शानदार,जबरदस्‍त,जिंदाबाद- दशरथ मांझी.

http://www.uttarpradesh.org/wp-content/uploads/2016/08/dashrath-manjhi.jpg

शानदार,जबरदस्‍त,जिंदाबाद- दशरथ मांझी.

आपल्‍या प्रत्‍येकामध्‍ये महान होण्‍याचे बिज दडलेले असते. गरज असते ती योग्‍य संधीची आणि योग्‍य दिशेने आपली शक्‍ती वापरण्‍याची, आपण कोठे जन्‍माला आलो ? आपल्‍या परिवाराचा दर्जा काय आहे ? आपले शिक्षण किती झालेले आहे ? आपल्‍याकडे कोणत्‍या साधन-सुविधा उपलब्‍ध आहेत ? या गोष्‍टींना फारसे महत्‍व नाही.

आपले कर्मच आपल्‍याला महान बनवत असतात. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मनुष्य डोंगर सुद्धा हलवू शकतो !याचे मुर्तिमंद उदाहरण म्हणजे दशरथ मांझी

तारिख कोणालाही निश्चित माहित नाही परंतु 1934 सालच्‍या एके दिवशी दशरथ यांचा जन्‍म बिहार राज्‍यातील गया जिल्‍हयातील गेल्‍होर गावात झाला होता.

Loading...

घरात अठराविश्‍वे दारिद्रय, कुटुंब भुमिहिन, शिक्षणाचा अभाव, गावात जायला धड रस्‍ता नाही,

गावात आरोग्‍याची कोणतीही सुविधा नाही, इतकेच काय गावात विज देखील नाही अशा गेल्‍होर गावात दशरथचे बालपण गेले.

Loading...

दशरथच्‍या वडिलांनी गावच्‍या सावकाराकडुन कर्ज घेतले होते.

ते फेडता येत नाही म्‍हणुन त्‍यांनी दशरथला गहाण टाकण्‍याचे ठ‍रविले.

दशरथला हे आवडले नाही तो गाव सोडून पळून गेला.

धनबादच्‍या कोळसा खदानीत कामगार म्‍हणून काम करु लागला.

सात वर्षानंतर दशरथ गावात परतला. फाल्‍गुनीदेवीशी त्‍याचा विवाह झाला. आता दशरथच्‍या आयुष्‍यात सुखाने प्रवेश केला होता.

त्‍याचा त्‍याच्‍या पत्‍नीवर खुपच जिव होता. शहाजहॉनने आपल्‍या पत्‍नीसाठी ताजमहल बनविला.

त्‍याचप्रमाणे आपणही काहीतरी भव्‍यदिव्‍य करुन दाखवूया असे विचार त्‍याच्‍या मनात घोळत असत.

कुटुंबनिर्वाहासाठी दशरथला मोल मजुरीचे काम करावे लागे.

त्‍याचे घर म्‍हणजे झोपडीवजा खोपटेच होते. दशरथ लोकांच्‍या शेतात रोज-मजुरीने काम करायचा तर कधी लाकडे तोडायला जायचा.

काम करतांना एखादा मजुर जखमी झाला तर फारच पंचाईत व्‍हायची गावात आरोग्‍याची सुविधा उपलब्‍ध नव्‍हती. रुग्‍णाला शेजारच्‍या वजीरगंज गावात न्‍यावे लागायचे. पण हे काम सोपे नव्‍हते.

 

तसे म्‍हणायला गेल्‍होर ते वजीरगंज हे अंतर फक्‍त 15 किमी होते.

परंतु दोहोंमध्‍ये एक पर्वत उभा होता. तो पर्वत ओलांडुन वजीरगंजला जाणे सोपे नव्‍हते.

पर्वतातुन कोणताही रस्‍ता देखील नव्‍हता. म्‍हणुन लोकांना पर्वताला वळसा घालुन 55 किलोमिटर अंतर पार करुन वजीरगंजला जावे लागे यात विलंब झाल्‍यामुळे अनेक रुग्‍णांचा मृत्‍युदेखील होत असे.

मोलमजुरीचे काम करणारा दशरथ एके दिवशी शेजारच्‍या पर्वतावर लाकडे तोडण्‍यासाठी गेला.

मागाहून त्‍याची पत्‍नी फाल्‍गुनी त्‍याची शिदोरी आणि पाणी घेवुन निघाली. पर्वत खुप उंच होता.

पर्वतचढतांना फाल्‍गुनीचा पाय घसरला. ती खाली कोसळली.

पर्वतात काम करणा-या दशरथ पर्यंत हि बातमी घेवुन पोहोचली. आपल्‍या सहका-यांच्‍या मदतीने तो फाल्‍गुनीला वजीरगंज येथील सरकारी दवाखान्‍यात नेण्‍याचा प्रयत्‍न करुन लागला.

पण हे काम सोपे नव्‍हते पर्वत उंच होता.

पर्वतातुन वाहतुकीचा कोणताही रस्‍ता नव्‍हता. फाल्‍गुनीला दवाखान्‍यात न्‍यायला विलंब झाला.

उपचाराअभावी फाल्‍गुनीचे प्राण गेले.
आपल्‍या प्रिय पत्‍नीच्‍या मृत्‍यूने दशरथ हळहळला.

पर्वतातुन रस्‍ता असता तर आपल्‍या प्रिय पत्‍नीला तात्‍काळ वैदयकीय उपचार मिळु शकले असते.

या पर्वतानेच आपल्‍या फाल्‍गुनीचा जिव घेतला आहे. या पर्वताचे काहीतरी केले पाहिजे, अशा विचारांनी दशरथ पछाडला गेला.

कोणालाही कल्‍पना करता येणार नाही. असा निर्धार दशरथने केला. दशरथने एकटयानेच पहाड तोडुन पहाडातुन वजिरगंजपर्यंत जाणारा मार्ग बनविण्‍याचे ठरविले.

लोकांनी दशरथला वेडा ठरविले कधी कधी एखादया व्‍यक्‍तीचे ध्‍येय एवढेमोठे असते की, ते लोकांच्‍या नजरेतही सामावू शकत नाही अशावेळी लोक महान ध्‍येय ठरविणा-या त्‍या व्‍यक्‍तीला वेडा म्‍हणू लागतात,

पण यात लोकांच्‍याच बुध्‍दीचा कमीपणा असतो.

हातात छिन्‍नी आणि हातोडा घेवुन दशरथ पहाड तोडू लागला.

ऊन, वारा,पाऊस याची तमा न बाळगता वर्षातील 365 दिवस दशरथचे काम चालले होते. टिका–टिपणी करणारे लोक आता दशरथकडे उत्‍सुकतेने पाहू लागले.

कुणी त्‍याला अन्‍न देत तर कुणी त्‍याला लागणारी हत्‍यारे पुरवू लागले. विविध वृत्‍तपत्राचे पत्रकारांनी दशरथची दखल घेतली.

वृत्‍तपत्रातुन दशरथवर बातम्‍या छापुन येवु लागल्‍या.

दशरथने पहाड तोडण्‍याचे काम सुरुच होते त्‍याला कोणत्‍याही संकटाचे भय नव्‍हते.

एकदा तर त्‍याला साप देखील चावला.

पण दशरथ कशाचीही पर्वा न करता पहाड तोडतच राहिला.1960 ते 1983 या 22 वर्षाच्‍या कालखंडात दशरथ अविरत पहाड तोडत होता.

पहाड तोडुन दशरथने 30 फुट रुंद, 25 फुट खोल आणि 360 फुट लांबीचा रस्‍ता पहाडातुन तयार केला.

गेल्‍होर गाव वजीरगंजशी जोडल्‍या गेले जे कोणालाही शक्‍य झाले नाही ते दशरथने एकटयाने करुन दाखविले.

आपल्‍या प्रीय पत्‍नीच्‍या स्‍मृती प्रित्‍यर्थ्‍य दशरथने पहाड खोदून हा रस्‍ता तयार केला. ताजमहाल बांधण्‍यापेक्षाही मोठे काम दशरथने करुन दाखविले. आता लोकांनी वजीरगंजला जाण्‍यासाठी 55 कि मी चा फेरा मारण्‍.याची गरज नव्‍हती.

वैदयकीय सुविधा सुलभ झाली होती.

लोक मांझीला ‘माऊंटेन मॅन’ म्‍हणु लागले.
दशरथ मांझी यांच्‍या कतृत्‍वाची दखल सर्वत्र घेतल्‍या गेली. सन 2011 साली फील्‍म डिव्हिजनने मांझी यांच्‍या कार्यावर आधारित ‘द मॅन व्‍हु मुव्‍हड माऊंटेन’ हा माहितीपट काढला.

कुमुद रंजन यांनी या माहितीपटाचे दिग्‍दर्शन केले. 2015 साली ‘मांझी द माऊंटेन मॅन’ हा केतन मेहता दिग्‍दर्शीत चित्रपट मांझीवर निघाला. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने दशरथ मांझीची तर राधिका आपटे हिने फाल्‍गुनीची भुमिका साकारली आहे.

सन 2006 साली बिहार सरकारने पद्मश्री पुरस्‍काराकरीता दशरथ मांझी यांचे नाव प्रस्‍तावित केले होते. 26 डिसेंबर 2016 साली भारतीय डाक विभागाने दशरथ मांझी यांचेवरील टपाल तिकीट काढले.

दिनांक 17 ऑगष्‍ट 2007 रोजी दिल्‍लीच्‍या ऑल इंडीया इन्स्टिटयुट ऑफ मेडीकल सायंन्‍सेस येथे पित्‍ताशयाच्‍या कॅन्‍सरने दशरथ मांझी यांचे निधन झाले तेव्‍हा बिहार सरकारने शासकीय इतमामात दशरथ मांझी यांचे पार्थिवावर अंतिम संस्‍कार केलेत.

तुम्‍ही प्रयत्‍न करत राहा, संकट पर्वताएवढे मोठे असले तरी हार मानु नका, तुमच्‍या प्रयत्‍नात सातत्‍य असु दया, ऊन,वारा, पाऊस यांची तमा न बाळगता तुमचे प्रयत्‍न चालु राहु दया. तुमचे प्रयत्‍नच तुम्‍हाला महान बनवू शकतात. तुमच्‍या प्रयत्‍नातच तुम्‍हाला यशस्‍वी बनविण्‍याची शक्‍ती दडलेली आहे, हेच दशरथ मांझी यांचे चरित्र आम्‍हाला सांगते सातत्‍यपुर्वक प्रयत्‍न करा, दशरथ मांझी यांचा आदर्श नजरेपूढे ठेवुन प्रयत्‍न करा, यश नक्‍कीच प्राप्‍त होईल…

==========================================================================

लाईक करा आमचे फेसबुक पेज

Please follow and like us:

Leave a Reply