अति मिठाचे सेवन हे उच्च रक्तदाबाला निमंत्रण देते ! जास्तीचे मीठ हे विष असते !

अति खाल्ल्यास मिठ जगता येणार नाही निट

एका गावात एक गुंड होता. तो सर्वांकडले अन्न खायचा. एकाने सांगितले की  त्याच्या अन्नात रोज थोडे मीठ टाका. त्याची चव घ्या. ते हळू हळू त्याच्या नकळत वाढवा. लोकांनी तसे केले.

त्या जादा मिठाने उच्च रक्त दाब होवून तो गुंड मेला.पण गावकरयांना चव घेता घेता मिठाची  चटक लागली. ते भरपूर मीठ खाऊ लागले.  घरोघरी सर्वाना उच्च रक्त दाब झाला. तरुणांचे मरण वाढले

Loading...

त्या  लोकांप्रमाणे, उच्च रक्त दाब हेच आज आपले, भारतीयांचे नंबर १ चे मरणाचे कारण आहे. दर चौथ्या माणसाला उच्च रक्त दाब आहे. बहुतेकांना हे माहिती नाही.

ही माहिती सांगून  सर्वांना आपला रक्त दाब मोजायला सांगा. सर्वांना वाचवा.जास्त मीठ खाण्याचा  उच्च  दाबाशी संबंध आहे. जागतिक आरोग्य संघटना सांगते की प्रत्येकाने रोज ५ ग्रॅमच्या वर मीठ खाऊ नये.

Loading...

८ ग्राम च्या वर मीठ रोज खाणाऱ्यांना उच्च रक्त दाब होण्याची  शक्यता जास्त असते. आपण सरासरी १० ग्रॅम मीठ खातो काही  लोक रोज ३० ग्रॅम मीठ खातात. आपले जसे वय वाढते  तसा आपला रक्तदाब वाढतो.

३ ग्रॅम पेक्षा कमी मीठ रोज खाणाऱ्यां मध्ये उच्च रक्त दाबाचे प्रमाण कमी आहे. वय वाढले तरी त्यांचा रक्त दाब वाढत नाही.मीठ खाणे कमी केले की उच्च रक्त दाब होण्याची शक्यता कमी होते.

लोणची, पापड, सॉस,केचप, अजिनोमोटो ,  खारवलेले पदार्थ, शेव चिवडा आदि खारे पदार्थ  यातून मीठ  पोटात जाते.जादा मिठाने [ जठर] पोट  खराब होते, त्याचे अन्न पचनाचे काम बिघडते.

जठराचा कर्क रोग, कॅन्सर पण होतो. मिठाने शरीरातील कॅलशीयम शरीरा बाहेर टाकले जाते. याने  हाडे ठिसूळ होतात. सर्वाधिक लोकांना मान दुखी, पाठदुखी  व सांधेदुखी आहे.  ती याने वाढते.

जरा  धक्का लागला की आपले ठिसूळ झालेली हाडे  मोडतात.आपल्या रोजच्या सर्व  नैसर्गिक  अन्नातून [ वरून न टाकता ] आपल्याला ३०० ते ४०० मिली ग्राम मीठ मिळते. ते शरीर वापरून घेते.

जगभर पहिल्या वाढ दिवसापर्यंत मीठ व साखरेची चवच मुलाना देत नाही. त्यापुढेही ती  देणे शक्यतो लांबवतात. आपणही असे करू या.आपण ताटात, जेवणात वरून मीठ घेवू नये.

अन्न शिजवतांना रोज थोडे थोडे मीठ कमी टाकायला सांगा.पण आपल्याला मिठाची सवय लागली आहे.  मिठाचे व्यसन लागले आहे. मिठाशिवाय जेवणच जात नाही.

दारू , तंबाखूच्या सवयीने जेवढे लोक मरतात त्यापेक्षा  आपले खूपच जास्त लोक जादा मीठ खाउन   उच्च रक्तदाब  होउन   मरतात.एक माणूस मारला तर फाशी होते.मीठ खूप लोक मारते.

मिठाला फाशी द्या.किराणा दुकानातील छोट्या काट्यावर ३, ५ ग्राम मीठ किती होते ते मोजून बघा. माणसी तेवढे, किंवा त्यापेक्षा कमी  मीठ रोज खा.घरच्या छोट्या चमच्यात किती मीठ येते हे मोजा.

१/२ -१  किलो मिठाशी नवीन पिशवी आज उघडा. त्यावर आजची तारीख टाका. ही किती दिवस चालते ते बघा. ५ ग्रॅम रोज प्रमाणे ५०० ग्रॅमची पिशवी  १ माणसाला १०० दिवस [३ महिने],चालवा.

२ माणसांना ५० दिवस, ३ माणसांना  ३३ दिवस [ १ महिना], ४ माणसाना २५ दिवस व ५ माणसांना २० दिवस पुरवा. एक किलोची पिशवी याच्या दुप्पट चालवा. लोणची पापड, हे सर्व यातूनच करा. बाजारचे केचप सॉस, खारे पदार्थ  टाळा.

मीठ विष आहे हे जाणा. आपण रोज जादा मीठ घालून स्वतः ला व घरच्यांना आजारी करतो, मारतो हे ज्यादिवशी महिलांना  व सर्वाना कळेल त्यादिवशी  हे आजार , ही मरणे बंद होतील.

खाल्ल्या मिठाला जागायचे असेल तर कमी मीठ खा. बदला. नाहीतर, नेहमीसारखे मीठ खा. उच्च रक्त दाबाने मरा.

ही  माहिती  राष्ट्रीय आहार संस्थेच्या “ भारतीयांसाठी जेवणाची मार्गदर्शक तत्वे “ या पुस्तिकेतून घेतले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply