नेहमीच्या चहाला एक उत्तम पर्याय -ग्रीन टी !

https://www.healthline.com/hlcmsresource/images/AN_images/AN79-Green_tea_on_wood-1296×728-Header.jpg

एंटी-ऑक्सीटंट्सने भरपूर असलेली ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर असते. या चहाचे सेवन त्या व्यक्तींसाठी फायद्याचे ठरते ज्यांना वाढलेले वजन कमी करण्याची इच्छा आहे.नेहमीच्या चहाला एक उत्तम पर्याय -ग्रीन टी ! आरोग्यदाई आणि उत्साहवर्धक

पण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सारखे सारखे सेवन करणे देखील आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. त्रास जाणवेल

Loading...

ग्रीन टीमध्ये अनेक स्वास्थ्यवर्धक गुण उपलब्ध असतात. याचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होते, त्वचा सुंदर बनते, स्मरण शक्ति वाढते, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच यामुळे दातांची कीड, अर्थरायटिस, किडनीचे रोग, हृदय रोग आणि अनियमित रक्तदाबा कमी करण्याचे महत्वपूर्ण काम करत असते.

पण याचे अधिक सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.खुप सेवन चांगले नाही.

Loading...

जरी ग्रीन टीमध्ये जास्त प्रमाणात कॅफीन उपलब्ध नसते. पण, एका कालावधीनंतर याचे सेवन करत राहिल्यास अनिद्रा, चिंता, चिडचिड आणि शरीरात आयरनची कमतरता जाणऊ शकते. साधारण ग्रीन टी ही दिवसातून जास्तीत जास्त 2-3 कप प्यायला पाहिजे.

यापेक्षा अधिक प्यायल्याने त्रास होण्याची भिती अधिक असते.

गर्भावस्थेत टाळा.

ग्रीन टीमध्ये असलेले कॅफीन व टॉनिक ऍसिड गर्भवती महिला आणि गर्भातील शिशुसाठी चांगले नसते. त्यामुळे गर्भवस्थेत याचे सेवन करणे टाळावे.

ब-याच वेळापूर्वी करून ठेवला चहा

ब-याच वेळ चहा ठेवल्याने त्यामध्ये उपलब्ध असलेले व्हिटॅमिन आणि त्याचे एंटी-ऑक्सीडंट गुण कमी होण्यास सुरूवात होते. इतकेच नव्हे तर काही कालावधीनंतर यामध्ये बॅक्टेरिया तयार होण्यास सुरूवात होते.

त्यामुळे जर एक तासाच्यावर करून ठेवलेल्या ग्रीन टीचे सेवन करणे टाळा.

रिकाम्या पोटी सेवन करू नये –

सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन करण्याने ऍसिडिटीचा त्रास होण्याची भिती असते.

त्यामुळे सकाळी रिकाम्यापोटी ग्रीन टीचे सेवन करण्याऐवजी एक ग्लास कोमट बडीशोपचे पाणी पिण्याची सवय लावा. असे केल्याने पचन शक्ती सुधारण्यास मदत हते.

जेवणानंतर लगेच –

ज्या व्यक्तींना तत्काळ वजन कमी करण्याची इच्छा आहे अशा व्यक्ती जेवणानंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन करतात. असे केल्याने पचन आणि पोषक तत्वांचे अवशोषण प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यता असते.

मध्यरात्री पिणे

कोफिनच्या सेवनानंतर मेंदू अधिक तत्परतेने काम करण्यास सुरूवात करतो. पण यामुळे झोप उडते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टीचे सेवन करणे टाळावे.

औषध घेतल्यानंतर –

कोणत्याही प्रकारचे औषध घेतल्यानंतर लागलीच ग्रीन टीचे सेवन करणे टाळावे.

उकळू नये

उकलत्या पाण्यामध्ये कधीच ग्रीन टी टाकू नये. असे केल्याने ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते. असे होऊ नये यासाठी सर्वात पहिले पाणी उकळून घ्यावे आणि मग त्यानंतर त्यामध्ये ग्रीन टीचे पाने अथवा टी बॅग टाकून झाकून ठेवावे.

साधारण दोन मिनिटांनंतर चहा गाळून त्यातून टी बॅग वेगळी करावी.

वजन कमी करणे

एक्सरसाइज आणि वर्कआउट करून देखील तुमचे वजन कमी होत नसेल तर, तुम्ही दिवसा ग्रीन टीचे सेवन करणे सुरू करा.

ग्रीन टी मध्ये एंटी-ऑक्सीडंट्स असल्याने बॉडीतील फॅट नष्ट होण्यास मदत होते.

एका अभ्यासात असे समोर आले आहे की, ग्रीन टीच्या सेवनामुळे शरीराचे वजन स्थिर राहण्यास मदत होते..स्ट्रेस कमी करण्यासाठी
तुम्हाला जर स्ट्रेस आला असेल तर चहा सेवन तुमच्यासाठी औषधाप्रमाणे काम करेल.

चहाच्या सेवनामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.

सनबर्नपासून बचावासाठी

चेह-यावर सनस्क्रीन लावल्यानंतर देखील सनबर्नचा त्रास कमी होत नाही. यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चहाची पावडर टाकून अंघोळ करावी.

असे केल्याने सनबर्नमुळे होणारी जळजळ खाज इत्यादींपासून आराम मिळण्यास मदत होते.

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी

डोळ्यांवर आलेली सूज आणि थकवा कमी करण्यासाठी चहा पावडर परफेक्ट उपाय आहे. यासाठी तुम्हाला केवळ दो टी बॅग्स घ्यायच्या आहेत आणि हलक्या गरम पाण्यामध्ये ओल्याकरून 15 मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवायच्या आहेत.

असे केल्याने डोळ्यांमध्ये होणारी जळजळ आणि सूज कमी होते. टी बॅग डोळ्यांवर ठेवल्याने डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते.

चहामध्ये एंटी-बॅक्टेरिअल, एंटी-फंगल, एंटी-ऑक्सीडंट उपलब्ध असल्याने सूज कमी होते. चेह-यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी रात्री झोपताना ग्रीन टीची पाने चेह-यावर लावावी.

स्किन प्रोटेक्टर

ग्रीन टीच्या सेवनामुळे स्किन टाइट राहण्यास मदत होते. यामध्ये एंटी-एजिंग एलिमेंट्स भी असतात.

तसेच ग्रीन टीमध्ये एंटी-ऑक्सीडंट्स आणि एंटी-इन्फ्लामेंटरी एलिमेंट्स एकत्र असल्याने स्किन प्रोटेक्ट राहण्यास मदत होते.

ग्रीनटीचे स्क्रब बनवण्यासाठी व्हाइट शुगर, थोडे पाणी आणि ग्रीन टी चांगल्या पद्धतीन एकत्र करून घ्यावे…

Please follow and like us:

Leave a Reply