हातातील चुंबकीय शक्ती

magnetic power of hand

हातातील चुंबकीय शक्ती

निसर्गाने माणसाला दोन हात दिले आहेत. शरीर शास्त्राच्या चुंबकीय शक्तीचा विचार केला असता डाव्या हाताचा पंजा हा उत्तर ध्रुव म्हणजे ऋण भार व उजव्या हाताचा पंजा हा दक्षिण ध्रुव म्हणजे धन भार असतो. ह्याचा उपयोग आपले शरीर स्वास्थ नीट करण्याकरता वापरता येतो.*प्रथम दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासून भारीत करून घ्यावेत व पुढील प्रमाणे वापरावेत

 

*卐 डोके दुखणे

आपला डावा हात डोक्यावर व उजवा हात मानेवर १५ मिनिट (घड्याळ लावून ) ठेवला तर डोके दुखायचे थांबते व मान दुखू लागते. नंतर डावा हात मानेवर व उजवा हात उजव्या बरगडी खाली लिव्हरवर १० मिनिट ठेवला तर मान दुखणे थांबते व आपण मोकळे होतो.

卐 छातीत दुखणे-

(हार्टअॅटॅक सुध्दा) पोटातील गॅस छातीत प्रेशर देऊ लागले कि छातीत दुखते (हार्टअॅटॅक) येतो. अशा वेळी डावा हात डाव्या बरगडीखाली (स्प्लिनवर) आणि उजवा हात उजव्या बरगडीखाली(लिव्हरवर)१५ मिनिटे ठेवला तर पोटातील गॅसेस बाहेर पडतात व छातीत दुखायचे थांबते.

Loading...

卐 दमा

दमेकऱ्याला अँटॅक आला की श्वास घ्यायला त्रास होतो. अशा वेळी उजवा हात गळ्याला खळगा असतो तेथे व त्याखाली एक वीत अंतरावर डावा हात १५ मिनिटे धरला तर धाप कमी होते.

卐 मूल एक वर्षाचे होई पर्यंत शी बिघडली किंवा झालीच नाही तर आई किंवा वडील किंवा कोणी मोठ्यांनी त्यांचा डावा हात बाळाचे बेंबीवर व उजवा हात बाळाचे पाठीला असे १५ मिनिट धरले तर शी सुधारते. बाळाची तब्बेत ठीक राहण्यासाठी असे रोज करावे.

Loading...

卐 जेवणानंतर पोटावर म्हणजे बेंबी व बरगडी यांचे मध्ये उजवा हात १५ मिनिटे ठेवला तर अन्न नीट पचते. हे वयस्कर लोकांना फार उपयोगी आहे.

卐 पाळीला पोटात दुखत असेल तर ओटीपोटावर दुखणाऱ्या जागी डावा हात व मागे माकडहाडावर उजवा हात असे १५ मिनिटे धरले तर पोटात दुखणे कमी होते.

卐 पीसीओडी साठी स्त्रीयांनी ओटीपोटावर डावा हात व मागे माकडहाडावर उजवा हात १५ मिनिटे ठेवावे. असे २-३ महिने करावे.

卐 डोळ्यांच्या त्रासासाठी हात एकमेकांवर घासून डोळ्यावर ठेवले असता फायदा होतो. नंबर कमी होण्याची शक्यता.

卐 नाकातील हाड वाढले असेल तर डावा हात भूमध्यावर व उजवा हात डोक्याला मागील बाजूस १५ मिनिटे धरावेत. हे दिवसातून दोन तीन वेळा करावे.

卐 कान दुखत असेल तर दुखणाऱ्या कानावर डावा हात व दुसऱ्या कानावर उजवा हात १५ मिनिटे धरावा. ह्यामुळे कानात सतत येणार्या आवाजाचा त्रास पण कमी होतो.

卐 गुडघा दुखत असेल तर गुडघ्याला एका बाजूस डावा हात व दुसऱ्या बाजूस उजवा हात असे १५-१५ मिनिटे दिवसातून २-३ वेळा ठेवावेत. गुडघ्याला सूज असेल तर डावा हात सुजेवर व उजवा हात तळपायाला १५ मिनिटे लावावा व नंतर तळपाय पाण्याने धुवावा.

卐 मनात वाईट विचार येणे, वाईट स्वप्ने पडणे ह्यासाठी दोन्ही हात एकमेकांवर घासून उजवा हात अनाहत चक्रावर ठेवावा.

卐 थायराँईडसाठी गळ्याला डाव्या बाजूने डावा हात व उजव्या बाजूने उजवा हात १५या मिनीटे असे धरावेत. असे सकाळ संध्याकाळ धरणे आवश्यक आहे. असे तीन ,चार महीने करावे लागते.वरील उपचार करताना पेशंटला स्वतः हात ठेवणे शक्य नसल्यास इतर प्रौढ व्यक्तीने हात ठेवावेत.

*प्रथम दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासून भारीत करून घ्यावेत*
======================================================================
लाईक करा आमचे फेसबुक पेज www.facebook.com/aamachkahi

Please follow and like us:

Leave a Reply