कसे वाढवाल शरीरातील रक्ताचे प्रमाण?

कसे वाढवाल शरीरातील रक्ताचे प्रमाण?

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे असे समजा.

अशावेळेस तुम्हाला कोणत्याही औषोधोपचाराची नाही तर योग्य आहाराची गरज असते.

Loading...

म्हणूनच अशावेळी कोणता आहार घ्यावा किंवा कोणते घरगुती उपाय करावेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये चमचाभर मध एकत्र करून प्या. यामुळे शरीरातील रक्तवाढ लवकर होते.

2) रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. यामुळे आवश्यक जीवनसत्त्व मिळतात व रक्तवाढ लवकर होते.

Loading...

3) दररोज सफरचंदाचा एक ग्लास रस प्यायल्यास उत्तम किंवा सफरचंदाच्या रसामध्ये बिटाचा रस आणि मध टाकावा.

या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते.

4) तसेच नियमित एक बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

5) थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या रसामध्ये एकत्र करून दररोज पिण्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

6) एक ग्लास टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो सूप पिऊन देखील रक्त वाढ होण्यास मदत होते.

7) रात्रीच्या जेवण झाल्यावर शक्य असल्यास शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा. रक्त वाढीसाठी हे फायदेशीर आहे.

8) शरीरातील रक्ताची कमतरता भरण्यासाठी रात्री झोपताना काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दूध प्यावे.

9) टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

10) हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे फायदेशीर आहे. तुम्ही मका भाजून किंवा उकडून खाऊ शकता.

http://www.alhadafjunior.com/assets/data/update/060916094425-bigstock-streaming-blood-cells-49090052.jpg

Please follow and like us:

Leave a Reply