पिशवीतील दूध गरम करण्याची चूक तुम्ही सुद्धा करत आहात…तर मग अवश्य वाचा..

पिशवीतील दूध गरम करण्याची चूक तुम्ही सुद्धा करत आहात…तर

मग अवश्य वाचा..

**‘पॉइश्चराइजेशन’ म्हणजे काय ?*

हल्ली बहुतेक जण पिशवीतील दुधाचा वापर करताना दिसतात. मात्र हेच दूध पिशवीबंद करण्याआधीच पॉइश्चराइज्ड केलं जातं. याचाच अर्थ असा की याआधीच हे दूध उच्च तापमानावर तापवून थंड करण्यात आलं आहे. याच संपूर्ण प्रक्रियेला ‘पॉइश्चराइजेशन’ असं म्हंटलं जातं.

यामुळे दूध अधिक कालावधीपर्यंत सुरक्षित राहू शकतं तसेच त्याच्यातील हानिकारक बॅक्टेरिया सुद्धा नाश पावण्यास मदत होते. पॅकिंग शिवाय विकलं जाणाऱ्या दुधाच्या बाबतीत खूप सावधानता बाळगावी लागते.

जसं की दूध गाळणे, व्यवस्थित उकळणे यांसारख्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.बाजारातून मोकळं दूध विकत घेतल्यानंतर त्याला अधिक तापमाणावर उकळून घ्यावं लागतं. अन्यथा ते काही तासांतच खराब व्हायची शक्यता अधिक असते.

Loading...

मात्र हीच प्रक्रिया लोक पॅकिंग असलेल्या दुधाच्या बाबतीतही करतात. पॅकिंग पिशवीत मिळणारं दूध गरम करावे किंवा नाही याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. काही लोकांचं म्हणणं असं असतं की या दुधाला प्लास्टिकच्या पिशवीत पॅक केल्यामुळे न तापवता तसंच हे पिणं आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते.

काही लोक दुधाला जास्त वेळ टिकावं म्हणून गरम करतात. मात्र तुम्ही देखील असं करत असाल तर तुम्ही देखील चुकत आहात. आता आम्ही असं सांगितल्यामुळे… पॉइश्चराइज्ड दुधाला गरम का करू नये? असा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिकच आहे,

Loading...

तर मग वाचा पुढे..

पॉइश्चराइज्ड दूध का गरम करू नये?

फूड सेफ्टी हेल्पलाइनचे संस्थापक डॉ सौरभ अरोडा असं म्हणतात की, पॉइश्चराइज्ड दुधाला गरम करण्याची गरजच पडत नाही. दूध कंपन्या दूध पिशवीबंद करण्याआधीच दुधाला पॉइश्चराइज्ड करून बॅक्टेरियामुक्त करत असतात.

जर आपण दूध घरी आणल्यानंतर ते गरम करत असू तर त्यातील पोषकतत्व एकतर कमी होतात किंवा नष्ट होत असतात.यासाठी पिशवीबंद दूधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्याला वारंवार गरम करण्याची आवश्यकता नाही.

तुम्ही या दुधाला 4 डिग्री तापमानात 7 दिवसांपर्यंत व्यवस्थित ठेवू शकता.आपण पाहिलंच असेल की दुधाच्या पिशवीवर सुद्धा एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

त्या डेटच्या आधी दूध खराब होण्याची शक्यता फारच कमी असते.

Please follow and like us:

Leave a Reply