नाही.ती भान हरवल्या सारखी रजत सोबत बोलतच होती.शेवटी सुजीत कंटाळून तिच्या पुढे जाऊण उभा राहीला तिला डिस्टर्ब करू लागला.तरीही ती फोन वर बोलतच होती.अखेर पहाटे साडे चारच्या दरम्यान तिचे बोलून झाले आणि ती सुजितला चल जाऊ खाली असे म्हणून खाली उतरून आली.सुजितला फार वाईट वाटले.आज त्याने तिला इतके छान गिफ्ट दिले होते नाईट आऊट साठी तो तिला घरी घेऊन आला होता.त्याला आशा होती की ती त्याच्या सोबत रात्रभर गप्पा मारेल , रात्रभर ती त्याच्या समोर राहील पण असे काहीही झाले नाही.दुस-या दिवशीही ती लवकर उठून अंघोळ करून कामाला जायला निघाली.तिचे ते वागणे त्याला मुळीच आवडले नाही त्याने त्यानंतरही तिच्या सोबत बोलणे सोडले.तिने पुन्हा त्याच्या सोबत कॉन्टॅक्ट करून त्याची माफी मागून त्याला नॉर्मल केले.पुढे काही दिवस छान गेले आणि त्याने पुन्हा एकदा तिला प्रपोज केले.तेव्हाही तीने त्याला वेडा आहेस तू म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला.पण आता त्याची सहणशक्ती संपली होती तो तिला ताडताड बोलु लागला.संध्या काय सारखी वेडा आहेस वेडा आहेस बोलतेस. हो किंवा नाही स्पष्ट सांगता येत नाही का?तुला वाटते ना कि मी वेडा आहे तर ऎक आहे मी वेडा तुझ्या साठी नाही दिसत आहे का तूला ते?काय कमी आहे माझ्यात?जगात कोणाही पेक्षा जास्त सुखात ठेवेन मी तुला फक्त एकदा हो म्हण.संध्या तिच्या निर्णयावर तेव्हाही ठाम राहीली शेवटी वैतागून तो तिला ही आपली शेवटची भेट आहे.इथून पुढे मी तुला माझे तोंड ही दाखवणार नाही असे बोलून तिथून निघून गेला.पुढे पंधरा दिवस त्यांच्यात कॉल मेसेज काहीही झाले नाही.पण तो काळ सुजित साठी फार कठीण होता.अगदी पावसाची वाट बघणा-या चातका सारखा तो दर पाच मिनीटांनी फोन ऑन करून पहायचा.तिचा कॉल मेसेज आला का ते.शेवटी एक दिवस त्याची प्रतीक्षा संपली आणि संध्याचा कॉल आला.थोडा वेळ त्याने फोन उचलला नाही त्याने विचार केला इतके दिवस मला वाट पहायला लावली आता तिलाही पाहू दे.पण,पुन्हा त्याला वाटले इतक्या दिवसाच्या दुराव्याने संध्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली असेल तर.आणि तिने व्यक्त होण्यासाठीच आपल्याला फोन केला असेल तर.त्यानंतर त्याने तिचा पहिलाच कॉल कट होण्याआधी उचलला.पण तेव्हाही त्याचा अपेक्षाभंग झाला.कारण तिने वेगळयाच कारणासाठी त्याला फोन केला होता.तिचा कोणीतरी मित्र तिला भेटण्यासाठी येणार होता आणि त्याला पुण्याचे काहीही माहीत नव्हते.त्याला घेऊन तिच्या घरी आणून सोडायचे होते.तिथेही त्याच्या स्वभावाने तिला नाही म्हणू दिले नाही तो तिच्या मित्राला घेण्यासाठी स्टेशनला गेला.
त्याला संध्याच्या घरी घेऊण आल्यावर पहातो तर काय तिच्या घरचे वातावरण खुप गंभीर होते.संध्याच्या मित्राला पाहुन संध्याचे वडील खुप चिडले.ते त्या मुलाला आधी पासूनच ओळखतात असे भासत होते.पण सुजितची आणि संध्याच्या वडीलांची ही पहीलीच भेट होती संध्याची आई आणि बहीण सुजितला चांगल्या ओळखत होत्या.संध्याची बहीण नेहमी प्रमाणे त्याच्या सोबत बोलू लागली.तिच्या वडीलांना काय ते आवडले नाही.आणि तिचे वडील तिच्या वर चिडले.काय चालले होते सुजितला काहीही कळत नव्हते.संध्याचा मित्र तिच्या वडिलांसोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण ते त्याचे काहीही एेकून घेत नव्हते.शेवटी तो उठून संध्याकडे गेला.सुजीतही उठून त्याच्या पाठोपाठ गेला.संध्याने त्या मुलाला पहाताच क्षणी त्याला मिठी मारली आणि ते दोघेही रडू लागले.त्यानंतर सुजितच्या लक्षात आले हा दुसरा तिसरा कोणी नसून रजतच आहे.कदाचित संध्याला शंका होती सुजितवर.जर तिने सुजितला रजत येणार आहे हे सांगीतले असते तर तो कदाचित त्याला घ्यायला नसता गेला.तिच्या अविश्वासाने त्याचे मन खुप दुखावले आणि तो तिच्यासोबत काहीही न बोलता तिथून निघून गेला.पण मध्यरात्री दरम्यान संध्याने पुन्हा सुजीतला कॉल केला.फोनवर तिने जे काही सांगीतले त्याच्या नंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ति त्या रात्री रजत सोबत पळूण जाणार होती.आणि तिलाही पुण्यातले फार काही माहीत नसल्याने तिला सुजितच्या मदतीची फार गरज होती.संध्याने त्याला मदतीसाठी खुप रिक्वेस्ट केली.सुजितची फार वाईट अवस्था होती.जिच्यावर तो इतके प्रेम करत होता तिला असे कोणाच्यातरी स्वाधीन करने त्याला अजिबात सहण होत नव्हते.पण त्याला संध्याला नाहीही बोलता येत नव्हते.अखेर त्याने विचार केला जर ही खरोखच पळून जात असेल तर पुन्हा कधीही आपल्याला भेटणार नाही.तिला शेवटचे पहाण्यासाठी तरी गेलेच पाहीजे.रात्री तीनच्या दरम्यान ती आहे त्या कपड्यांवर खिडकीतून उडी मारून पळून आली.त्यानंतर संध्या आणि रजत दिल्लीलाच जाणार होते पण ट्रेन किंवा बस मधे पकडले जाऊ या भितीने त्यांनी गोव्याला जाण्याचा प्लान केला. सुजीतने त्या दोघांना एक फोर व्हिलर अरेंज करून दिली आणि त्यानंतर ते दोघे निघून गेले.सुजित जिच्यावर जिवापाड प्रेम करत होता तिने एकदाही मागे वळून पाहीले नाही.तेव्हा त्याच्या लक्षात आले कि,”ज्या पाण्याच्या शोधात त्याने इतके दिवस वाया घालवले राना वनातुन भटकत राहीला ते पाणी पाणी नसूण फक्त एक भास होते एक मृगजळ होते”….. संध्याची गाडी दिसेनाशी होईपर्यंत तो तिच्याकडे पहात राहीला.आणि त्यानंतर तिथेच गुडघ्यावर बसूण धाय मोकलून रडू लागला व खुप दिवसांपासून मनात कोंडून घुसमटणा-या भावनांना अश्रूंवाटे वाट करूण दिली.त्यानंतर कसाबसा स्वतःला सावरत तो घरी पोहोचला.झालेल्या सर्व दगदगीत थकलेल्या शरीराला आणि तुटलेल्या मनाला नेऊन त्याने पलंगावर टाकले व त्याच्या गमावलेल्या प्रेमासाठी पुन्हा चादरीत तोंड घालून मुसमूसू लागला.काही केल्या झोप काही आली नाही संध्याच्या विचारांनी त्याच्या मनाची खुप तगमग होत होती.
त्यानंतर सकाळच्या साधारण सात वाजता संध्याच्या बहीणीचा फोन आला तिने त्याला ताबडतोब त्यांच्या घरी बोलवले.तो लगेचच आवरूण गेला.घरात गेल्या गेल्या संध्याचे बाबा सुजितच्या पायावर पडले.ते त्याला हात जोडून संध्या कुठे आहे विचारू लागले.त्यांची ती अवस्था सुजितला पहावली नाही.त्याने ती रजत सोबत गेल्याचे तिच्या घरच्यांना सांगीतले. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला दिल्लीला जाऊण घेऊण येण्याचा निर्णय घेतला.त्यांनी सुजितला ही सोबत येण्याची विनवणी केली.तो तेव्हाही त्यांना नाही म्हणू शकला नाही. अखेर ते सगळे दिल्लीला जायला निघाले.तिथे गेल्यावर त्यांना स्टेशनवर घेण्यासाठी रजतचे मोठे मेहुणे आले होते.रजतच्या घरी पोहोचल्यावर पाहीले तर त्यांच्याकडे संध्या आणि रजतच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती.त्यांचे घर,माणस , प्रोपर्टी शिवाय तो एकूलता एक पाहून संध्याच्या वडीलांचे मन वितळले आणि ते ही तिच्या लग्नात आनंदाने सहभागी झाले. त्यावेळी सुजितला झालेल्या त्रासामधे जे बाकी होते,ते म्हणजे संध्याचे लग्न तेही त्याच्या डोळयासमोर घडत होते आणि तो हतबल हताश होऊन ते सर्व त्याच्या मनातल्या वेदना लपवून पहात होता.त्याने स्वतःच्या डोळयासमोर संध्याचे लग्न होताना पाहील्यानंतर त्याच्या तिच्यावरच्या प्रेमाने तिथेच जीव सोडला.आणि प्रेम हा शब्द त्याच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला.त्यानंतर तो पुन्हा पुण्याला आला.पण त्याच्या अडचणी अजुनही संपल्या नव्हत्या.ऑफीस मधे न सांगता सुट्टी घेतल्याने त्याला गेल्या गेल्या टर्मीनेशन लेटर मिळाले. जेव्हा की,त्याचे घर पुर्ण पणे त्याच्या कमाईवर चालत होते.त्यानंतरही त्याने नोकरीसाठी खुप स्ट्रगल केले.पुढे त्याला पुण्यात रहाणे शक्य झाले नाही.शेवटी तो कायमचा पुणे सोडून त्याच्या गावी निघुन गेला.आई वडीलांची इच्छा म्हणून त्याने लग्नही केले.पण त्याच्या पत्नी सोबतही तो कधीच मनापासून प्रेम करू शकला नाही.एके काळी ज्या मुलाला लोक प्रेमात वेडा आहे असे म्हणत होते त्यालाच आज त्याचीच पत्नी त्याला प्रेम म्हणजे काय ते माहीत नाही असे म्हणते.संध्याच्या येण्याने आणि त्यानंतरच्या जाण्याने सुजितचे आयुष्य पुर्ण पणे विस्कटून गेले आणि संध्या मात्र तिच्या नवीन आयुष्यात खुप सुखी आहे.आता तर तिला सुजित नावाचा कोणी मुलगा आपल्यावर खुप प्रेम करत होता हे ही तिला आठवत ही नसेल…….

प्रेमातल्या वेदना मिळे पर्यंत खुप आनंदात राहत होतो ।।।
तुझ्या मागे-मागे फिरता फिरता स्वतःलाही पुर्णपणे विसरून गेलो होतो…..
तुझे प्रेम मिळवण्यासाठी नशीबाशी ही मी झगडत राहीलो…..
मृगजळसाठी व्याकूळतोय मी हे मात्र मी विसरून गेलो….
आता नाही आहेस तू माझ्या आयुष्यात याच खरच दुःख होत नाही….
कारण माझ खुप प्रेम होत तुझ्यावर हे तुला कधी कळालेच नाही……

Loading...
Please follow and like us:

Leave a Reply