भारतातील पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई गोपाळराव जोशी

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

स्मृतिदिन – २६ फेब्रुवारी १८८७

आनंदीबाई गोपाळराव जोशी (मार्च ३१, इ.स. १८६५- फेब्रुवारी २७, इ.स. १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.

वैद्यकीय शिक्षण

लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. गोपाळरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला.

Loading...

परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्त धर्म न स्वीकारता १८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी “वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया” मध्ये प्रवेश मिळाला.

दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली.

Loading...

एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणी कडून सुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या.

‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली. स्वप्न पुरे झाले. आनंदी भारतात परतली. एव्हाना तिला क्षयाची बाधा झाली होती. बोटीवर कुणीही गोऱ्या डॉक्टरने तिला बिगर- गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाही.

मायदेशी पोहोचल्या नंतर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहिनात!

भारतात आगमन

एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पीटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

मृत्यू

वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैर्वानं आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही.

मात्र ‘चूल आणि मूल’ म्हणजेच आयुष्य असं समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्री शिक्षणा साठी खस्ता खात असतानाच आनंदी -गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते .

जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.

Please follow and like us:

Leave a Reply