निर्णय !

त्या दिवसांत नुकतीच एका सोशल साईट वरती त्या दोघांची ओळख झाली होती.सुरूवातीला hi हेल्लो, नंतर एकमेकां बद्दलची माहीती,आणि त्यातूनच जन्माला आली एक छानशी मैत्री….त्या दोघांचीही खुप कमी वेळात खुप छान मैत्री झाली होती.

इतकी छान की,त्या दोघानांही एकमेकांशिवाय काहीही सुचायचे नाही.दिवसभर बोलूणही रात्र ही कमी पडायची त्यांना.घरच्यांना लपवून का होईना पण दोघे खुप बोलायचे.खुप सवय लागली होती दोघांनाही एकमेकांची.खर तर दोघांचेही स्वभाव खुप वेगवेगळे होते.

तो शांत,मितभाषी, खुप गरज असेल तरच व्यक्त होणारा आणि अस्थिर अगदी उंचावरूण पडणा-या धबधब्या सारखा.ती मात्र चंचल पण स्थिर अगदी एखाद्या नदी सारखी शांतपणे आपल्या प्रवाहाने वहाणारी.वेगवगळे स्वभाव असूणही दोघेही एकमेकांना खुप आवडू लागले होते.खर सांगायचे तर त्या दोघांनाही एकमेकांसोबत बोलण्याचे व्यसनच लागले होते.

दोघांचेही दुस-या कशातही मन लागायचे नाही.एकमेकांच्या आयुष्याबद्दल दोघांनीही जवळपास सर्व काही एकमेकांना सांगीतले होते.दोघांना एकमेकांचे स्वभावही आता खुप आवडू लागले होते.

Loading...

आता त्यांचे नाते मैत्रीच्याही पलीकडे जाण्याच्या मार्गावर होते.पण काही बंधणेही होती त्यांच्या नात्याला.तरीही रोजचे बोलणे,काळजी करने तसेच चालू होते.तसे खुप दुर रहात होते ते दोघे एकमेकांपासून पण मनाने त्याहून जास्त जवळ होते.

आणि तेच खुप जास्त होते त्या दोघांसाठी.ती तिच्या स्वभावाप्रमाणे तशीच होती नदी सारखी….खळखळून वाहाणारी.कधीच कोणासाठी न थांबणारी.हो कधी-कधी वाट बदलून प्रवाहा प्रमाने वेगळया वाटेने वाहायचीही पण तिथे थांबायची नाही.

कारण, तिला ठाऊक होते तिचा अंत तिच्या सागरापाशीच आहे.आणि तिला स्वतःला पुर्ण होण्यासाठी तिला तिच्या सागरकडेच जायचे आहे.आणि तो ही तसाच उंचावरून पडून एका जागी थांबणारा,त्याला शक्य होईल तो पर्यंत त्याच्या हक्काच्या तलावात साठून रहाणारा.

Loading...

पण कधी जर खुप जास्त पाऊस पडला तर तलाव सोडून वाट मिळेल तिकडे धावणारा,फक्त एका स्थिर जागेच्या शोधात.आणि असाच एक दिवस न राहून त्याने तिच्या जवळ त्याचे प्रेम व्यक्त केले.तिने त्याला खुप समजावले. त्यांच्या नात्याला असणा-या बंधनांची त्याला जाणीव करून दिली.पण त्याला तोवर तिचे प्रचंड वेड लागले होते.

तिच्या प्रेमाची त्याला खरच खुप गरज होती.तिचे निरगस पण काहीतरी शोधणारे डोळे त्याला स्वतःकडे खेचून घ्यायचे.तिला ही त्याची गरज होती हे त्याला चांगलेच ठाऊक होते पण काही बंधणांमुळे ती जाणून बुजून त्याच्यापासून दुर रहात होती.त्याने तिच्याकडे हट्टच केला मला तू हवी आहेस.तुझ्या अपुर्ण आयुष्याला मला पुर्णत्व द्यायचे आहे.

जितके आयुष्य असेल ते तुझ्या सोबत घालवायचे आहे.त्यावर तिनेही त्याला छान शब्दात समजावले.तुझे आणि माझे नाते मैत्रीचे आहे मैत्रीचेच राहूदे कारण मैत्रीची जागा जेव्हा प्रेम घेते तेव्हा मैत्रीला जागाच उरत नाही.आणि प्रेम झाले की,वाढतात अपेक्षा.अपेक्षा वाढल्या की,अपेक्षाभंग होतो.

अपेक्षाभंग झाला की,दुरावा येतो.दुरावा आला की, तिरस्कार वाटू लागतो.आणि तिरस्कार वाटू लागला की,नाती तुटतात.आणि या सगळया धिबीडग्यात मैत्री कोणाच्या तरी पाया खाली येऊन जिव सोडते.आणि मग उरतो तो फक्त एकांत अगदी जिवघेणा एकांत.आणि मला तू हवा आहेस अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत.

दुर राहून ही सदैव जवळ वाटणारा,एक छान मित्र बनूण.पण त्याला हे काहीही समजत नव्हते.त्याच्या आयुष्यात कित्येक वर्षांनी प्रेम करणारे कोणीतरी भेटले होते.आणि त्याला ते मुळीच गमवायचे नव्हते.तिच्या पुढे त्याला कोणतीही बंधने काहीही वाटत नव्हती.तो तिच्यावर खरच खुप मनापासून प्रेम करत होता.

अगदी सोळा वर्षाच्या कोवळया वयातली मुले करतात तसे.निरागस,साध, सरळ आणि खर.त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे याची तिलाही जाणीव होती.पण,परिणमांचा विचार तिला त्याच्यापासून दुर घेऊन जाइ.आणि म्हणूनच तिला त्यांचे नाते मैत्रीच्या पुढे घेऊन जाण्याची भिती वाटायची.भलेही तिच्या मनातल्या भावना तिच्या मनातच घुसमटून मेल्या तरी.

त्या दिवशी त्याने त्याचे प्रेम व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नात्यात एक छोटासा का होईना पण भुकंप झाला होता.आणि त्यानंतर त्यांच्यातल्या छानश्या नात्याच्या भिंतीला हलकसा तडा ही गेला.तिला फार वाईट वाटायचे ज्या नात्याला आयुष्याच्या अंतापर्यंत सोबत ठेवण्याची स्वप्ने पाहीली त्या नात्याचा असा मधेच दुर्देवी अंत होत आहे पाहून.

त्यालाही फार वाईट वाटले जिच्याकडून समजूतदार पणाची अपेक्षा होती तिनेही त्याला समजून घेतले नाही.इतके प्रेम करूनही त्याच्या भावना तिला कधी कळाल्याच नाहीत.खर तर तिला त्या जाणून-बुजून कळून घ्यायच्या नव्हत्या.

तो आतून खुप दुखवला गेला होता. तिने तेव्हाही खुप प्रयत्न केला त्याला धिर देण्याचा पण, त्याला त्यानंतर तिच्या कसल्याही सहानुभूतिची गरज नव्हती.त्यावेळी त्याला एकटं स्वतःला सावरण फार जड जात होतं.

आता त्याला तिचा होकारच ठीक करू शकणार होता आणि ते तिच्याकडून होने कधीही शक्य नव्हते.शेवटी ज्या दिवशी त्याने तिच्याकडे त्याचे प्रेम व्यक्त केले त्याच दिवशी तिच्या नकारासोबत त्यांच्यातल्या छान मैत्रीनेही प्राण सोडले.

कारण तिला ठाऊक होते पुन्हा बोलत राहीलो की,त्याच्या भावना आणखी वाढल्या असत्या आणि तो कोणत्याही मार्गाने तिला त्याचे प्रेम पटवून देत राहीला असता.आणि कदाचित एक दिवस तिचाही स्वतः वरचा ताबा सुटला असता.आणि ती त्याच्यासाठी तिच्या प्रवाहाच्या उलट दिशेने वाहू लागाली असती.

म्हणूनच तिने मनावर दगड ठेऊण त्याच्यापासून दुर जाण्याचा “निर्णय” घेतला.कारण तिला ठाऊक होते त्यांचे नाते एका “झाडापासून वेगळया झालेल्या फांदीला पालवी फुटण्या सारखे होते”

…..कारण ……..कारण त्या दोघांचेही लग्न झाले होते……..दुर्देव त्यांचे की,ते फार उशीरा भेटले,

दुर दुर राहूनही एकमेकांच्या मनात साठले……

एकमेकांची उणीव आता त्यांच्या मनात कोणीच भरू शकणार नाही.

विस्कटलेली मने आता कधीच मैत्रीही करू शकणार नाहीत….

त्याच्या वेदनांचे अश्रू मात्र आजही तिच्या डोळयांत वहातात,

आणि त्याचेही प्रत्येक क्षण आजही तिच्या होकाराची वाट पहातात….

आता मनापासून प्रेम करूनही कायम रहातील ते दोघे एकमेकांस परके,

अगदी एकाच नदीच्या दोन किना-यां सारखे…..

Please follow and like us:

Leave a Reply