देवघरातील या गोष्टींकडे लक्ष दिल्यास सुख-समृद्धी कधीही नष्ट होणार नाही

*देवघरातील या गोष्टींकडे लक्ष दिल्यास सुख-समृद्धी कधीही नष्ट

होणार नाही*

1. पूजा करतना कोणत्या दिशेला असावे आपले मुख ?

घरामध्ये पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघराचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

2. देवघरापर्यंत पोहोचावा सूर्यप्रकाश

घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

3. देवघरात घेऊन जाऊ नयेत या वस्तू

घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पुजेशी संबंधित सामानच ठेवावे.

Loading...

4. देवघराच्या जवळपास बाथरूम किंवा शौचालय नसावे

घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे. जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तेथे थोडीशी एका व्यक्तीला बसत येईल एवढी तरी जागा मोकळी सोडावी.

5. पूजा झाल्यानंतर संपूर्ण घरात थोडावेळ घंटी अवश्य वाजवावी

घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.

Loading...

6. पूजन सामग्रीशी संबंधित खास गोष्टी

पूजेमध्ये शिळे, सुकलेले फुल-पान अर्पण करू नये. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा. या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही. त्यामुळे यांचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो. इतर सामग्री ताजीच असावी. एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झाले असेल तर देवाला अर्पण करू नये.

7. दररोज रात्री देवघरावर पडदा टाकावा

दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघर पडदा टाकून झाकावे. ज्याप्रकारे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही, ठीक त्याच भावनेने मंदिरावर पडदा टाकावा.

8. सर्व मुहूर्तावर करा गोमुत्राचा हा उपाय

वर्षभरात जेव्हाही श्रेष्ठ मुहूर्त येतात, तेव्हा संपूर्ण घरामध्ये गोमुत्र शिंपडावे. गोमुत्र शिंपडल्याने पवित्रता कायम राहते आणि वातावरण सकारात्मक बनते. शास्त्रानुसार गोमुत्र अत्यंत चमत्कारिक प्रभाव टाकते आणि या उपायाने दैवी शक्तीची विशेष कृपा राहते.

9. खंडित मूर्ती देवघरात ठेवू नका

शास्त्रानुसार खंडित(भंगलेल्या) मूर्तींची पूजा वर्ज्य मानली गेली आहे. खंडित झालेली मूर्ती देवघरातून काढून एखाद्या पवित्र नदीमध्ये विसर्जित करावी. खंडित मूर्तीची पूजा अशुभ मानली जाते. या संदर्भात एका गीष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, शिवलिंग कधीही कोणत्याही अवस्थेत खंडित मानले जात नाही.

10. देवघरात कोणत्या मूर्ती ठेवाव्यात

देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. इतर देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत.

देवपूजा झाल्यानंतर करावयाच्या कृती

अ. कर्पूरदीप लावणे :

पंचोपचार पूजनामध्ये ‘कर्पूरदीप लावणे’ हा उपचार नसला, तरी कर्पूर हा सात्त्विक असल्याने कर्पूरदीप लावल्याने अधिक सात्त्विकता मिळण्यास साहाय्य होते. यासाठी नैवेद्य दाखवून झाल्यावर कर्पूरदीप लावू शकतो.

आ. शंखनाद करून देवतेची भावपूर्ण आरती करावी.

इ. आरती ग्रहण केल्यानंतर नाकाच्या मुळाशी विभूती लावावी.

ई. तीन वेळा तीर्थ प्राशन करावे. उजव्या हाताच्या पंज्याच्या मध्यभागी तीर्थ घेऊन प्यायल्यावर हाताचे मधले बोट आणि अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत अन् मग ती कपाळावरून डोक्यावर सरळ वरच्या दिशेने फिरवावीत.

उ. शेवटी प्रसाद ग्रहण करावा आणि नंतर हात धुवावेत.

देवाला नैवेद्य अर्पण करण्याची कृतीपद्धत

२ – भावाच्या स्तरावरील :

देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे देवाच्या चरणी वहावे.

‘ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।।’,

हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणत हात जोडून देवाला नैवेद्य समर्पित करावा.

त्यानंतर ‘नैवेद्यमध्येपानीयं समर्पयामि ।’, असे म्हणून उजव्या हातावरून ताम्हनात थोडे पाणी सोडावे आणि परत ‘ॐ प्राणाय…’,

हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणावा.

त्यानंतर `नैवेद्यम् समर्पयामि, उत्तरापोशनम्् समर्पयामि, हस्तप्रक्षालनम् समर्पयामि, मुखप्रक्षालनम् समर्पयामि’,

असे म्हणत उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.

‘आपण अर्पण करत असलेला नैवेद्य देवतेपर्यंत पोहोचत आहे आणि देवता तो ग्रहण करत आहे’, असा भाव नैवेद्य दाखवतांना असावा.

देवाला नैवेद्य अर्पण करण्याची कृतीपद्धत

१ – कर्मकांडाच्या स्तरावरील :

देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे देवाच्या चरणी वहावे. त्यानंतर आपल्या डाव्या हाताचा अंगठा डाव्या डोळ्यावर आणि डाव्या हाताची अनामिका उजव्या डोळ्यावर ठेवून डोळे मिटावेत

आणि ‘ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानायस्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।।’,

हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणत उजव्या हाताच्या पाचही बोटांच्या टोकाने नैवेद्याचा वास देवाकडे न्यावा.

देवतेला नैवेद्य दाखवणे

अ. नैवेद्यासाठीचे पदार्थ बनवतांना तिखट, मीठ आणि तेल यांचा वापर अल्प करावा अन् तुपासारख्या सात्त्विक पदार्थांचा वापर अधिक करावा.

आ. नैवेद्य दाखवण्यासाठी केळीचे पान घ्यावे.

इ. नैवेद्यासाठी सिद्ध केलेल्या पानात मीठ वाढू नये.

ई. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी ते अन्न झाकून ठेवावे.

उ. नैवेद्य दाखवतांना प्रथम इष्टदेवतेला प्रार्थना करून देवासमोर भूमीवर पाण्याने चौकोनी मंडल करावे आणि त्यावर नैवेद्याचे पान (किंवा ताट) ठेवावे. नैवेद्याचे पान ठेवतांना पानाचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करावे.

ऊ. नैवेद्य दाखवतांना ताटाभोवती एकदाच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पाणी फिरवावे. (पाण्याचे मंडल काढावे.) परत उलट्या दिशेने पाणी फिरवू नये.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धर्म असे का सांगतो ?’ या ग्रंथमालिकेतील भाग ३ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र)

देवतेला दीप ओवाळणे

अ. देवाला निरांजनाने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा सावकाश ओवाळावे. याच वेळी डाव्या हाताने घंटी वाजवावी.

आ. दीप लावण्याच्या संदर्भात हे लक्षात घ्या !

१. दीप प्रज्वलित करतांना एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये.

२. तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावू नये.

३. देवघरातील तेलाच्या दिव्याची वात प्रतिदिन पालटावी.
देवतेला धूप दाखवणे.

अ. देवाला धूप दाखवतांना तो हाताने पसरवू नये.

आ. धुपानंतर त्या त्या देवतेचे तत्त्व जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेऊ शकतील अशा गंधांच्या उदबत्त्यांनी त्या त्या देवतेला ओवाळावे, उदा. शिवाला हीना आणि श्री लक्ष्मीदेवीला गुलाब.

इ. धूप दाखवतांना तसेच उदबत्तीने ओवाळतांना डाव्या हाताने घंटी वाजवावी.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धर्म असे का सांगतो ?’ या ग्रंथमालिकेतील भाग ३ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र ’)

देवपूजा करतांना भाव कसा ठेवावा ?

अ. प्रभू श्रीरामाच्या भक्तांपैकी हनुमान हा सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून ओळखला जातो, तो त्याच्या दास्यभक्तीमुळे. दास्यभक्ती आपल्यात निर्माण होण्यासाठी श्रद्धायुक्त अंतःकरणाने शरणागत होऊन देवतेची पूजा करावी.

आ. आपल्या हृदयातील हरीची यथासांग पूजा करावी. आपल्या अंतःकरणात ज्या श्रीरामाची आपण पूजा केली,
त्या ईश्वराचे प्रतिबिंब त्या मूर्तीत आहे, असे ध्यान करावे.

श्रीरामप्रभूच्या मूर्तीची पूजा करतांना आपण राममय आहोत, असे अखंड ध्यान करावे.’ –

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

कर्मकांडाच्या स्तरावरील देवपूजा

देवतेला पत्री आणि फुले वहाणे

देवघरातील देवतांना फुले वहातांना आपल्या उपास्यदेवतेचे नाम घेऊन ताटातील छोट्या परंतु भडक रंगाच्या फुलाने आरंभ करून त्यानंतर मध्यम परंतु फिकट रंगाच्या फुलाकडे जाऊन त्यानंतर सर्वांत शेवटी मोठ्या आकाराच्या पांढर्‍या फुलाकडे जावे.

देवतांच्या क्रमामध्ये शंकूच्या मध्यबिंदूशी ठेवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीला / चित्राला फूल वाहून मगच पुढच्या म्हणजे द्वितीय स्तराला प्रथम पुरुष मुख्य देव आणि त्याला समांतर स्त्रीशक्ती देवता किंवा त्या देवाची उपरूपे यांना फुले वहावीत.पंचोपचार पूजनाची कृती कर्मकांडाच्या स्तरावरील देवपूजादेवतेला गंध (चंदन) आणि हळदी-कुंकू वहाणे

प्रथम देवतेला अनामिकेने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने) गंध लावावे. त्यानंतर हळदी-कुंकू वहातांना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा अन् अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवतेच्या चरणांवर वहावे.

कर्मकांडाच्या स्तरावरील देवपूजा

देवतेला पत्री आणि फुले वहाणे

अ. देवाला कागदी, प्लास्टिकची यांसारखी खोटी, तसेच शोभेची फुले वाहू नयेत, तर ताजी आणि सात्त्विक फुले वहावीत.

आ. देवाला वहावयाची फुले आणि पत्री यांचा गंध घेऊ नये.

इ. देवतेला फुले वहाण्याच्या पूर्वी पत्री वहावी.

ई. त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारी पत्री आणि फुले त्या त्या देवतेला वहावीत,

उदा. शिवाला बेल आणि श्री गणेशाला दूर्वा अन् लाल फूल. श्री गणपतीला दूर्वा वहातांना मुख सोडून श्री गणपतीची संपूर्ण मूर्ती दूर्वांनी मढवून टाकतात. दिवसातून तीन वेळा दूर्वा पालटतात. त्यासाठी दिवसात तीन वेळा पूजा करतात.

देवपूजा करतांना भाव कसा ठेवावा ?

अ. देवता तत्त्वरूपी असली, तरी तिची पूजा ही मूर्ती किंवा चित्र यांच्या रूपात, म्हणजे स्थूलरूपात करतात.

‘पूजास्थळी देवतेची मूर्ती किंवा चित्र नसून साक्षात देवताच आहे’, असा भाव ठेवून पूजा केल्यास ती देवतेच्या चरणांशी लवकर पोहोचते. यासंदर्भात आमचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांच्याप्रती भाव कसा होता,

ते पुढील प्रसंगावरून लक्षात येईल.

एकदा प.पू. भक्तराज महाराज यांनी आश्रमातील, रस्त्याला लागून असलेल्या देवघरात पूजेत असलेले त्यांच्या गुरूंचे छायाचित्र आश्रमाच्या नवीन वास्तूतील सभागृहामध्ये नेऊन ठेवायला सांगितले.

तेव्हा ‘‘ते डोक्यावर ठेवून वाजतगाजत न्या’’, असे सांगितले. प्रत्यक्ष गुरूंना जसे आदराने एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेले असते, तसे छायाचित्राला न्यायला सांगितले; कारण त्यांच्या भावानुसार ते नुसते छायाचित्र नसून प्रत्यक्ष गुरुच होते.

देवपूजा कोणी करावी ?

अ. नेहमीची देवपूजा :

देवपूजा अमुक एका व्यक्तीनेच करावी, असा नियम जरी नसला तरी सर्वसाधारणतः कुटुंबातील वडीलधार्‍या पुरुषाने देवपूजा करावी.

घरात पुरुष नसेल, तर घरातील वडीलधार्‍या स्त्रीने पूजा करावी.

स्त्रीने पूजा करतांना ती नाममंत्राने करावी. एका व्यक्तीने पूजा केल्यानंतर दुसर्‍या व्यक्तीने पुन्हा पूजा करू नये. देवाची पूजा झाल्यानंतर घरातील सर्वांनी शक्य असल्यास देवांना फुले वहावीत व नमस्कार करावा.

आरतीच्या वेळी शक्यतो सर्वांनी उपस्थित राहून एका सुरात व भावपूर्ण रीतीने आरती म्हणावी. असे शक्य नसल्यास एकाने आरती म्हणावी व इतरांनी टाळ्या वाजवाव्यात.देवपूजा कोणत्या दिशेला करावी ?

पूर्व दिशेला विशेष महत्त्व असून त्या दिशेला तोंड करून पूजाविधी करण्यास सांगितले आहे;

म्हणूनच देवघर नेहमी पूर्व-पश्चिम दिशेने असणे योग्य असते.

(याविषयी अधिक माहिती सनातनचा लघुग्रंथ ‘देवघर व पूजेतील उपकरणे (शास्त्रीय महत्त्व व मांडणी)’ यात दिली आहे.

देवपूजा कधी करू नये ?

अ. पारोश्याने (आंघोळ न करता) व व्यसनी अवस्थेत

आ. सोयर व सुतक लागल्यापासून दहा दिवस (सोयर व सुतक लागल्यानंतर दहा दिवस अशौच असते. अकराव्या दिवशी शुद्धी करून पूजा करता येते. सुतक असतांना कर्त्याला मात्र १२ व्या दिवसानंतरच पूजा करता येते.)

इ. घरातील स्त्री रजःस्वला असल्यास व तिचा वावर नसलेल्या खोलीत देव असतील, तर घरातील वडीलधार्‍या पुरुषाने आंघोळ करून पूजा करावी.

जागेच्या अभावी देव वेगळ्या खोलीत ठेवणे शक्य नसल्यास चार दिवस (स्त्रीचा रजोकाळ समाप्त होईपर्यंत)
देवघर पडद्याने झाकून ठेवावे. विशिष्ट कारणासाठी अशा प्रकारे देवाला झाकून ठेवणे गैर नाही.

वैष्णव सांप्रदायिकांच्या मंदिरांमध्येही ‘देव स्नान करत आहे, देव निजला आहे’ वगैरे कारणांसाठी देवाची मूर्ती पडद्याने झाकून ठेवण्याची पद्धत आहे. हे एकप्रकारे देवासाठी निराळी खोली बनवण्यासारखेच झाले.

देवपूजा दिवसात किती वेळा आणि कोणत्या समयी करावी ?

देवपूजा हे नित्य कर्म आहे. प्रतिदिन त्रिकाल (प्रातःकाली, माध्यान्ही म्हणजे दुपारी आणि सूर्यास्तानंतर) षोडशोपचारे (सोळा उपचारांनी) पूजा करावी;

परंतु त्रिकाल अशी पूजा करणे शक्य नसल्यास सकाळी षोडशोपचारे पूजा करावी आणि दुपारी व सूर्यास्तानंतर पंचोपचार (पाच उपचारांनी) पूजा करावी.

त्रिकाल पूजा करणे शक्य नसल्यास किमान सकाळी एकदा तरी पूजा करावी. षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा करणे अशक्य असेल, तर गंध अन् पुष्प या दोन उपचारांनी तरी पूजा करावी. धर्मशास्त्रात अशा प्रकारे पर्याय सांगितले आहेत; कारण कोणत्याही परिस्थितीत उपासकाकडून देवपूजा घडावी, हा त्यामागील उद्देश आहे !

देवपूजेची सर्वसाधारण माहिती देवपूजेचे प्रकार !

धर्मशास्त्रात देवपूजा करण्याचे पुढील प्रकार सांगितले आहेत.

पहिले दोन प्रकार हे सर्वसाधारणतः

ज्याला आपण ‘देवपूजा’ म्हणतो अशा स्थूल स्तरावरील आहेत, तर त्यापुढील दोन प्रकार हे सूक्ष्म स्तरावरील आहेत.

अ. पंचोपचार पूजा (मूर्ती किंवा चित्र यांची पूजा) : गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य हे पाच उपचार देवाला समर्पित करणे

आ. षोडशोपचार पूजा (मूर्ती किंवा चित्र यांची पूजा) : वरील पंचोपचारांसहित सोळा उपचारांचा समावेश यात होतो.

इ. मानसपूजा : मनाने सगुण मूर्ती कल्पून मनाने तिची पूजा करणे

ई. परापूजा : निर्गुण परब्रह्माची परावाणीतून पूजा करणे

Please follow and like us:

Leave a Reply