लग्न गाठ

                     माझे लग्न माझ्या मर्जीने झाले कि, जबरदस्तीने मला नाही सांगता येणार पण, या लग्नाने मी म्हणावी तशी खुश नव्हतेच कधी. मंदार माझ्या आत्याचा मुलगा. त्यामुळे आम्ही एकमेकांपासून लहाणपणापासूनच आेळखायचाॆ. मंदार आणि मी तसे प्रत्येक सुट्टीला भेटायचो,एकमेकांसोबत खेऴायचोही पण तेव्हा आमचे फार पटायचे नाही. त्यामुळे असे कधीही वाटले नव्हते कि, पुढे जाऊन आम्ही कधी एकमेकांसोबत लग्न करू. खरे सांगायचे तर आमच्या दाॆघांचेही स्वभाव फार वेगवेगळॆ हाेते. मंदार मितभाषी, मोजकेच बोलणारा आणि मी प्रचंड बोलकी जे नको तेही बोलणारी. मंदारचे शांत रहाणे मला आवडायचे नाही. तेव्हा मला वाटायचे शाळेत हुशार असल्यामुळॆ भाव खात असेल म्हणून मीही नाही बोलायचे त्याच्या सोबत. तसेही मला कमी बोलणारे लोक आवडायचेच नाहीत. तसेच माझे खूप बोलणे मंदारलाही आवडायचे नाही वेगवेगळ्या स्वभावाचे असल्यामुळे आमच्यात प्रेम तर दूर कधी मैत्रीही झाली नाही. पण, तरीही आम्हाला लग्न करावे लागले आमच्या इच्छे विराॆधात जाऊण कारण, ती वेळच तशी हाेती माझी आत्या माझ्या बाबांची एकुलती एक बहीण. त्यामुळे बाबांचा तिच्यावर फार जिव हाेता. माझ्या लग्नाआधी आत्याला कँसर झाला आणि ती काहीच दिवस जगणार हाेती. आत्याची शेवटची इच्छ होती कि, मंदारचे लग्न हाेताना पहावे पण, तिच्याकडे वेळ फार कमी हाेता आत्याच्या नंतर मंदारला पहाणारे काेणीच नव्हते. कारण आत्याचे पतीही मंदार चार वर्षांचा असतानाच देवा घरी गेले हाेते. आमचे सर्वच नातेवाईक, आई बाबा मंदारच्या लग्नासाठी धडपडत हाेते. पण, कुठेच काही जुऴत नव्हते. आत्याच्या जीवाची मात्र तिच्या आजारपणापेक्षा मंदारच्या काळजीने तगमग व्हायची. बाबांना तिची ती अवस्था पहावली नाही आणि बाबा आत्याला म्हणाले, तुझी हरकत नसेल तर माझ्या “सईला” तूझी सून बनवूण घे. बाबांचा प्रस्थाव ऐकूण आत्या खुप खुश झाली. जसे काय बाबा अगदी तिच्या मनातील बाेलत होते. पुढे काहीदिवसांत घरातील सर्वांच्या इच्छेने आमचे लग्न झालेही. आमच्या मर्जीचा तर या लग्नात काही प्रश्नच नव्हता. आम्ही दाेघेही फक्त आत्यासाठी हे लग्न करत हाेताे. आमचे लग्न झाल्यावर फक्त दाेन महिन्यातच आत्या गेली. त्यानंतर त्या घरात मी खूप एकटी झाले हाेते. मंदार लग्न झाल्यास एकदाही माझ्या सोबत बोलला देखील नव्हता. काही विचारले तर फक्त हा, हं, ठीक आहे इतकेच उत्तर द्यायचा. कोणत्याही मुलीची लग्न झाल्यावर काही स्वप्ने असतात. माझीही होती पण मंदारला ते कधी कळालेच नाही. स्त्री असतेच पाण्यासारखी जो रंग तिच्यात मिसळला जातो ती त्या रंगाची होऊण जाते. मर्जीने नसले झाले तरी तेच माझ्या आयुष्याचे सत्य आहे हे मी स्विकारले होते. मंदारच्या अश्या तुटक वागण्यामुळे मला बाबांचा फार राग यायचा. पण नीट विचार केल्यावर कळायची बाबांची अवस्था. लाडकी बहीण मरणाच्या दारात उभी आहे पाहून कोणताही भाऊ तिची शेवटची इच्छा का पूर्ण करणार नाही. अश्या परीस्थीत कोणीही भाऊ आपले काळीज सुद्धा काढून देईल आणि मी तर फक्त त्यांच्या काळजाचा एक छोटासा तुकडा हाेते. त्यांच्या जागी मी असते तर कदाचीत मीही हेच केले असते. पण कधी कधी वाटते इच्छा पूर्ण झाल्यासारखे आत्याने तरी आणखी जगायला पाहीजे हाेते. मी किती एकटी पडली आहे तिच्याशिवाय. तिच्या दोन महिन्याच्या जगण्यासाठी माझ्या सबंध आयुष्याची माती झाली. मंदारला समजवू शकतील असे बाबांच्या शिवाय दुसरे काेणीच नव्हते. पण, बाबांना मी काय सांगणार कि, माझा नवरा माझ्यासोबत बाेलत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही. मनाच्या तगमगीमध्ये दिवस जात हाेते. सहणही होत नाही आणि सांगूही शकत नाही अशी अवस्था होती माझी.
मंदार आणि बाबांचे खूप छान पटायचे. बाबा माझ्या घरी आले कि, मंदार आणि बाबा गच्चीवर जाऊन बसायचे. मी नाही त्या दाेघांना कधी डिस्टर्ब केले. मी आणि आई खालीच थांबून घरातील सर्व कामे आवरायचो आणि कामे झाली कि, छान गप्पा मारत बसायचो. कधी कधी वाटायचे आमच्या या अश्या नात्याबद्दल आईला तरी सांगावे पण, आईचा या लग्नाला आधीच विराेध हाेता ती उगाच बाबांना काही तरी बालेल या भीतीने मी तीलाही काही बोलू शकायचे नाही. आई बाबा जाताना मात्र फार रडू यायचे. मंदार घरात एकटे असायचे त्यामुळे मला माहेरीही मनसोक्त रहाता यायचे नाही. दाेन दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले कि, बाबा विचारायचे मंदार येणार आहे का घ्यायला. मला कळायचे कि, बाबांना मंदारची काळजी वाटते. मी बाबांना म्हणायचे नाही बाबा तुम्ही चला ना सोडायला! मंदारला सुट्टी नाही. पुढे पुढे मी माहेरीही जाणे साेडून दिले आणि आहे त्या परिस्थीतीला स्विकारून जगू लागले.
आत्या असे पर्यंत तिला काही हवे नकाे ते पहाता यावे म्हणून मी तिच्यासाेबत तिच्या खोलीतच झाेपायचे. ती गेल्यानंतर मात्र मला तिथे झाेपायची फार भीती वाटायची. स्वतःहून मंदारच्या खोलीत जाऊन झोपायला कसे तरी वाटायचे आणि तोही कधी म्हणाला नाही माझ्या खोलीत येऊण झाेप. लग्नाआधी मला एकटे झोपण्याची सवयच नव्हती माझी छाेटी बहीण आणि मी आम्ही एका खोलीत झोपायचाे. आत्या गेल्यानंतर काही दिवस सतत काेण ना काेण असायचे आमच्या घरी त्यामुळे काहीच वाटायचे नाही. पण, नंतर सगळे गेल्यावर मात्र माझे फार अवघड हाेऊ लागले हाेते. एकटीला आत्याच्या खोलीमधे झोप काही लागायची नाही मग मी हॉलमधे येऊन झोपले. पण तिथेही मला झाॆप लागत नव्हती. लाईट घालवून झोपण्याची तर माझ्यात हिंमतच नव्हती. आणि चालू ठेऊन मला झाेपच येत नव्हती. रात्रीचे साधारण एक वाजले असतील मंदार पाणी पिण्यासाठी उठला. मी जागी आहे बघून तो काहीच बाेलला नाही. मला खूप रडू आले नवरा म्हणून नाही निदान माणूस म्हणून तरी त्याने मला इथे का झोपलीस असे विचरले नाही म्हणून. काही वेळाने मंदार पुन्हा बाथरूमला जाण्यासाठी उठला तेव्हाही मी जागीच हाेते बाथरूम वरून आल्यावर मंदार पुन्हा स्वतःच्या खाेलीकडे जाऊ लागला. मी त्यांच्याकडे पाहून निराश हाेऊण डाेळे मिटून घेतले मंदार खाेलीच्या दरवाज्या पर्यंत गेला आणि मागे वळून मला म्हणाला सई तूला एकटीला झाेप येत नसेल तर, तू माझ्या खोलीत येऊण झाेपू शकतेस असे म्हणून तो निघून गेला. मग काय मी काहीही न बाेलता गुपचूप त्याच्या खोलीकडे गेले. काय करणार काही पर्यायाच नव्हता माझ्याकडे. खाेलीत गेल्यावर मी माझा बिछाना करू लागले. ते पाहून मंदार म्हणाला खाली का झोपतेस बेडवर येऊण झापू शकतेस तू अर्थात तूझी हरकत नसेल तर तसेही मला फार काही जागा लागत नाही. त्यानंतर मी बेडवर जाऊण झाेपले. थाेडेसे अवघडले होतो दाेघेही त्यामुळॆ जरा सावरतच बेडचा एकएक काेपरा पकडून झाेपू लागलो. जरावेळाने दाेघांनाही छान झाेप लागली. सरकत सरकत आम्ही बेडच्या मध्यापर्यंत कधी आलो कळालेच नाही आणि काही वेळाने झाेपेत असताणा मंदारचा हात माझ्या अंगावर पडला मला पटकन जाग आली. भितीने छाती धडधडू लागली. मी हळूच तिरक्या नजरेने मंदारकडे पाहीले तर तो गाढ झोपला होता. मी त्याचा हात अलगद बाजूला केला आणि पुन्हा माझ्या कोप-या कडे सरकले आणि झोपले. काही वेळाने मंदार सरकत सरकत पुन्हा माझ्या जवळ आला आणि पुन्हा त्याचा हात माझ्या अंगावर पडला. मी तिथून उठून पुन्हा मंदार झोपलेला त्या बाजूला जाऊण झाेपले खूप राग येत हाेता मला त्याचा, काय म्हणाला हाेता मला नाही फार जागा लागत आणि आता पूर्ण बेडवर लोळतोय गधडा. जरा झाेप लागली कि, कधी त्याचा हात तर कधी पाय माझ्या अंगावर येतच हाेता. सगळया झोपेची वाट लावली माझ्या आणि स्वतः मात्र असा झोपलेला जसे काय सगळे घोडे विकून झाले आहेत त्याचे. कुंभकरणही फिका पडेल असा झाेपला हाेता सोंडक्या. मला खूप झाेप आली हाेती . मध्यरात्र निघूण गेली तरी त्याचे असेच चालू हाेते शेवटी थकून मी झाेपून गेले मनात म्हणाले, आता येऊदे कितीही हात आणि पाय पण आता मी नाही उठणार. पहाट होऊण गेली सकाळचे आठ वाजले असतील आम्ही दोघेही गाढ झोपले होतो. दारावर जाेरजाेरात बेल वाजू लागली. त्या आवाजाने आमच्या दाेघांनाही एकदम जाग आली. त्यावेळी आम्ही दोघेही एकमेकांच्या कुशीत हाेताे. मला खुप लाजल्या सारखे झाले मी पटकन उठून दरवाजाकडे गेले दुधावाला आला हाेता. बराच वेळ बेल वाजवावी लागल्याने वैतागून तो बडबड करत हाेता. पण मी मात्र वेगळ्याच मूड मध्ये हाेते माझे त्याच्या बाेलण्याकडे जराही लक्ष नव्हते. काही तरी झाले हाेते त्यादिवशी काय ते मलाच कळत नव्हते.
मनातून रंगीबेरंगी फूलपाखरे उडल्यासारखेे वाटत होते. हे असे माझ्यासोबत पहील्यांदाच झाले होते. मनात वाटले हे सर्व मंदारचे माझ्या इतक्या जवळ येण्याने तर झाले नसेल ना? इशशशश म्हणजे मी प्रेमा-बिमात पडले कि काय त्याच्या? तसे असेल तर फार बरे होईल निदान आत्याचे स्वप्न पुर्ण झाल्याचे समाधान तेव्हाच ख-याअर्थाने मिळेल मला.
दिवसाची सुरुवात तर छान झाली अगदी नव्या उमेदीमध्ये. मी पटापट आवरले आणि नाष्टा बणवून डायनिंग टेबलावर मंदारची वाट पहात बसले. मनात वाटले कि, काल रात्री नकळत आम्ही एकमेकांच्या जवळ आल्यामुळे जे काही मला वाटत हाॆते तेच मंदारलाही वाटत असेल कदाचीत. तसे काही वाटत असेल तर आज तो नक्कीच माझ्या जवळ व्यक्त हाेईल. मी आतूरतेने मंदार व्यक्त होण्याची वाट पहात होते. अंघोळ देवपुजा करून मंदार टेबलवर आला मी लाजत लाजतच त्याला नाष्टा दिला. खायला सुरुवात करण्याआधीच मंदार माझ्या साेबत बोलू लागला म्हणाला, सई काल रात्री जे झाले त्या बद्दल साॅरी. खरतर मला झोपेत अंगावर पाय टाकून झाेपण्याची सवय आहे. जाणून बुजून नाही केले मी, मी मुद्दामच तुझ्यापासून हे लपवले कारण, मला तू एकटी झाेपायला घाबरत आहेस असे वाटले. पण, खरच साॅरी आईची शेवटची इच्छा म्हणून तू माझ्या साेबत लग्न केलेस. हा तुझ्या मनाचा खूप माेठे पणा आहे. तुझे उपकार कसे फेडू माझे मलाच कळत नाही. पण, मला नाही आवडत काेणाच्या इच्छे विरुद्ध काहीही करायला. जेव्हा आपले लग्न झाले तेव्हा मला काहीही करता आले नाही. पण, अजून वेळ गेली नाही आपण वेगळे हाेऊ मी तूला घटस्पोट देऊन तूला या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त करताे. मामालाही मी समजावेन. आणि हो घटस्पोट हाेईपर्यंत इथे थांबण्याची काही गरज नाही. तूला जायचे असेल तुझ्या घरी तर जाऊ शकतेस. मंदार बाेलत हाेता तेव्हा मला खूप रडायला येत हाेते. मी रडतही हाेते पण, मंदार हे सर्व एखाद्या अपराध्या सारखा मान खाली घालूण बाेलत हाेता त्यामुळे त्याला मी रडत असल्याचे दिसलेच नाही आणि माझ्या भावना ही त्याच्या पर्यंत पोहोचल्याच नाहीत .बोलून झाल्यावर मंदार कामाला निघून गेला.
त्यादिवशी खुप विचार करून पर्याय नसल्याने हताश होऊण मी माझ्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.
मंदारच्या बोलण्यावरून हे तर स्पष्ट झाले होते कि, त्याला माझ्या बद्दल काहीही वाटत नाही. आता तिथे थांबण्यात किंवा माझे प्रेम त्याच्याकडे व्यक्त करण्यात काहीही तथ्य उरले नव्हते. घर साेडताना मात्र आत्याची खूप आठवण येत हाेती. तिची इच्छा अर्ध्यातूनच सोडून जाताना मनाला खूप यातना होत हाेत्या. पण कोणत्याही नात्याची पकड दोन्ही कडून सारखीच असावी लागते हे माझ्या चांगलेच लक्षात आले होते. आज आत्या असती तर तिलाही माझे म्हणने पटले असते. थोड्यावेळाने मी माझी बॅग भरायला घेतली. कपाटातून माझे कपडे काढताना अचानक एक डायरी माझ्या समोर पडली. काय आहे पाहण्यासाठी मी ती उघडून पाहीली. ती डायरी मंदारची हाेती त्यात त्याने त्याच्या पाहील्या प्रेमाबाद्दल लिहीले हाेते. खूप छान वर्णन केले हाेते त्याने तिचे. डायरीचा प्रत्येक शब्द मंदारचे तिच्यावर किती प्रेम आहे हे स्पष्ट करत होता. मंदारने अगदी तिच्या लहानपणा पासूनचे सर्व काही त्यात लिहीले होते. लहानपणी सर्दी झाल्यावर तिचे नाक लाल हाेण्यापासून ते माेठी झाल्यावर नख-यात नाक मुरडे पर्यंत. डायरी वाचून मला मंदार आणि त्याच्या प्रेमावर दया येऊ लागली. आत्यासाठी त्याने त्याच्या प्रेमाचा बळी दिला याची जाणीव होऊन खुप वाईट वाटले. मग वाटले जाऊदे माझ्या जाण्याने त्याला त्याचे प्रेम मिळणार असेल तर माझे जाणे ख-याअर्थाने सार्थकी लागेल. मंदारच्या प्रेमाच्या आड आल्याचे फार दुःख वाटत होते मला. त्याच्या आणि त्याच्या प्रेमासाठी काय करता येईल याचाच विचार करत असताना पुढेपुढे डायरी वाचत गेल्यावर लक्षात आले कि, मंदारचे पहीले प्रेम दुसरे तिसरे काेणी नसूण मीच होते. हे कळाल्यावर मात्र मला आनंदाने नाचू वाटत होते. खरतर मी त्याचे प्रेम स्विकारनार नाही या भीतीने तो माझ्याकडे याबद्दल कधीही व्यक्त झाला नव्हता. त्याने त्यात लिहले होते मी असा शांत, मितभाषी आणि ती बाेलकी, चंचल तिला मी कसा आवडेन? मामाकडे गेल्यावर मी पहात रहायचो तिच्याकडे तासन तास पण तरीही तिच्यापर्यंत माझे प्रेम कधी पोहोचलेच नाही. कदाचीत मी तिच्या स्वप्नातला राजकुमार नसेन. आमच्या लग्नाबद्दल त्याने लिहीले हाेते बिचारी सई तिच्या मनाचा तर काेणीच विचार करत नाही. आईच्या इच्छेसाठी तिने खुप माेठे बलिदान दिले आहे. पण मी तिचे बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही. मी तिच्यावर जगातील काेणत्याही नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम करेन, खूप सुखात ठेवेन मी तिला. पुढे हे ही लिहीले हाेते लग्न झाल्यापासून सई माझ्यासाेबात एकदाही बोलली नाही. कदाचीत ती खुश नाही आहे या लग्नामुळे. सतत बडबड करणारी माझी सई अशी शांत बसलेली नाही पहावत मला. मला तिला पुन्हा पहील्यासारखी पहायचे आहे. त्यामुळे लवकरच मी तिला या मजबुरीतून केलेल्या लग्नातून मुक्त करणार आहे.
डायरी वाचून हसावे कि, रडावे काहीही कळत नव्हते. मी वेड्यासारखी हसत हसत रडू लागले. काेणाशी काही न बाेलणारा माझा मंदार डायरी मध्ये खूप काही बाेलत हाेता. जर मी डायरी पाहीली नसती तर, त्याचे प्रेम माझ्यापर्यंत कधी पाहाचलेच नसते. आणि मी मुर्ख गेले असते निघूण माहेरी. आणि आम्ही दोघे प्रेम करत असूणही वेड्यासारखे गैरसमजूतीत जगत राहीलो असतो. किती विचार करायचा मंदार माझा, माझ्या भावनांचा आणि मी मात्र त्याच्या बद्दल काहीही विचार करत हाेते. त्याच्या अश्या माझ्याबद्दल इतका विचार करण्याने प्रेम तर करू लागलेच हाेते पण त्यासाेबत आदरही करू लागले मी त्याचा.
मग पुढे काय माहेरी जाण्याचा प्लॅन कँसल झाला आणि मी मंदार घरी येण्याची आतुरतेने वाट पाहू लागले. कारण, मला तेव्हा जराही वेळ वाया न घालवता माझे प्रेम त्याच्याकडे व्यक्त करायचे हाेते आणि त्याच्या ताेंडूनही प्रेमाचे ते तीन गाेड शब्द ऐकायचे हाेते. आणि नव्याने आमच्या नात्याची सुरुवात करायची होती. शिवाय, त्यादिवासाला मला खूप स्पेशलही बनवायचे हाेते म्हणून, मी एक युक्ती केली. संध्याकाळ झाली प्लॅन रेडी होता. मंदारच्या गाडीचा आवाज ऐकून मी पटकन आमच्या खोलीमधे लपून बसले. मंदार बराच वेळ दरवाजा वाजवत होता मी दरवाजा उघडत नाही पाहुन ताे त्याच्याकडच्या चाव्यांनी दरवाजा उघडून आत आला. मी त्याला आमच्या खोलीच्या दरवाजाच्या फटीतून पहात हाेते. घरात आल्या आल्या त्याने लाईट लावली आणि जड पावलांनी सोफ्यावर जाऊन बसला मी घरात नाही पाहून त्याला वाटले मी खरचच माझ्या आई बाबांच्या घरी गेली असेन. अचानक असा एकटा पडल्याने मनात साठलेल्या सर्व भावनांना त्याने अश्रुंवाटे माोकळे करून दिले. त्याला रडताना पाहून मलाही रहावत नव्हते. क्षणभर वाटले धावत जावे आणि त्याला प्रेमाणे मिठीत घ्यावे. पण, मला माझा प्लॅन विसकटू द्यायचा नव्हता. काही वेळाने मंदार फ्रेश हाेण्यासाठी बाथरूम मध्ये गेला आणि कपडे घेण्यासाठी आमच्या खोलीकडे आला. मी आमची खोली छान फुलांनी सजवली होती ते पाहून मंदारला आश्चर्य वाटू लागले काय चालले होते त्याला काहीच कळत नव्हते. तो आश्चर्यामधे असतानाच मी आमच्या लग्नात जशी तयार झाले हाेते अगदी तशीच तयार हाेऊन कपाटाच्या आडून हातात त्याची डायरी घेऊन त्याच्यातील एक कविता वाचत बाहेर आले.

मी आहे थाेडासा अबोल शांत
मग माझे प्रेम तिच्यापर्यंत कधी पाेहचेल का ?
राेज झुरतो मी तिच्यासाठी
काहीही न बोलता मग माझ्या वेड्या मनाची तगमग ‘ तिला कधीतरी समजेल का ?

मंदारने माझ्याकडे पाहीले हसला आणि माझ्या हातातून ती डायरी घेऊन म्हणाला, असे कोणाच्याही डायरीला त्याच्या परवानगी शिवाय हात लावू नये. मी म्हणाले हाे का? पण बायकाे आहे आता मी तुझी तूझ्या प्रत्येक गाेष्टी वर माझाही सम समान हक्क आहे. मंदार म्हणाला अच्छा हाे का? मग हाच नियम मलाही लागू हाेत असेल नाही का? मी पटकन म्हणाले हाे अर्थातच मंदार हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागला आणि म्हणाला, नक्की ना? मी थाेडी घाबरून म्हणाले हाे….. पण, तू असा पुढे पुढे का येत आहेस? मंदार म्हणाला तूच तर म्हणालीस ना माझे सर्व तुझे आणि तुझे सर्व माझे. मी म्हणाले हाे, मग? मंदार उसासा टाकत म्हणाला हं मग, मग काय ते सांगताे ना तूला आता. तो माझ्या खुप जवळ आला आणि म्हणाला मग बायको डायरी वाचून तुला माझ्या भावना कळाल्याच असतील नाही का? मी मान हलवून त्याला हो म्हणून सांगीतले. मंदार म्हणाला डायरीमधे मनामधे खुप वेळा व्यक्त झालो आहे मी तुझ्याजवळ पण आज समोर बोलतो माझे खुप प्रेम आहे तुझ्यावर. ते ऐकून माझ्या डोळयातून आनंदाच्या अश्रूचा एक थेंब ओघळत गालावर आला भरलेल्या डोळयांनी मी त्याच्याकडे पाहून म्हणाले माझेही तुझ्यावर खुप प्रेम आहे. मंदारने माझे अश्रू पुसत विचारले का रडतेस वेडा बाई? मी म्हणाले मुर्ख तूला आधी बोलायला काय झाल होत मी आज निघून जाणार होते. मंदारन मला म्हणाला माझे प्रेम खरे होते त्यामुळे ते कसे ना कसे तुझ्यापर्यंत पोहोचलेच असते. मी म्हणाले हो का येडू पण खरच आय लव्ह यू ते ऐकून मंदार म्हणाला बास हेच ऐकण्यासाठी कान आतूर झाले होते माझे. मी लाजून त्याच्या समोरून जात जात म्हणाले मी जेवण वाढायला घेते. मंदारने माझा हात पकडून मला त्याच्या जवळ ओढले आणि म्हणाला, पोट भरले आहे माझे आता काही तरी गोड खावेसे वाटत आहे. मी म्हणाले अच्छा हो का मग थांब मी फ्रिज मधून आईसक्रीम घेऊन येते. मंदारने पुन्हा मला अडवले आणि म्हणाला, कशी ग अशी तू कधी कळणार तुला? मी म्हणाले म्हणजे? मंदारने मला उचलून बेडवर नेले आणि म्हणाला म्हणजे काय ते कळेल आता तूला. मी लाजून माझा चेहरा त्याच्या छातीजवळ लपवला मंदारने माझ्या हनूवटीला पकडून माझा चेहरा त्याच्या चेह-याकडे वळवला. आणि म्हणाला काय झाल? अरे देवा लाजतीयेस होय तू? वा येते होय तूला लाजायला. लाजून मी गालातल्या गालात हसू लागले. हसता हसता आम्ही दाेघेही एकमेकांकडे अचानक एकटक पाहू लागलो. सबंध घरामधे एक गोड शांतता पसरली. आपोआप आमचे ओठ एकमेकांच्या ओठात गुंतले. थोड्यावेळाने मंदार बाजूला होऊन माझ्याकडे पाहू लागला. त्याने माझ्या चेह-यावरचे केस बाजूला केले. लाजेने मी त्याच्याकडे पहातही नव्हते. त्यानंतर आम्ही पहील्यांदा नवरा बायको म्हणून आणखी जवळ आलो. मग काय घरातील त्या गोड शांततेत बांगड्यांच्या किणकिणीचा आवाज कानाला सुखावू लागला. एकमेकांच्या श्वासात गुंतणारे आमचे गरम श्वास आम्हा दोघांनाही बेभान करू लागले. माझ्या नखांनी त्याच्या शरीरावर हाेणाऱ्या त्या प्रेमाच्या खुणा आणि त्याच्या ओठांनी माझ्या शरीरावर काेरलेले त्याचे प्रेम यात ती रात्र आणि त्यासाेबत सबंध आसमंत बहरून गेला. मनाने आणि शरीराने त्याच दिवशी आम्ही खऱ्याअर्थाने एक झालो.
मंदार आणि मी आज एक सुखी दांपत्य आहाेत मजबुरीने जरी आम्हाला लग्न करावे लागले असले तरी आज आम्ही एकमेकांशिवाय एक क्षणही रहात नाही. विशेष म्हणजे मी माहेरीही जात नाही.खर सांगू मलाच करमत नाही ह्या वेड्याशिवाय आणि जर चुकून गेलेच तर रात्री लगेचच घ्यायला येताे हा वेडा. हल्ली तर काय त्याच्या या अश्या वागण्याने घरातील सगळेच आम्हाला चीडवू लागले आहेत. काय, काय बोलत असतात आम्हाला लव्ह बर्ड्स,लैला-मजनू, हिर-रांझा आणि काय काय. आणि हाे आणखी एक महत्वाचे हा न बोलणारा मितभाषी, अबोल वाटणारा माझा नवरा अजिबात तसा नाही हा! बाबा…..किती बोलतो हा अक्षरशः गप्प बसायला सांगावे लागते त्याला. कधी कधी तर ताॆ बडबडत असताे आणि मी झाेपूनही जाते. हल्ली तो डायरीही लिहीत नाही. खरतर आजवर तो फक्त डायरीमधे व्यक्त व्हायचा आणि आता त्याची खरी डायरी भेटली आहे ना त्याला त्यामुळे मनसोक्त बोलतो तिच्यासोबत.
चला थोडा वेळ लागला पण सगळे कसे छान झाले. एकंदरीत काय लग्न गाठी ह्या स्वर्गातूनच बांधल्या जातात. त्यांना जोडणारी इथली माणसे मात्र फक्त निमित्त असतात.

Loading...

मनापासून कि, मनाविरूद्ध माझे मलाच कळाले नाही, कर्तव्यासाठी बोहल्यावर चढले पण माझे मन जाणून घ्यावे असे वाटलेच नव्हते कोणालाही……
हेच माझे नशीब म्हणून मग जगू लागले निमूटपणे,
स्विकारत गेले सारे काही अण् संसारामधे विरू लागले…..
चुकून असेच मग जवळ आलो आणि तुझ्यावरच्या प्रेमाची मला जाणीव झाली,
माझे मलाच कळाले नाही कशी नकळत मी तुझी होत गेली…..
उपकारांची जाणीव होऊन मुक्त करावेसे वाटले तुला मला,
मी निघाले जेव्हा सोडून तूला नेमका तेव्हाच माझा तूझ्या अव्यक्त प्रेमाशी सामना झाला…
समजून गेल्या तुझ्या सर्व भावना मला आणि जणू नवा जन्मच मला मिळाला,
तूझ्या प्रेमात हरवलेल्या मला मात्र तूझ्यातला तू नखशिखांत कळाला.
परिस्थीतीने एकमेकांचे झालो तरी प्रेमाने आपण आणखी जवळ आलो,
एकमेकांपेक्षा वेगळे असलो तरी, आज एकमेकांचे जन्माचे सोबती झालो.

Loading...

Please follow and like us:

Leave a Reply