करार….

करार….

मी अशी पहिल्यांदाच वागले

तुझे माझे करार मोडीत काढले

वही मधली पानं जी तुझ्यासाठी लिहिले

Loading...

ती सर्वच फाडून काढले

मी अशी पहिल्यांदाच वागले

Loading...

तू फक्त माझा आहेस

असं म्हणत स्वतःलाच ठगले

खोट्यानाट्या भेटीवर

मीच मला जगवत आणले

मी अशी पहिल्यांदाच वागले

गुलाब समजून स्पर्श तुझे

हाती धरले निखारे

हाता सोबत सर्वच अंग

जाणवतात हल्ली जळाले

मी अशी पहिल्यांदाच वागले

गाणी ऐकली एकटीच हिंडले

तुला शोधत खूप रडले

टोके व्यथांची आता

घासून घासून गुळगुळीत केले

झाले गेले निर्माल्य म्हणून

माझ्यात उफाळलेल्या

तू समुद्रात वाहून आले

मी अशी पहिल्यांदाच वागले

नव्हती तेवढी कठोर झाले

माझे दिवस दुप्पट होतील

एवढ्या रात्री जागून काढल्या

आता मी शांत झाले

भावूकतेला, त्या स्वप्नांचे निरोप घेतले

रागात रडत भुकत

होते नव्हते ओकून टाकले

पण मी अशी पहिल्यांदाच वागले

मी अशी पहिल्यांदाच वागले

स्पंदन…..(पल्लवी चौधरी)

 

Please follow and like us:

Leave a Reply