एका आंदोलनकारी तरुणाचे मनोगत !

दगडफेक +जाळपोळ क्षणीक असते कायदेशीर कारवाइ मात्र सतत सुरु असते…

कोर्टात अनेक आरोपी येत असतात जात असतात…दंगलीचे गुन्हे गंभीर असतात…

सिद्ध झाले तरी बाकीच्या सर्व कलमाना धरून ४/५ वर्षे ..शिक्षा कुठे जात नाही..

सेफ फक्त नेते लोक सुटतात..कारण त्यांच्या कडे बुडाखाली करोडो रुपये आणी लढाईत एकेला हियरिंग साठी ५ -५ लाख घेणारी वकील मंडळी अस्तात …

Loading...

बाकी दबावामुळे पोलिस पन घावुक भावात अटक सत्र चालवतात …

ज्या बापाने पोलिस स्टेशन पाहिले नसते त्याला पोलिस स्टेशन +न्यायालय +वकिली ओफिस मधे चकरा माराव्या लागतात …

Loading...

सर्व प्रोसेस कमीतकमी एक वर्षे तरी लांबते .. त्या त्या तारखेचा बाहेरील खर्च + त्या दिवसाचा रोज +बाहेरील जेवण ह्यावर हजारो रुपये खर्च होतात वकील काही हजार घेतो …

न्यायालयात खर्च होतो डोक्युमेंट /तिकीट  ची खर्ची ..नाष्टा पाणीवैगरे मधे आईचे दागिने गाहान ठेवायची वेळ येते .

जामीन दंगली मुळे लवकर मिळत नाही…

जामीन न परवडनारा लाखात नाही तर हजारातजातो.. दंगलीच्या केसेस मुळे .सरकारी /निमसरकारी नोकरी चा वांधा होतो …

टिनपाट रोजावर कुठे काशी करावी लागते ..सोयरिक संबंध जोडायला पाहुणे पोरगी द्यायला तयार होत नाहीत..

अश्या वेळी मात्र ** घातली आणी मुंबई पाहिली चा फिल खूप मोठा त्रासदायक असतो त्यात कुठल्याही दंगलीचा /कसा धडा शिकिवला वैगरे चा ओर्ग्यझम वाहून जात असतो ..

अनेक वर्षे निघून जातात भडकवनारा मस्त आपल्या बंग्ल्यात आलेला असतो दारात चारचाकी झुलत असते..

तुम्ही मात्र पांढरे केस घेवून नशीबाला कोसत असतात…_ दंगल_ ची_आठवण….

एक बरबाद झालेला तरुण

Please follow and like us:

Leave a Reply