आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर भेटणाऱ्या एका मोगऱ्याच्या गजऱ्याचा प्रवास!

#गजरा
एका मोगऱ्याच्या गजऱ्याचा प्रवास चार प्रसंगातून…
चार प्रसंग…तुम्हाला आवडेल तो घ्या…

https://i.ytimg.com/vi/gQcCq-SLtf8/maxresdefault.jpg

 

प्रसंग पहिला ….

तो ऑफिस मधून घरी येतो, हळूच अंदाज घेतो, आई बाबा टीवी बघत असतात, आजी देवघरात असते, हळूच बॅग ठेवतो आणि किचन मध्ये डोकावतो…

ती स्वयंपाक करत असते, सगळ्याचा डोळा चुकवून गपचुप स्वयंपाक घरात जातो आणि अचानक त्याला बघून ती दचकते पण खुषही होते..

Loading...

तो हळूच तिच्या जवळ जातो, दोन्ही हातांनी मागे लपवलेला गजरा तिच्या समोर धरतो, तिचे डोळे गजरा बघून आनंदाने चमकतात, चेहरा खुलुन जातो…

ती गजरा आपल्या ओंजळी घेते, नाकापाशी नेवून डोळे मिटून दीर्घ श्वास घेते आणि मोगऱ्याच्या वासाने ती मोहरून जाते….ते बघून तो ही खुष होतो म्हणतो तिला दे तुझ्या केसात माळतो….तशी ती गोड लाजते…

Loading...

आणि म्हणते “इश्श काहीतरीच काय, कोणी येईल एवढ्यात “….पण तो जिद्दीला पेटतो… म्हणतो “कोणी नाही येत दे एका मिनिटात माळतो..”

तो गजरा माळायला जातो..तेवढ्यात आज्जी आत येते, आणि म्हणते “पिंटया, आलास का रे,जा पटकन हात पाय धुवून ये मग जेवायला बसु” तो झटकन बाजुला होतो, ती गजरा लपवते..तो वैतागुन आज्जीला म्हणतो..” आज्जी आता तरी पिंटया नको ना म्हणू, आताच तर माझे लग्न झालय ”

ती खुदकन हसते.. तो तिच्यावर खोटे-खोटेच डोळे वटारतो…

काही दिवसांनी प्रसंग दूसरा….

तो ऑफिस मधून येतो, मूल खेळत असतात, आई बाबा टीवी बघत असतात,

आज्जीच्या फोटोला हार असतो..ती किचन मध्ये असते…

तो ऑफिसची बॅग टेबलावर ठेवतो आणि हळूच गजरा सरकावतो किचन टेबलावर,

ती तो पटकन उचलते, तो फ्रेश व्हायला जातो.

परत येतो, तर तिन गजरा गपचुप केसात माळलेला असतो, ते बघून तो खुष होतो,

दोघे एकमेकांकड़े बघून मंद आणि प्रसन्न हसतात आणि तो आई-बाबा शेजारी जावून बसतो..

 

काही महिन्यांनी प्रसंग तिसरा…

 

तो ऑफिस मधून येतो.. आई-बाबांच्या फोटोला हार असतो, मोठ्या आवाजात ढेंणढेंण म्यूजिक सिस्टम सुरु असते, कार्ट त्यात पूर्ण गुंगलेल असत, ती किचन मधे असते, तो पोरावर खेकसतो…

‘ बंद कर ते डबड ‘, पोरग सिस्टीम बंद करून रिमोट आपटून निघून जात, तो बॅगेतुन गजरा काढून टेबलवर आदळतो आणि तिच्यावर वचकतो…

काय अडल होत याच्या वरून किती वळून-लांबून गाड़ी मला ट्राफिक मधून आणायला लागली याच्यासाठी, मग ती ही चिडते.
तुम्हाला माझ एक काम करायला नको, कधी नव्हे ते एक गोष्ट आणायला सांगतली तरी त्यात ही किती कटकट..

गजरा घेवुन ती फ्रिज मध्ये कोंबते.. तो ही वैतागुन आत निघून जातो…

 

काही वर्षांनी प्रसंग चौथा…..

 

ती डायनिंग टेबलवर बसून वाती वळत असते, तो बाहेरून येतो…

तिच्याकडे गजऱ्याचा पुडा देतो आणि म्हणतो घे तुझ्यासाठी आणलाय..

ती – मला म्हातारीला कशाला हवा आता गजरा, धड वेणी सुध्दा घालता येते नाही आता…

तो – असू दे ग…. घाल आता कसा-बसा. अस म्हणून तो आत जातो.

म्हातारी गजऱ्याचा पुडा उघडून गजरा बाहेर काढते. गजऱ्याचे दोन टोक एकत्र करते आणि गाठ बांधते… त्याचा हार तयार होतो….ती उठून देवाला तो घालते व नमस्कार करते आणि पुन्हा वाती वळू लागते…

तो आतून बाहेर येतो, गजऱ्याचा हार देवाच्या गळ्यात बघून फक्त हसतो आणि मनातल्या मनात म्हणतो…

ही म्हातारी काही सुधारायची नाही…

Please follow and like us:

Leave a Reply