धकाधकीच्या जीवनात दिवसभर आनंदी कसे राहाल !

धकाधकीच्या जीवनात व्यस्त व्यापात दिवसभर आनंदी कसे राहाल !

आनंद तर सर्वत्रच आहे. त्याचा अनुभव घेत राहा. मुळात तुमच्या ‘ असणेपणातच ’ आनंद भरून राहिलेला आहे. बाहेर काही नसते. तुमच्या असणेपणातच आनंद आहे.

त्याचा अनुभव घ्यायला शिकावे लागते.सकाळी एकदा आनंदाशी ट्यून केल्यानंतर शक्यतो दिवसभर आनंदी रहाल.

पण मध्येच एखादा प्रसंग येतो आणि मनामध्ये आनंदाऐवजी इतर नकारात्मक भावना निर्माण होतात.

अशावेळी तुमचे विचारांवर पूर्ण नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचार हाकलून लावा.

Loading...

त्यासाठी नकारात्मक विचार आतमध्ये उमटू लागले की, (मनात नकारात्मक विचार येताहेत हे कळण्यासाठीसुद्धा सजगताच आवश्यक आहे.) ते नकारात्मक विचार हाकलून लावा.

मनात त्या विचारांचे तरंग निर्माण होताहेत असे लक्षात येताच ‘कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल’ असे तीन वेळा म्हणा आणि सकारात्मक, आनंदी विचारांचे मनापासून स्वागत करा.

त्यावेळी प्रत्यक्ष म्हणा,जगातल्या समस्त आनंदी विचारांनो!

Loading...

तुम्ही माझ्याकडे या. मी तुमचे स्वागत करतो!निसते हे वाचू नका, तर तसे प्रत्यक्ष म्हणा. प्रत्यक्ष म्हटल्याने व तशी भावना केल्यानेच फरक पडू लागतो. विचार बदलू लागतात.

मन शांत ठेवा आणि आनंदी विचार निर्माण करा व दिवसभर आनंदी रहा.

http://lifepopper.com/wp-content/uploads/2015/10/Happiness-is-a-choice-lifepopper-words-of-wisdom-how-to-live-a-happy-life-stay-positive-smile-1.jpg

चुकून दुःखद प्रसंग ओढवलाच तर शांत रहा. उदासीन रहा व निसर्गावर सोपवा. सर्व कही ठिक होईल.

एखादा कोणी नकारात्मक भेटला किंवा अपमानास्पद काही बोलला, वागला तर तो प्रसंग मनाला लावून घेऊ नका.

लगेच तिथेच विसरून जा. ते ओझे डोक्यावर घेऊन आयुष्यभर त्याला वागवित बसू नका. नाहीतर लोक असे म्हणतात, तो माझ्याशी असं वागला आहे, ते मी कधीच आयुष्यभर विसरणार नाही.

माझा नम्रपणे सांगणे आहे की, बाबारे! जेवढ्या लवकर शक्य तो तिथेच विसरून जा.

असली किती ओझी डोक्यावर घेऊन फिरणार आहेस? असल्या ओझ्यांनी माणून दबून जातो, पिचतो आणि वाकतो.

पण काही केल्या डोक्यावरील ओझी काही टाकू इच्छित नाही. मी का विसरू? कसं विसरू? विसरूच शकत नाही! असे मन रिजिड झालेले असते.तिथेच विसरून जाण्यासाठी साधी गोष्ट अशी,

रस्त्याने जाताना कुत्रे अंगावर आले, भुंकले म्हणून काय आपण त्याच्यावर रागावतो का?

खरे तर ते कुत्रे भुंकून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला विसरून त्याच्या जाग्यावर जाऊन शांत बसते. पण माणूस मात्र त्याला बरोबर घेऊन येतो!

असे प्रसंग हे वस्तूसारखे समजा. आपण कुणाच्यातरी ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या खूर्चीवर बसतो. काम संपल्यानंतर उठून निघून येतो.

मात्र डोक्यात ती खूर्ची नसते. जशी ती खुर्ची नसते तसे त्या व्यक्तीविषयीचीही खराब भावना येताना घेऊन यायची नाही.

त्याने व्यक्त केलेली नकारात्मक भावना तुम्ही स्वीकारता आणि तुमची बनवून ती वागवित राहाता.

जसे त्या कुत्र्यावर आपण रागावत नाही. त्याचे कर्म ते करते. आपण त्याला रिअँक्ट होऊ नये. रिअँक्ट झाले की त्याच्यात व तुमच्यात काहीच फरक राहात नाही.

त्याची समज, क्षमता, संस्कार, इ. त्याची खोली, पक्वता, इ. गोष्टींचा विचार करून ते विसरून जावे व आपण आपल्या आनंदात राहावे. वेडपटाच्या नादी कोणी लागत नाही. तसेच समाजात अनेक लोकांचा भरणा आहे.

त्यांची उपेक्षा करावी. त्यांच्यात सामील झालात तुमच्या आतमध्येही तेच येते.

म्हणून साधकाने अशा गोष्टीकडे उपेक्षेने व तटस्थतेने पहावे.स्वतःला आनंदाशी ट्यून करा.सकाळी उठल्या क्षणी आनंदीवृत्ती निर्माण करा.

आनंदीभाव मनामध्ये आणा. ओठ विस्फरून स्मित हास्य चेहऱ्यावर निर्माण करा. (खरोखर करा, प्रसन्न मनाने हसा)मनामध्ये आनंदी विचार आणा. उत्साह निर्माण करा. आनंद, उत्साह अंगामध्ये संचारू द्या. पूर्ण सतेज व्हा.

हा आऩंद व उत्साह दिवसभर टिकवा. सकाळी एकदा आनंदाशी ट्यून झालात की मग दिवसभर आनंदाच्या चॅनलवर रहाल.जीवनातील एखादा सुंदर प्रसंग आठवा.

मन उल्हसित करा. ओठावर स्मित हास्य किंवा छान हसा आणी दिवसाला सुरुवात करा.

दिवस हे एक आयुष्याचे युनिट आहे. तुमचा एकेक दिवस आनंदात गेला तरच संपूर्ण आयुष्य आनंदी जाऊ शकते.

दुसरा काहीतरी म्हणतो म्हणून दुखी, कष्टी होऊन तुमच्या आयुष्यातील तो दुःखात गेलेला वेळ वाया का घालवता.

मजेत रहा, आनंदी रहा, हसत रहा. आमचे वर्कशॉप केल्यानंतर आनंद व हास्य आतून उमलून फुलून वर येते.

Please follow and like us:

Leave a Reply