…म्हणून लहान मुलांचे कान अवश्य टोचावेत

…म्हणून लहान मुलांचे कान अवश्य टोचावेत

जगभरामधील महिला, पुरुष, तरुण-तरुणी आपले कान टोचून घेत असतात, ते कानामध्ये निरनिराळ्या पद्धतीची आभूषणे घालण्याची हौस पूर्ण करण्यासाठी.

पण भारतात मात्र कान टोचण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे.

Loading...

आपल्याकडे मूल अगदी तान्हे असतानाच त्याचे कान टोचविण्याची पद्धत आहे. ही वेदिक परंपरा असून ह्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचे म्हटले जाते.

👉  आपल्या कानाचे इयर लोब्स, म्हणजेच जिथे कान टोचले जातात त्या भागाच्या मधोमध असणारा बिंदू अतिशय महत्वाचा आहे.

Loading...

👉  हा पॉईंट आपल्या प्रजनन करणाऱ्या अवयवांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो.

👉  महिलांच्या मासिक धर्माची नियमितता देखील या बिंदूवर अवलंबून असते.

👉  कान टोचल्याने एक प्रकारे अॅक्यू पंक्चर ही उपचारपद्धती अवलंबली जात असते.

👉  कान टोचल्याने मेंदूचे डावे आणि उजवे भाग सक्रीय राहण्यास मदत होत असून, लहान मेंदूचा विकास होतो.

त्यामुळे लहान वयामधेच मुलांचे कान टोचणे गरजेचे असते, कारण या वयातच मेंदूचा सर्वाधिक विकास होत असतो.

​​​​​​👉  कान टोचल्याने सक्रीय झालेल्या बिन्दुमुळे मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

👉  तसेच त्यांची दृष्टी देखील सतेज राहण्यास मदत होते. दृष्टीबरोबर मुलांची श्रवण शक्ती देखील चांगली राहते.

👉  जथे आपला कान टोचला जातो, त्या बिंदुला ‘ हंगर पॉईंट ‘ असे देखील म्हटले जाते. या बिंदुला सक्रीय केल्याने लहान मुलांची पचनशक्ती चांगली विकसित होते, व मुलांना चांगली भूकही लागते.

👉  वजन कमी करण्यासाठी देखील हा बिंदू सक्रीय राहणे आवश्यक आहे.

👉 कान टोचल्याने मेंदूची शक्ती वाढीला लागत असून, एकाग्रता वाढण्यास मदत होते.

👉 जिथे कान टोचले गेले आहेत, त्या जागेच्या आसपासच्या बिंदूंना हाताने दाबून त्यांच्यावर प्रेशर दिल्याने मानसिक तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

Please follow and like us:

Leave a Reply