कपडे विकणाऱ्या बापाचा लेक ते विश्वविजेत्या संघाचा कर्णधार’

कपडे विकणाऱ्या बापाचा लेक ते विश्वविजेत्या संघाचा कर्णधार

घरची परिस्थिती हलाखीची, आईचे छत्र वयाच्या चौथ्या वर्षी हरपलेले, वडिलांचा कपड्याचा व्यवसाय, सुरतवरुन कपडे विकत आणायचे आणि ठाणे, मुंबई परिसरात विकायचे, अशाही परिस्थितीत विरारच्या चाळीत त्याने एका ध्येयवेड्या स्वप्नाचा ध्यास घेतला.

प्रतिकूल परिस्थितीत संकटांवर मात करत त्याने ते प्रत्यक्षात साकारले. ही कहाणी आहे, विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार ठरलेल्या पृथ्वी शॉच्या जिद्दीची, बाप-लेकांनी पाहिलेल्या जग जिंकणाऱ्या स्वप्नांची.

Loading...

असा घडला पृथ्वी:

पंकज शॉ पृथ्वीचे वडील. कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय करायचे. सुरतवरुन कपडे विकत आणायचे आणि ठाणे, मुंबई परिसरात विकायचे. आपल्या मुलाच्या क्रिकेटप्रेमासाठी त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही.

वयाच्या ५ व्या वर्षापासून पृथ्वीला वांद्रे येथील मैदानावर क्रिकेट प्रशिक्षणासाठी ते घेवून जात असत. विरारवरुन दररोज ट्रेनमधून मुंबईला येणे सोपे नव्हते.

Loading...

छोटा पाच वर्षांचा पृथ्वी भली मोठी साहित्याची बॅग घेऊन प्रचंड गर्दी असलेल्या ट्रेनमधून प्रवास करायचा. पृथ्वीच्या संघर्षाची कहाणी कोणीतरी आमदार संजय पोतनीस यांच्या कानावर घातली.

त्यांनी कलिना सांताक्रूझ येथे शिवसेना शाखेच्या समोर पोतनीस यांनी त्याला एक घर मिळवून दिले. लोकलचा प्रवास थांबला आणि त्याला क्रिकेटवर आधिक लक्ष केंद्रित करता आले.

पृथ्वीला घडविणारे हात:

प्रवासात पृथ्वीला साथ मिळाली व्ही. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष विनय खातू यांची. एअर इंडियाच्या मैदानावर सराव करणाऱ्या पृथ्वीच्या खेळाची चमक त्यांना दिसली.

वयाच्या १० व्या वर्षी सुरेख फलंदाजी करणाऱ्या पृथ्वीला खातू यांनी आधार दिला. क्रिकेट साहित्य, प्रवास, आर्थिक मदत आणि आता जुहू येथील घरात स्थिरावण्यासाठी मदत करणे, असे सर्व काही विनय यांनी पृथ्वीला मिळवून दिले आहे.

अन् झहीरच्या जिममध्ये मिळाला प्रवेश –

पृथ्वीचे क्रिकेट तंत्र चांगले असले, तरी तो शारीरिक तंदुरुस्त वाटत नव्हता. मोठ्या आणि दीर्घ पल्ल्याच्या खेळीकरता तंदुरुस्ती आणि आहारही तितकाच महत्वाचा.

ही गरज हेरुन विनय यांनी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याच्या अद्ययावत प्रो स्पोर्ट्स जिममध्ये त्याला प्रवेश मिळवून दिला.

या खेळीमुळे आला पृथ्वी प्रकाशझोतात-

पृथ्वीने हॅरिस आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत केलेल्या ५४६ धावांच्या अप्रतिम खेळीनंतर पृथ्वी प्रकाशझोतात आला. या खेळीमुळे मुंबई क्रिकेट जगताचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले. अन् तो मुंबई रणजी संघाचा आधारस्तंभ ठरला.

आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर पृथ्वी विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार ठरला. पृथ्वीला लवकर भारतीय संघात स्थान मिळेल, असा विश्वास विनय खातू यांना वाटतो.

पृथ्वीला क्रिकेटची देवदत्त देणगी-

पृथ्वीला क्रिकेटची देवदत्त देणगी लाभली आहे. त्याला फार शिकवण्याची गरज भासत नाही. आईविना असलेल्या या लेकरावर आम्ही मायेचे छत्र धरले आणि शिस्त हवी म्हणून मी, माझी पत्नी आणि मुलगा या सर्वांनी मिळून त्याची काळजी घेतली, अशी प्रतिक्रिया शिवसेनचे आमदार संजय पोतनीस यांनी व्यक्त केली.

मी सुप्रीमो क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ही स्पर्धा बघायची होती, म्हणून आम्ही वांद्रे एमआयजी येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.

तेथे नेटमध्ये पृथ्वी सराव करत होता. सरळ बॅटने खेळणाऱ्या पृथ्वीचा फलंदाजी पाहून प्रभावित झालो. तेथे उभ्या असलेल्या त्याचे वडील पंकज शॉ यांना भेटलो.

त्यांना वाकोला कलिना येथे घर मिळवून दिल्याने सरावाला त्याला खूप वेळ मिळाला. पृथ्वी प्रतिभावान असून तो खूप मोठा होईल, त्याला आमच्या अनेक शुभेच्छा, असे पोतनीस यांनी सांगितले.

पृथ्वी….पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा….

Please follow and like us:

Leave a Reply