मुंबईकरानो, तुम्हाला हे माहित नसणारच।

मुंबईकरानो, तुम्हाला हे माहित नसणारच।

1944 Bombay harbour explosion propeller piece

बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये 25 किलो वजनाचे सोन्याचे बार, कापसाच्या गासडया, अन्न धान्य, तेलाची पिंप आणि सोबत 1400 टन स्फोटके आणि दारुगोळा असलेलं माल वाहतूक करणारं एक जहाज (Fort Stikine) येऊन थांबलं तेव्हा ते जहाज तब्बल 800 ते 1300 मुंबईकरांचा बळी घेणार आहे आणि परिसरातील 80 हजार लोकांना निर्वासित करून 3 हजार लोकांना जायबंदी करणार आहे असा विचारही कोणाच्या मनात त्यावेळी आला नसेल।

दिनांक 14 एप्रिल 1944 च्या दुपारी 4.15 वाजता आणि 4.34 वाजता जहाजावरील स्फोटकांनी संपूर्ण मुंबई हादरून गेली। स्फोटकाची तीव्रता 80 कि. मी. परिसरात जाणवली इतके भयंकर स्फोट होते ते। दोन कि. मी.परिसरातील लोकांची अक्षरशः राख रांगोळी झाली।

Loading...

मुंबई फायर ब्रिगेडचे 71 जवान जीव गमावून बसले। आजूबाजूला समुद्रात उभी असलेली 13 जहाज एक तर समुद्रात बुडाली किंवा नाहीशी झाली। जहाजावर 50 हजार टन तांदूळ अन अन्न सामुग्री होती ती नष्ट झाली।

Loading...

त्यामुळे कित्येक महिने मुंबईत त्याचा तुटवडा निर्माण झाला। सोन्याचे बार कुठल्या कुठे हवेत भिरकावले गेले ते हल्ली 2011 मध्येही सापडले।छोट्या मोठ्या 6 हजार कंपन्यांना त्या भयंकर स्फोटाची झळ पोहोचली त्यामुळे 50 हजार लोकांनी नोकऱ्या गमावल्या।

तब्बल 8 हजार स्वयंसेवक 7 महिने साफसफाई करत होते इतका कचरा सगळीकडे गोळा झाला होता। जवळपास 5 लाख टन इतका हा कचरा होता।

स्फोटाची तीव्रता इतकी होती की 1700 कि. मी. दूर सिमला येथे भूगर्भ शास्त्रज्ञांनी त्याची नोंद केली।S.S.Fort Stikine हे त्या जहाजाचं नाव, जे बांधून फक्त 2 वर्ष झाली होती।

स्फोटकांनी भरलेल्या जहाजावर कापसाच्या 87 हजार गासडया आणि तेलाची पिंप भरली तेव्हाच जहाजाच्या कप्तानाने आक्षेप घेतला होता, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं।

ज्याची शिक्षा हजारो मुंबईकराना भोगावी लागली। प्रत्यक्षात 1300 लोक मेले पण इंग्रजांनी 800 लोक मेल्याची नोंद केली।

आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मुंबई अग्नीशमन दलाच्या त्या 71 जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ दर वर्षी 14-21 एप्रिल हा कालावधी राष्ट्रीय अग्निशमन सप्ताह म्हणून पाळला जातो।

तेव्हा मुंबईची लोकसंख्या होती अवघी 18 लाख। त्यामुळे बहुसंख्य मुंबईकरांना ही भयंकर घटना माहीत नाही।

Please follow and like us:

Leave a Reply