महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण

 

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण

MARERA (Maharashtra Real Estate (Regulation & Development) Authority 2017) Real Estate Project महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महरेरा (महाराष्ट्र रिअल इस्टेट रेगुलेशन ऑथॉरिटी) ने १ मे २०१७ पासून स्थावर संपदा प्रकल्प आणि स्थावर संपदा एजन्ट यांच्या नोंदणीचे नियम या अति आणि तसा कायदा लागू केला आहे. आपण हा कायदा लागू केल्या पासून म्हणतोच आहे कि सरकारने बिल्डर च्या मुसक्या आवळल्या आहेत. हा कायदा येण्या आधीही बिल्डर्स ना प्रकल्प मंजूर करण्यासाठी काही कागदपत्रे द्यावी लागायची आणि तो मंजूर करून घ्यावा लागायचा. कोणता प्रोजेक्ट मंजूर आहे कोणतं नाही ,मंजुरी ना मिळताच काही डेव्हलोपमेंट बिल्डर करायचा पण आपल्यला ते लक्षात यायचं नाही पण आता या कायद्यानुसार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण या सरकारच्या संकेतस्थळावर आपण कोणते प्रमोटर्स, रिअल इस्टेट एजन्ट रजिस्टर आहेत त्याची लिस्ट बघू शकतो आणि त्या नुसार घर/ फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

खाली नमूद केलेले कागदपत्र हि कलम ४(१) व कलम ४(२) मध्ये नमूद केल्याप्रमाणे नोंदवणे आवश्यक आहे.

१) प्रमोटर्सच्या पॅन कार्डची स्वत:ची सही केलेली प्रत.

२) प्रमोटर्स व्यक्ती असल्यास त्याचे नाव, फोटो, मोबाईल नंबर आणि पत्ता जर संस्था असल्यास संस्थेची यथास्थिती, अध्यक्ष, भागीदार, संचालक आणि Authorised व्यक्तीचे नाव,फोटो, मोबाईल नं. आणि पत्ता.

Loading...

३) ज्या जमिनीवर प्रकल्प बांधायचा आहेत्या जमिनीचा मालकी हक्क किंवा प्रमोटर्सचा हक्क, त्याचे Title Deed, Title Search केलेले अधिकृत कागदपत्रे सादर करावी लागतील.

४) ज्या जमिनीवर प्रकल्प बांधायचा असेल आणि ती जमिन प्रमोटर्स च्या मालकीची नसेल तर जमिनीचा मुळ मालका सोबत झालेला सहयोग करार (consultation) (Agreement), विकासाचा करार (development Agreement), संयुक्त विकास करार (contract devlopment Agreement) किंवा या बरोबरीने अन्य कोणतेही जे करारा झाले असतील त्यांच्या प्रती आणि जमिनीच्या मालकाची संमती पत्र आणि त्याचे जमिनीवरील हक्क दाखवणारे कागदपत्रे असे सादर करावे लागतील.

Loading...

५) जर जमिनीवर काही लोन असेल किंवा त्यावर कोणता अतिरिक्त बोजा असेल, जमिनीवर कोणतीही न्यायालयीन कारवाई चालू असेल तर त्याचा तपशील आणि कागदपत्रे सादर करावी लागतील.

६) जिथे प्रकल्प मंजूर केला असेल त्याचे चटई क्षेत्र निर्देशांकाशी (FSI) मंजूर केलेली प्रत / डेव्हीपमेंट आथॉरिटीने प्रकल्प मंजूर केलेली प्रत आणि या मंजूर आराखड्यानुसार प्रमोटर्स कोणकोणत्या सुविधा देणार आहे जसे, सामाईक क्षेत्र (Common area) सामाई/ वैयक्तिक वाहतळ (common/ private parking area) इतर सोईसुवधा ज्या प्रकल्पा सोबत मंजूर केल्या आहेत. त्याच्या प्रति आणि त्या त्या वेळी विकास नियंत्रण विनियमानुसार उपयोगात आणावयाचे हक्क त्याच्या प्रति / माहिती सादर करायची आहे.

७) संपूर्ण प्रकल्पाचा प्रस्तावित आराखडा/ प्रपोज्ड ethics plan आणि प्रमोटर्स ने सादर केल्याप्रमाणे FSI मंजूरी चा निर्देशांक सादर करावयाचा आहे.

८) वापरावयाचा मंजूर केलेला FSI आणि प्रस्तावित FSI ह्या मध्ये जर भिन्नता असेल तर जस जसा पुढील FSI हा development authority कडून मंजूर केला जाईल तस तशी त्याची नोंद प्रवर्तकाने प्राधिकारणाच्या संकेतस्थळावर वेळच्या वेळी नोंदवणे गरजेचे आहे.

९) बांधकाम करावयाच्या इमारती किंवा अनेक इमारती किंवा एखादी विंग किंवा अनेक विंगची प्रस्तावित संख्या आणि मंजूर केलेली संख्या ही नोंदणीच्या वेळी जाहिर करणे बंधनकारक आहे आणि जस जशी इतर इमारती किंवा विंगा याच्या बांधकामाची परमिशन मंजूर होते तसतशी ती माहिती प्रमोटरने संकेतस्थळावर टाकणे गरजेचे आहे.

१०) खेळाच्या मैदानाचे चौ.मी. मधील क्षेत्रफळ

११) Private Parking ची संख्या

१२) वास्तुशास्त्र व Architech Plan, बांधकाम तंत्रज्ञान technology तपशिल, भुकंपविरोधक अश्या सामाईक सोयीसुविधांचा तपशील देणे बंधनकाकर आहे. अशाप्रकारे प्रमोटर्सना RERA अंतर्गत सर्व कागदपत्रांची पुर्तता करणे बंधनकारक आहे.

१३) https://maharera.mahaonline.gov.in

Please follow and like us:

Leave a Reply