भक्कम स्त्री ,सक्षम भारत – Project Red Dot

नमस्कार

मी विकास कोळी आजच्या या स्त्री विशेषांकामधे आपल्याशी चर्चा करणार आहे. चर्चेचा विषय तसा फारसा वेगळा नाही. परंतु बराचसा समाजाने दुर्लक्षित केलेला असाच आहे.तेव्हा आपण सरळ मुद्द्यावर येऊया.

Loading...

स्रियांच्या मासिकपाळी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या साधनांची विल्हेवाट सुरक्षितपणे कशाप्रकारे लावता  येईल या सर्व परिस्थितीचा मी बारकाईने अभ्यास करून हा विषय सावधगिरीने कशाप्रकारे हाताळता येईल याचा विचार केला. आणि त्यानुसार एक लाल रंगाचे वर्तुळ असलेली कागदी पिशवी बनविली.

ज्या पिशवीचा वापर मासिकपाळी दरम्यान वापरण्यात येणारी साधने त्या पिशवीत टाकून पिशवी सील करुन मगच ती पिशवी कचरा कुंडीत टाकल्याने तिचे व्यवस्थितपणे विस्थापन होईल.

Loading...

पहिली गोष्ट ते उघड्यावर पडणार नाहीत आणि दुसरी गोष्ट सफाई कामगारांना देखील ती लाल रंगाचे वर्तुळ असलेली पिशवी पाहून कचरा कुंडीतून ती  सहजपणे वेगळी करता येईल.

सुरुवातीला हे सगळ्याला समजायला थोडा अवकाश लागेल पण हळूहळू ते सवयीचे होईल.ज्यामुळे स्त्रीचे आणि पर्यायाने देशाचे देखील आरोग्य सुरक्षित होईल. या संदर्भात मी आणि माझी Branding Box © ची सगळी टीम त्यांची नेहमीची कामे करून अतिरिक्त वेळात Project red Dot मोठा करण्याकरीता भरपूर काम करत आहेत.

project red dot

हा प्रोजेक्ट देशोभरातच नव्हे तर जगभरात कसा पोहचविता येईल यावर आमची team सध्या काम करत आहे. आणि हे साध्य  करण्याकरिता  तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे.

स्रियांची मासिक पाळी या नेहमीप्रमाणेच दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या विषयावर मी आपल्याशी चर्चा करणार आहे. तसं एका पुरुषाने या विषयावर बोलणं हे आपल्या सारख्या पुरुषप्रधान समाजातील रुढीप्रिय लोकांना न पटण्यासारखे आहे.

project red dot

परंतु मला त्याचे काही सोयर – सुतक नाही. कारण खरं बोलायला – आणि सत्य स्वीकारायला माणसाने कधीही घाबरू नये. अनेकवेळा असे दिसून येते कि स्रिया मासिकपाळी दरम्यान अपराध्यासारख्या वागतात. गप्पगप्प राहतात. संकोच बाळगतात. समाजसुद्धा या गोष्टींना विटाळ, अपवित्र अशा नावांनी संबोधतो. या गोष्टींमुळे स्रिया कितीही त्रास होत असला तरी या गोष्टींची वाच्यता करीत नाहीत.

आणि अगदी निमूटपणे होणारा सगळा त्रास सहन करीत राहतात. खरे तर स्त्रीला मासिकपाळी  येणे हि एक नैसर्गिक घटना आहे, शारीरिक क्रिया आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीरात Toxin ( विषद्रव्यांचे ) प्रमाण वाढले तर आपोआप नैसर्गिकरित्या detoxification ( विषद्रव्य शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया ) सुरु होते.

त्याचप्रमाणे स्त्रीयांमध्ये घडून येणारी हि एक केवळ  detoxification ची प्रक्रिया आहे. त्यात विटाळ वाटण्यासारखे काहीच नाही. परंतु तुमच्या आमच्यातीलच काही रूढिवाद्यांनी त्याला धर्माचा आधार देऊन विरोध केलेला आहे. आधुनिकीकरणानंतर स्रियांना शिक्षणाचे अधिकार प्राप्त झाले. पुरुषांप्रमाणे स्त्रीयादेखील सर्वप्रकारच्या कार्यक्षेत्रात काम करू लागल्या.

कामानिमित्ताने, शाळेच्या कारणाने घराबाहेर पडू लागल्या. परंतु अवेळी येणाऱ्या मासिकपाळीमुळे त्यांच्यासमोर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्या. सावधगिरी म्हणून काही  स्रिया  आपल्यासोबत Sanitary Pad बाळगू लागल्या. मासिकपाळी दरम्यान  Sanitary Pad चा वापर करणे  हि गोष्ट जितकी महत्वाची आहे त्याहूनही अधिक त्या वापरलेल्या Sanitary Pad ची विल्हेवाट लावणे अधिक महत्वाचे आहे.

कारण त्या Sanitary Pad चे विघटन व्हायला सुमारे ५०० ते ८०० वर्षाचा कालावधी लागतो. पाशात्य राष्ट्रांमध्ये काही यंत्रसामग्रीच्या साहाय्याने ते जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. पण हि देखील चुकीचीच पद्धत आहे. कारण त्यामुळे Global Warming ची टांगती तलवार आपल्या शिरावर आहेच.

त्याकरिता Sanitary Pad शहरापासून दूरवर नेऊन खोल खड्डा करून त्यामध्ये ते पुरावे लागते. हि खरी योग्य पद्धत आहे. त्यामुळे शहरी आरोग्य काही प्रमाणात का होईना सुरक्षित राहील. ग्रामीण भागामध्ये तर परिस्थिती याउलट आहे. ग्रामीण भागात आर्थिक समस्येमुळे Sanitary Pad विकत घेता येत नाहीत.

त्यामुळे तेथील स्रिया त्याकरिता जुनाट वस्त्र किंवा तत्सम साधनांचा वापर करतात. स्वछतेचा अभाव आणि अपुऱ्या साधन सामग्रीचा पुरवठा या कारणांमुळे स्त्रीयांमध्ये अनेक गुप्त रोगांचा फैलाव होतो.

त्यांना Fungeral Infection झाल्यामुळे  प्रसंगी अनेक जीवघेण्या आजारांमुळे त्यांचे बळी जातात. शिवाय मासिकपाळीच्या वेळेत जी साधने वापरली जातात त्यांची विल्हेवाट व्यवस्थितरित्या न लावल्यामुळे अनेक रोग पसरण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तर हा धोका अधिक बळावतो. शहरात मात्र Sanitary Pad चा वापर अलीकडे वाढत आहे.

या विषयावर अलीकडेच सिनेनट अक्षय कुमारचा ” padman ” नावाचा चित्रपट हल्लीच प्रकाशित झाला आहे. प्रश्न Sanitary Pad वापरण्याचा नाही तर Sanitary Pad वापरून झाल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावायची याचा आहे. कारण असे पॅड वापरल्यानंतर ते एकतर प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून किंवा वर्तनमान पत्राच्या पेपरमध्ये गुंडाळून कचरा कुंडीत फेकले जातात.

हि बाब आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. कचराकुंडीवर काम करणाऱ्या अनेक सफाई कामगारांना त्यामुळे भयानक प्रकारच्या रोगांची लागण होते. कारण स्त्री  हे मानवी उत्पत्तीचे उगमस्थान आहे. आणि जर हि स्त्री रोगी,कमजोर आणि दुबळी बनली तर तिच्या पासून जन्माला येणारी भावी पिढी देखील दुबळीचं बनणार.

कारण जर स्त्री सक्षम असेल तरच भक्कम भारताचे स्वप्न साकार होईल. तेव्हा स्त्रीयांचे आरोग्य हि आमची प्रथम जबाबदारी आहे. हि बाब लक्षात घेऊन मी आणि माझ्या Branding Box © च्या team ने २६ जानेवारी २०१८ रोजी १ लाख मासिकपाळी वस्त्र विल्हेवाट पिशव्यांची मोफत वाटणी करून या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली. आणि यापुढेदेखील Branding Box © च्या विक्री उत्पन्नातून मिळणाऱ्या ५% उत्पन्न  अखंडितपणे  या पिशव्या बनविण्याकरिता वापरले जाईल असा आम्ही वसाच घेतला आहे.

जोपर्यंत सरकारदरबारी या गोष्टीची दाखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही हे सामाजिक कार्य असेच अविरत चालू ठेवणार. आमचा उद्देशच मुळात हा आहे कि  Sanitary Pad निर्माण करणाऱ्या कंपन्यांनाच सरकारने अशा पिशव्या देखील त्यांना त्या Sanitary Pad सोबत पुरवाव्यात असा आदेश काढावा. कारण हि काळाची गरज आहे.

आम्ही सुरु केलेल्या या सामाजिक उपक्रमाला देशोभरातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे. कारण आम्ही हा उपक्रम कोणतीही अपेक्षा न बाळगता सुरु केलेला आहे. यामागे आम्हाला प्रसिद्धी मिळविण्याचा तिळमात्र देखील उद्देश नाही.

केवळ स्रियांच्या या जटिल समस्येला वाचा फोडण्याकरिता केलेला हा एक निव्वळ प्रयास आहे.स्रियांकडून या सामाजिक उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

अवघ्या ३ आठवड्यापूर्वी सुरु केलेल्या या सामाजिक उपक्रमाला १.५ दशलक्ष लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. ६ हजाराहून जास्त लोकांचे Facebook वर मेसेजेस आलेले आहेत. ५०० पेक्षा अधिक स्वयंसेवक या उपक्रमाकरिता राबत आहेत. अनेकांनी यात सहभागी होण्याकरिता इच्छा व्यक्त केली आहे.

१५ हजारापेक्षा अधिक मिस्ड कॉल आलेले आहेत. ४ मराठी वृत्तपत्रांनी या गोष्टीची दखल घेतली आहे. देशोभरात २५ हुन अधिक ठिकाणी हा उपक्रम राबविला जात आहे. थोडक्यात आता PADMAN  सोबत BAGMAN चा सुद्धा प्रवास सुरु झाला आहे.

आपल्याला देखील जर या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर आपण मला  किंवा vikaskoli@gmail.com  वर मेल करू शकता. किंवा ०२२ २५२७ २८९३ या ऑफिसच्या क्रमांकावर फोन करू शकता.

चला तर मग स्त्रीचं स्त्रीत्व जपणं , हेच आमचं स्वप्नं हे स्वप्न साकार करूया. आणि हे शक्य आहे केवळ तुमच्या आमच्या सहकार्याने.

Please follow and like us:

Leave a Reply