डायबेटिक न्यूरोपॅथीरोप्याथी (पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ)

डायबेटिक न्यूरोपॅथीरोप्याथी (पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ)

रक्तशर्करेचे प्रमाण सातत्याने अधिक राहिल्याने मज्जातंतूंची हानी होणे म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी होय.

डायबेटिक न्यूरोपॅथी झालेल्या रुग्णांना भेडसावणाऱ्या वेदना इतक्‍या तीव्र असतात की त्यामुळे शांत झोप लागत नाही,

दैनंदिन कामकाज करण्यात अडचणी येतात तसेच आयुष्याचा आनंद उपभोगताही येत नाही.

Loading...

पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ, सोबतच संवेदना कमी होणे, त्रास जाणवणं या समस्या अनेकांमध्ये आढळतात.

वैद्यकीय भाषेत या त्रासाला म्हणजेच पायांच्या नसांचे नुकसान होऊन जाणवणार्‍या या त्रासाला neuropathy म्हणतात.

Loading...

पायाची जळजळ वाढण्यासोबतच अनेकांना तळव्यांवर सूज, लालसरपणा किंवा घाम येणं अशी लक्षण देखील आढळतात.

मधुमेहाने ग्रासलेल्यांपैकी 20 टक्के रुग्णांना डायबेटिक न्यूरोपॅथीने कुठल्या तरी प्रकाराने विळखा घातलेला असतो आणि वर्षाहून अधिक काळ मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये त्याचा धोका अधिक असतो.

हा विकार रक्तशर्करेची मात्रा नियंत्रणात ठेवू न शकणाऱ्या आणि लठ्ठ व्यक्तींमध्येही दिसून येतो. पन्नाशीच्या जवळ असलेल्यांमध्ये neuropathy चा त्रास अधिक तीव्रतेने आढळून येतो.

डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे कमरेखालच्या भागात वेदना आणि अवघडलेपण येते. मधुमेह झालेल्या प्रौढांमध्ये शरीराच्या खालच्या भागात संरक्षक संवेदना कमी होणे किंवा नाहीशा होण्याने तोल सांभाळणे, पायांना जखमा होणे आणि आयुष्याचा दर्जा घसरणे अशा समस्या भेडसावतात.

डायबेटिक न्यूरोपॅथीचे प्रकार :

पेरिफेरल न्यूरोपॅथी –

सर्वाधिक आढळणारा न्यूरोपॅथीच्या या प्रकारात

टाच, हात, दंड, पाय आणि तळव्यांमध्ये दुखणे जाणवते.

ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी –

या प्रकारात शरीराच्या अशा भागांवर परिणाम होतो ज्याच्या कार्याची आपल्याला सतत जाणीव होत नाही.पचन,

मलाशय आणि मूत्राशयातील हालचाली, घाम येणे, लैंगिक कार्यक्षमता आणि हृदय, फुप्फुसे, डोळे, रक्तदाब नियंत्रित करणा-या मज्जातंतू.

प्रॉक्‍झिमल न्यूरोपॅथी –

मांडया, नितंब, कंबर यांच्यावर परिणाम करणा-या न्यूरोपॅथीच्या या प्रकारामुळे पायांमध्ये अशक्तपणा येतो.

 

फोकल न्यूरोपॅथी –

एक मज्जातंतू किंवा त्याच्या समूहावर परिणाम झाल्याने अचानक स्नायूंमध्ये अशक्तपणा किंवा तीव्र वेदना उद्भवतात.

डायबेटिक न्यूरोपॅथीचा प्रादूर्भाव झाल्याने पाय आणि तळव्यांमध्ये बधिरपणा किंवा झिणझिण्या येतात. काही व्यक्तींमध्ये डायबेटिक न्यूरोपॅथीची लक्षणे सौम्य प्रकारची असतात, पण काही दुर्दैवी व्यक्तींमध्ये या कमालीच्या वेदनादायी व जीवघेण्या ठरू शकतात. दुर्धर न्यूरोपॅथिक वेदना 70 ते 80 टक्के मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आढळून येतात.

दुर्धर डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे न्यूरोपॅथीची समस्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणे. न्यूरोपॅथीमध्ये जळजळ, विजेच्या धक्‍क्‍यासारख्या वा खुपल्यासारख्या वेदना आणि खोलवर वेदना अशी लक्षणे आढळतात.

दिवसाच्या तुलनेत रात्री या वेदना तीव्र रूप धारण करतात. या विकारात केवळ वेदनाच उद्भवतात, असे नाही तर चित्तवृत्ती आणि झोपेवर परिणाम होणे, स्वावलंबन आणि स्वाभिमानाला धक्का पोहोचणे, परस्पर नातेसंबंधांवर दुष्परिणाम होणे,

अशा घटनांमुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनमानाच्या एकूणच दर्जावर कमालीचा परिणाम होतो.

डायबेटिक न्यूरोपॅथी वेदनांवर उपचार

डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे उद्भवणाऱ्या वेदनांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असले तरी रक्तशर्करा पातळी नियंत्रणात ठेवणे ही प्रतिबंधाची पहिली पायरी आहे.

रक्तशर्करा पातळीची मर्यादा नियंत्रणात ठेवल्याने लक्षणे आणि वेदना नियंत्रणात राहण्यास मदत होते. भारतातील मधुमेही रुग्णांमध्ये डायबेटिक न्यूरोपॅथीविषयी जागरूकता नाही. त्यामुळे त्यावर उपचार लवकर केले जात नाहीत.

त्यामुळेच, डायबेटिक न्यूरोपॅथी झालेल्या रुग्णांचा विकार दुर्धर होऊन त्याचे रूपांतर डायबेटिक फूटमध्ये होऊन, पाय कापण्याची वेळ येते.
न्यूरोपॅथीक वेदनांमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन यासारखी औषधे फारशी प्रभावी ठरत नाहीत.

त्यामुळेच, औषधे घेण्याआधी रुग्णांनी डॉक्‍टरांचा सल्ला घेणे कधीही श्रेयस्कर. डायबेटिक न्यूरोपॅथी झालेल्या अंदाजे 6 ते 8 टक्के रुग्णांमध्ये विकार बळावून दुर्धर डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये त्याचे रूपांतर होते.

डायबेटिक न्यूरोपॅथीवर सुरुवातीलाच उपचार करण्यास सुरुवात केली तर त्याची वाढ खुंटते आणि वेदनांवरही नियंत्रण राहते.

लक्षात ठेवा…

सातत्याने रक्तशर्करेचे प्रमाण अधिक राहिल्याने मज्जातंतूंना हानी पोहोचते, याच अवस्थेला डायबेटिक न्यूरोपॅथी असे म्हणतात.
डायबेटिक न्यूरोपॅथी हा मधुमेहींमध्ये सर्वाधिक आढळणारा बिघाड असून जवळपास 30 टक्के मधुमेहींना त्याचा त्रास होतो.

न्यूरोपॅथीची वेदना म्हणजे जळजळ, टोचण्याची वा खुपसल्याची भावना, असामान्य किंवा अतिसंवेदनशील आणि खोलवर दुखणे.
डायबेटिक न्यूरोपॅथीवर सुरुवातीलाच उपचार करण्यास सुरुवात केली तर त्याची वाढ खुंटते आणि वेदनांवरही नियंत्रण राहते.

पॅरासिटेमॉल आणि आयबुप्रोफेन न्यूरोपॅथीच्या वेदनांमध्ये फायदेशीर ठरत नाही. योग्य औषधोपचारांसाठी रुग्णांनी डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

व्हिटॅमिन बी12 ची कमतरता –

शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हातापायांमध्ये जळजळ किंवा संवेदना कमी होण्याचा त्रास होतो. अनेकांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे चालताना त्रास होतो.

मद्यपानाचे व्यसन –

Neuropathy चा त्रास वाढण्यामागे मद्यपानाची सवय हेदेखील असू शकते. दारूमुळे नसांच्या टीश्यूचे नुकसान होते. त्यावर मात करण्यासाठी मद्यपानाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

औषधोपचार –

काही औषधांमधील ड्रग्ज शरीरावर दुष्परिणाम करतात त्यामुळे पायांची जळजळ वाढते. टीबीच्या औषधांमुळे, केमोथेरपी तसेच कॅन्सरची ड्रग्ज यांमुळे पायांची जळजळ वाढू शकते.

किडनीचे विकार –

किडनीचे आजार असणार्‍यांमध्ये किंवा डायलिसीसवर असणार्‍यांमध्ये पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ जाणवते. काही वेळेस अशा रुग्णांमध्ये रेस्टलेस लेग सिंड्रोमचा त्रासदेखील जाणवतो.

एचआयव्ही –

एचआयव्ही व्हायरसमुळे हातापायाची जळजळ वाढणे हा त्रास सहज आढळतो. त्याला peripheral neuropathy असं म्हणतात. यासोबतच स्नायू कमजोर होणं, वेदना जाणवणं, जळजळ वाढणं तसेच सुसंगती बिघडणे अशा समस्यादेखील वाढतात.

अ‍ॅनिमिया

बी12 व्हिटॅमिन्सच्या कमतरतेप्रमाणेच शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे जळजळ वाढते. रक्ताच्या चाचणीने आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याने त्याचे योग्य निदान करता येईल.

Lyme disease

एखादा कीटक चावल्यास किंवा प्राण्यांच्या लाळेतून, बाधित प्राण्याशी संपर्क आल्यानंतर वाढणारे त्रास या लक्षणाने ओळखले जातात. यामध्ये हाBता-पायाची जळजळ वाढते. यामुळे तुमच्या घरात पाळीव प्राणी असल्यास घाबरू नका. हाता-पायाला होणारी जळजळ हे Lyme disease मधील प्रमुख लक्षण नाही.

डॉ .श्री .नितिन जाधव.

संजीवन चिकित्सक .

डोंबिवली. 9892306092.

 

Please follow and like us:

Leave a Reply