स्तनांच्या कर्करोगाची ६ प्रमुख लक्षणे !

‘ब्रेस्ट कॅन्सर’चा संकेत ही ’6′ लक्षणं देतात …..

1: गाठी –

स्तनाजवळ जाडसर आणि वेदनारहित गाठी आढळल्यास मॅमोग्राफी करून घ्या. केवळ स्पर्शज्ञानाने तुम्ही गाठी ओळखू शकता. यासाठी किमान महिन्यातून एकदा ब्रेस्ट सेल्फ एक्झाम करा.#

 

Loading...

2: त्वचेचा / गाठीचा जाडसरपणा –

अनेकदा गाठीचे स्वरूप ओळखणे कठीण होते. मग अशावेळी दोन्ही स्तनांना स्पर्श करून त्यातील फरक ओळखण्याचा प्रयत्न करावा. एखादा भाग / त्वचा किंवा गाठ जाडसर वाटल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच योग्य चाचणीद्वारे त्याचे निदान करावे.

3: स्तनाग्रातून (निपल) स्त्राव होणे –

गरोदर स्त्रिया किंवा नवमातावगळता इतर स्त्रियांच्या स्तनाग्रातून स्त्राव होत नाही. मात्र जर अशाभागातून रक्त वाहत असल्याचे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा.

Loading...

4: स्तनाग्राचा आकार बदलणे –

सामान्य स्वरूपात स्तनाग्राची स्थिती ही बाहेरच्या बाजूला अधिक असते. मात्र जर तुम्हांला ते आता ओढले गेल्याचे वाटत असल्यास किंवा त्यांची दिशा बदललेली आढळल्यास काहीतरी समस्या आहे. असे समजावे.

5: स्तनांच्या त्वचेचे स्वरूप बदलणे –

स्तनांजवळील त्वचा ही मुलायम असते. परंतू त्वचेमध्ये काही बदल आढळून आल्यास ही धोक्याची घंटा समजावी. डॉ..शहा यांच्यामते, स्तनांजवळील त्वचा संत्र्याच्या सालीप्रमाणे जाडसर जाणवल्यास त्याचे कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

6: काखेत गाठ आढळणे –

काखेत गाठ असणे हे सामान्य आहे. परंतू त्याला हात लावल्यानंतर वेदना होणे किंवा सूज आढळणे हे ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते.

Please follow and like us:

Leave a Reply