पुरूषनजर!!!

पुरूषनजर!!!

नेत्र डोहात उतरतो
जेंव्हा नजरदेह तुझा…

काजळकाठांवरून अलगत
घसरेल नजरपाय तुझा…

संवेदनांना शोधत शोधत
दमून जाईल जीव तुझा…

Loading...

कोरड पडता नजरघशाला
ओठतळ्यावर शोध तुझा….

 

Loading...

नितळ गुलाबी लब्जरस तो
शांत करतो दाह तुझा..

काळीज गुफेत फिरता फिरता
स्त्री अविष्कार होतो तुला…

कधी होतो भयकंपीत तू, तर
कधी प्रणय शहारतो तुझा

बघून ती वक्षपर्वते
जीव घसरून जातो तुझा…

योनीकुंडावर डूबुन घेतो
पुन्हा जन्मतो मग अंश तुझा…

उदात्त पुरूषी नजरेने बघ
घडेल उद्याचा राष्ट्र नवा!!!

स्पंदन…..(पल्लवी चौधरी)

Please follow and like us:

Leave a Reply