श्री शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग)

श्री शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग)

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर आढळणार एकमेव शिवरायांच मंदिर ” श्री शिवराजेश्वर मंदिर” या मंदिराची स्थापना इ.स.१६९५ मध्ये राजाराम महाराजांनी केली होती.

या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील शिवरायांची मूर्ती हि शिवशंकरांच्या रुपात आहे.

Loading...

या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज्यांची जी मूर्ती आहे,  तिच्या डोक्यावर मंदिल आहे. पद्मासनावर बसलेली मूर्ती एका हाताने आचमन करीत आहे तर दुसरा हात गुडघ्यावर आहे. हातात कडे आहे. मूर्तीच्या बाजूला दोन तलवारी, ढाल, जिरेटोप ठेवलेला आहे.

Loading...

या मंदिराच्या प्रशस्त सभा मंडप पुढे इ.स. १९०६ \ ०७ च्या मध्ये  छत्रपती शाहू महाराजांनी बांधला.

करवीर छत्रपतींच्या वतीने मंदिरात प्रतिवर्षी जिरेटोप, वस्त्रे अर्पण केली जातात.

तसेच किल्ल्यावरील शिवरायांच्या हाताच्या ठशाचा चांदीचा छाप बनविण्यात आला असून त्याची नित्यपूजा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात होते.

Please follow and like us:

Leave a Reply