या ९ सवय मुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता होऊ शकते कमी !

मानवी शरीराचा CPU म्हणजे मेंदू. आपल्या शरीरावर पूर्ण कंट्रोलिंग येथूनच होतं. त्यामुळे मेंदूच अनन्य साधारण महत्व आहे.

पण आपल्या दैनंदिन व्यवहारातून आपण मेंदूला हानिकारक अशा अनेक गोष्टी करत असतो, त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असतो.

म्हणून कोणत्या गोष्टी टाळाव्यात व मेंदू कार्यशील होण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याबद्दल जाणून घेऊयात…

Loading...

१.विचारांची कमतरता

विचार करणे हे मेंदूचे खरं काम आहे.

पण जेव्हा नवनवीन कल्पना, विचार येणं बंद होतं तेव्हा मेंदू आकुंचन पावतो आणि त्याची आधीची क्षमता लोप पावते.

Loading...

म्हणून विचार करणं थांबवू नका.

https://khsknighttimes.files.wordpress.com/2016/05/most-talkative.jpg

 

२.कमी बोलणे

जेवढं जास्त बोलाल, वाद-प्रतिवाद, चर्चा कराल तेवढा मेंदू तल्लख आणि वेगवान होतो.

म्हणून आपलं म्हणणं योग्य शब्दात व्यक्त करायचा प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

http://blog.doctoroz.com/wp-content/uploads/2013/08/No-Smoking.jpg

३.धुम्रपान करणे:

मेंदूच्या बाह्यपटलाचा संबंध भाषा, स्मरणशक्ती, समज ह्या गोष्टींशी असतो.

त्यामुळे जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर यामुळे बाह्यपटलाची जाडी कमी होते.

यामुळे Multiple brain shrinkageचा धोका वाढतो. म्हणून धुम्रपान करणे टाळा.

४.कमी झोपणे

कमी झोपेमुळे अपायकारक द्रव्याचा निचरा होण्याची प्रोसेस थांबून टॉक्सिक वेस्ट (विषारी कचरा) तसाच रहातो.

या टॉक्सिक वेस्टमुळे ब्रेन सेल्स मरतात. म्हणून किमान 6 तास झोप घेणे आवश्यक आहे.

५.आजारपणाकडे दुर्लक्ष करणे

‘काही नाही होत’ म्हणून बऱ्याच वेळा दुखणं आपण अंगावर काढतो.

त्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर अपायकारक परिणाम होत असतो. म्हणून आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका.

६.जास्त जेवण करणे

आपला आहार प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मेंदूला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या धमन्या कडक होतात व आपली मानसिक शक्ती कमी होते.

म्हणून जास्त जेवण करणं टाळा.

 ७.सकाळचा नाश्ता टाळणे?

आपण सकाळी जेव्हा नाश्ता टाळतो तेव्हा आपल्या रक्तात शर्करेचे प्रमाण अगदीच कमी होते.

त्यामुळे आवश्यक ते पोषक द्रव्य मेंदूपर्यंत पोहोचत नाही.

ह्याने ब्रेन हॅमरेज ची रिस्क वाढते. त्यामुळे सकाळचा नाश्ता टाळू नका.

 ८.डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपणे

झोपतांना जेव्हा आपण डोक्यावरून पांघरून घेतो तेव्हा श्वासावाटे Oxygen कमी आणि कार्बन डाय ऑक्साईड जास्त घेतो.

त्याने मेंदूचं मुख्य खाद्य Oxygen पुरेसं पोहोचत नाही.

म्हणून झोपताना डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपू नका.

९.साखरेचे अतिसेवन करणे

साखर जास्त खाल्ल्यामुळे मेंदूपर्यंत बाकीचे पोषक द्रव्य पोहोचत नाहीत किंवा कमी पोहोचतात.

त्याने मेंदूच्या विकासाची प्रक्रिया disturb होते आणि पुढे अल्झायमर्सची रिस्क निर्माण होते.

म्हणून साखरेचे अतिसेवन करणे टाळा.
==========================================================================

लाईक करा आमचे फेसबुक पेज 

आमचं काही चुकलं का ?

Please follow and like us:

Leave a Reply