“मोदीजी, तुम्ही दर वर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देणार होतात त्याचं काय झालं ?”

मुंबईच्या किंग्स सर्कल स्टेशन बाहेर गांधी मार्केटच्या मागच्या रस्त्यावर रोज संध्याकाळी एक भैय्या पाणी पुरी आणि आणखी 3-4 पदार्थाची गाडी लावतो।

तुफान गर्दी असते त्याच्याकडे, म्हणून आणखी 4 लोक कामाला आहेत।

बहुतेक पदार्थ आहेत 25 रुपये प्लेट। रोजची कमाई असेल 5 हजार।

Loading...

कधीच सुट्टी नाही म्हणजे दरमहा कमाई दिड लाख.1 ते 4 कामगार अन  मटेरियल कॉस्ट धरून 50% खर्च धरला तरी दरमहा निव्वळ कमाई 75 हजार, तीही टॅक्स फ्री।

असो, त्याने 4 लोकांना रोजगार दिलाय हा आजचा मुद्दा आहे।देशात असे करोडो लोक आहेत,

Loading...

ज्यांना काहीतरी व्यवसाय करायचा असतो पण भांडवल नसल्यामुळे त्यांचं स्वप्नं हवेत विरून जातं।

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी हि बाब हेरली आणि त्या करोडो लोकांना आपलं स्वप्नं साकार करण्याची संधी दिलीय ती प्रधान मंत्री मुद्रा योजने अंतर्गत त्यांना कर्ज देऊन।

आतापर्यंत तब्बल 1 कोटी 68 लाख लोकांनी 3 लाख 55 हजार कोटी कर्ज घेतल्यामुळे 5.50 कोटी लोकांना रोजगार मिळालाय। काय आहे ही मुद्रा योजना ?

मुद्रा योजनामध्ये 3 प्लान आहेत।

पहिला आहे शिशु प्लान।

तुमचा व्यवसाय नवीन असेल तर यात तुम्हाला 50 हजारांपर्यंत कर्ज मिळेल।

किशोर प्लान।

यात तुमचा व्यवसाय आहे, पण बाळसं धरत नसेल तर तुम्हाला 50 हजार ते 5 लाख कर्ज मिळेल।

तरुण प्लान।

इथे तुमचा व्यवसायात चांगला जम बसलाय पण विस्तार करण्यासाठी भांडवल नसेल तर तुम्हाला 5 ते 10 लाख कर्ज मिळू शकेल।

खरंच का बँका इतकं कर्ज देतात ? होय कारण बँकांना सरकार कर्ज देतं. त्यामुळे बँकांनी अर्ज करणाऱ्या 99.90% लोकांना कर्ज दिलंय।

कुठल्या बँका आहेत यात ?

सरकारने सरसकट सगळ्याच बँकांना परवानगी दिलेली नाही।

काही सरकारी, खासगी बँका, सहकारी आणि ग्रामीण बँका आणि NBFC यांची सुस्थिती पाहून त्यांना कर्ज वाटप करायची परवानगी दिलीय।

सामान्य माणूस कधीच बँकांचे कर्ज बुडवत नाही .हा अनुभव असल्यामुळे तुमचं बिजनेस प्रपोजल आणि इतर कागदपत्र योग्य असतील तर बँका हमखास हे कर्ज देतात।

महाराष्ट्रातील तब्बल 35.35 लाख लोकांनी 34168 कोटी कर्ज घेतलंय।

गम्मत म्हणजे त्यात 80% म्हणजे चक्क 28.24 लाख महिला आहेत।

मग महाराष्ट्रातले पुरुष काय करताहेत ?

ते बसले आहेत सोशल मीडियावर अन मोदींना विचारताहेत-

“मोदीजी, तुम्ही दर वर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देणार होतात त्याचं काय झालं ?”

Please follow and like us:

Leave a Reply