परिक्षा तोंडावर आली असताना पालकांनी काय करावं व काय करू नये याविषयी थोडंस….

परिक्षा तोंडावर आली असताना पालकांनी काय करावं व काय करू नये याविषयी थोडंस….

**काय करू नये….

1 – सकाळी उठल्या बरोबर “परिक्षा तोंडावर आली आहे आणि यांना झोपा सुचताहेत” असं म्हणू नये.

2 – चहा नाश्ता झाल्याबरोबर लगेच “चला आवरा आता, कालची रिव्हीजन करा” असं म्हणणं टाळावं.

Loading...

3 – जेवताना अभ्यासाचा विषय टाळावा. शेजारचा मुलगा/मुलगी किती वाजता ऊठतो/ऊठते हे वारंवार सांगू नये. इतरांशी तुलना टाळावी

4 – लावलेल्या ट्यूशन क्लासच्या फी चा आकडा, आई-वडीलांनी घेतलेले कष्ट हे दिवसभर ऊठता-बसता सांगू नये.

Loading...

5 – मुलगा/ मुलगी टिव्ही समोर थोड्या वेळ बसल्यास त्यांच्यासमोर डोळे मोठे करून येरझाऱ्या घालू नयेत.

6 – मुलाला/मुलीला रात्री अभ्यास करताना झोप येत असल्यास “मी दहावीत/बारावीत असताना पहाटे तीन वाजेपर्यंत अभ्यास करत होतो” असं खोटं सांगू नये.

7 – थोडा वेळ मुलांनी मोबाईल हातात घेतला तर हिसकावून घेऊ नये.

8 – दिवसभर अभ्यासाचा जप टाळावा.

9- स्वतःच्या अपेक्षांचे ओझे मुलावर लादु नये

**काय करावे….

1- सर्वप्रथम शांत रहाण्याची प्रॅक्टीस करावी. घरातील वातावरण चांगले ठेवावे

2 – मुलांच्या आवडीचा स्वैपाक करावा. योग्य आहार आणि आराम गरजेचा आहे

3 – मुलं अभ्यास करताना थोडं सोबत बसावं. (आपलं व्हाँटस्अँप बाजूला ठेवून)

4 – अधून मधून प्रेमाने “मला माहीत आहे, तू यशस्वी होणारच” किंवा “काळजी करू नकोस, मी तूझ्या सोबत आहे” असं म्हणावं.

5 – अभ्यासाच्या मध्ये गंमतीजंमती सांगून वातावरण हलकं-फुलकं ठेवावं.

6 – एखादा पेपर कठिण गेल्यास त्यावर चर्चा करत न बसता पुढच्या पेपरच्या तयारीला लागावं.

7 – आजच्या दिवसाचे आणि परीक्षेचे नियोजन करावे, संपूर्ण भविष्याचे नव्हे

8 – सरतेशेवटी “हर बच्चे की अलग रफ्तार होती है” हे लक्षात ठेवावं. दहावी/बारावी ची परिक्षा हा आयुष्याचा एक टप्पा आहे, आयुष्य नाही हे लक्षात ठेवावं..

यशस्वी व्हा 💐💐💐💐

सौ वीणा महाजन,
समुपदेशक, व्यवसाय मार्गदर्शक, जळगाव

Please follow and like us:

Leave a Reply