उतरण….

मी मिरा आजवर कोणालाही कधीही दुखवले नाही मी. आयुष्य माझे असले तरी नेहमीच दुस-यांच्या मर्जीने जगत आले. लहाणपणापासून आई बाबांचे ऐकले आता सासरच्यांचे नव-याचे ऐकते. लहाणपणापासून आई बाबांचे मन मी कधीही दुखवले नाही. माझे लग्नही त्यांनी त्यांच्या पसंतीच्या मुलासोबत ठरवले तिथेही तक्रार केली नाही की माझे मत सांगीतले नाही.

खरतर लग्नासाठी कोणालाही मला काहीही विचारायची गरजही नाही वाटली. ऋषी सोबत माझे लग्न झाले तेव्हा मी फक्त एकोनीस वर्षांची होते. माझ्या माहेरची परीस्थीती तशी बेताचीच होती घरात खाणारे भरपूर आणि कमवणारे फक्त माझे बाबा. आई बाबा आजी आजोबा आणि आम्ही तिन भावंड इतके कुटूंब होते.

मी कॉलेजच्या दुस-या वर्षाची परीक्षा दिली की लगेचच ऋषीचे स्थळ आले. लग्न झाले तेव्हा ऋषी पंचवीस वर्षांचे होते. सरकारी नोकरी करणारा जावई मिळाल्यामुळे आई बाबांनी लगेचच होकार दिला.

Loading...

आमच्यातील वयाच्या फरकाचा विचारही केला नाही त्यांनी. खरतर मलाही त्यांच्या निर्णयावर पुर्ण विश्वास होता. त्यामुळे माझ्या आवडी निवडीचा मी अजीबात विचार केला नाही. शाळेत असल्यापासून मला एक मुलगा खुप आवडायचा प्रणव त्याचे नाव. त्यालाही मी खुप आवडायचे पण आम्ही कधीही आमचे प्रेम एकमेकांकडे व्यक्त केले नाही.

प्रेम व्यक्त करने तर दुर आम्ही कधी बोललोही नाही एकमेकांसोबत. पण नजरेतून खुप काही सांगायचो आम्ही एकमेकांना. पुढे योगायोगाने की जाणूनबुजून माहीत नाही पण मी ज्या कॉलेजला प्रवेश घेतला त्याच कॉलेजला प्रणवनेही प्रवेश घेतला. बारावीच्या सुट्यांमधेच माझे लग्न ठरले. लग्न मामाच्या गावी होते.

Loading...

मला आई बाबांना दुखवायचे नव्हते शिवाय प्रणव माझ्याकडे कधीही व्यक्त झाला नव्हता. ना मी, त्याच्याकडे त्यामुळे मला त्याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगणे अवघड झाले होते. आणि सांगीतले असते तरी कोणीही मला समजून घेतले नसते. प्रणवला माझ्या लग्नाबद्दल काहीही माहीत नव्हते प्रणवलाच काय माझ्या मैत्रीणींनाही काही माहीत नव्हते. त्यावेळी आमच्या कोणाकडेही फोन नव्हते त्यामुळे कोणालाच कळवता आले नाही.

शेजारी रहाणा-यांना तेवढे माहीत होते माझ्या लग्नाचे. ऋषी आमच्या दुरच्या नात्यातीलच होते. घरची गडगंज संपती होती त्यांच्या. ऋषीला आणखी दोन बहीणी होत्या त्या दोघींचीही लग्ने झाली होती. घरी सासूबाई सासरे आणि आम्ही दोघेच रहायचो. एकूलते एक म्हणून ऋषी प्रचंड लाडात लहाणाचे मोठे झाले होते.

सासूबाई तर त्यांची एखाद्या राजा सारखी उठबस करायच्या .घरात जेवण काय बनवायचे हे ही ऋषींच्या आवडीवर ठरायचे. माझ्या नणंदांवरही सासूबाईंचा तितकाच जिव होता. खरतर त्यांचा स्वभावच होता तो,माया ममता करुणा काय असतात हे मला त्यांच्याकडे पाहून
कळाले. सुरूवातीला मला खुप भिती वाटायची त्यांची लहाणपणा पासून ऐकले होते सासू खडूस असते ती सुनांना खुप त्रास देते,मारते,छळते उपाशी ठेवते.

पण माझ्या सासूबाई अशा मुळीच नव्हत्या. त्या त्यांच्या मुलांवर जितके प्रेम करायच्या तितकेच माझ्यावरही करायच्या. शिक्षण करत असतानाच माझे अचानक लग्न ठरल्यामुळे मला स्वयंपाकाचे फार काही जमायचे नाही पण सासूबाईंनी खुप छान संभाळून घेतले मला . हळूहळू सर्व त्यांनीच मला स्वयंपाक शिकवला. लग्न करून आल्यावर मी त्यांना आत्या म्हणायचे पण त्या मला म्हणाल्या मुलींची लग्न झाल्यापासून या घरात खुप एकटे वाटते मला.

तुझे सासरे फार बोलत नाहीत आणि ऋषी त्याच्याच नादात असतो. त्या दोघी होत्या तेव्हा घर खुप भरल्या भरल्या सारखे वाटायचे. सतत माझ्या आसपास फिरत रहायच्या आई हे आई ते करत. वर्षातून एकदा येणे होते दोघींचे आतूर होते मी त्यांच्या तोंडून आई ऐकण्यासाठी तुला आवडत असेल तर आईच म्हण ना मला. त्यांचे विचार ऐकून डोळयात पाणी आले माझ्या.

मी त्यांना मिठी मारली आणि आई म्हणाले. त्यादिवशी मला माझी नवी आई मिळाली खुप छान नाते होते आमच्या दोघींचे. बाबा (सासरे) तर फार गरीब होते स्वभावाने. कोणालाच काहीच बोलायचे नाहीत ते. ऋषी मात्र सर्वांचे लाडके असल्यामुळे स्वभावाने फार हट्टी होते. मी,म्हणेल तसेच मला हवे तेच असे वागायचे. अती लाडामुळे व्यसनेही करायचे जवळ-जवळ सर्व प्रकारचे नाद होते त्यांना.

लग्न झाल्यावर साधारण दहा एक दिवस घरात नातेवाईक होते त्यातच आमचे देव देव,जागरण आणि गोंधळही करण्यात आले. दहा दिवसांनी सगळे गेल्यावर आईंनी मला ऋषींच्या खोली मधे जायला सांगीतले. खोलीकडे जाताना खुप भिती वाटत होती. लग्नाची पहीली रात्र खुप छान असते सर्वांसाठी त्या रात्रीच्या गोड आठवणी सगळेच मनाच्या पिंज-यात फार प्रेमाने साठवून ठेवतात. पण माझ्यासाठी माझी पहीली रात्र फार भयानक होती.

आजही ती रात्र आठवली की भिती वाटू लागते जोरजोरात ओरडावेसे वाटते, रडावेसे वाटते. लग्नाआधी कधीही मी आणि ऋषींनी एकमेकांना पाहीलेही नव्हते. अगदीच अपरीचीत होतो आम्ही दोघे एकमेकांसाठी. अपेक्षा होती की ऋषी मला समजून घेतील माझ्याबद्दल जाणून घेतील स्वतःबद्दलही खुप काही सांगतील.

आणि मग हळूहळू आम्ही एकमेकांच्यात हरवून जाऊ. खोलीकडे जाताना मनात लाज,हुरहूर,दडपनाने काहूर माजले होते. मी खोलीमधे गेले तेव्हा ऋषी कशाचा तरी वास घेत होते तो वास घेतल्यानंतर खुप विचीत्र वागू लागले ते, त्यांचे डोळे खुप लाल झाले होते. मला आत आलेले पाहील्यावर एकदम रागाने म्हणाले दरवाजा लाव तो आणि इकडे ये मी दरवाजा लाऊण पलंगा जवळ घाबरत घाबरत गेले. ऋषींनी खुप घाणेरड्या नजरेने मला वरपासून खालपर्यंत बघीतले.

मी अवघडल्यासारखी उभी होते ऋषी माझ्याकडे तसे पहातच होते त्यांची नजर माझ्या प्रत्येक अवयवाला न्याहाळत होती पहात पहातच म्हणाले मस्त आणि माझा हात पकडून त्यांनी मला पलंगावर खेचले मी खुप जोरात डोक्यावर आदळले गेले. क्षणभरासाठी मला काहीच सुचत नव्हते डोके बधीर झाल्यासारखे वाटत होते.

त्यानंतर ऋषीने स्वतःचे कपडे काढून माझी साडी खेचली आणि माझ्यावर जबरदस्ती करू लागले एखाद्या भुकेलेल्या जनावरासारखे ते माझ्यावर तुटून पडले मी धडपडत होते माझा जिव गुदमरू लागला होता मला श्वासही घेता येत नव्हता पण ऋषींना माझी जराही दया येत नव्हती. ते गुंग झाले होते त्यांच्यातील जनावराची भुक भागवण्यामधे.

जिव वाचवण्याच्या धडपडीमधे माझ्या हातातील चुड्याच्या बांगड्या फुटून त्याच्या काचा माझ्या हातात घुसत होत्या त्या रात्री मी जगते की नाही असे वाटत होते मला. ऋषी माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठे होते. त्यांच्या ताकदी पुढे माझे काहीही चालत नव्हते.

लग्नाची पहीली रात्र म्हणजे ओढ,सुख,समाधान,श्वासात गुंतणारे श्वास, बांगड्यांची किणकीण, वेलींसारखे एकमेकांत गुंतलेले दोघे आणि समाधानाच्या निस्वासाने बहरलेली खोली पण माझे तसे नव्हते माझ्यासाठी ती रात्र जबरदस्ती,शोषण,बांगड्यां तुटण्याचा आवाज,भयंकर किंचाळया, वेदनांनी निघणारे हुंदके आणि जिव वाचवण्यासाठीची माझी धडपड अशी होती. खरतर लग्नाची पहीली रात्र नव्हतीच ती माझ्यासाठी तो होता एक समाजमान्य बलात्कार होता.

होय बलात्कारच होता तो. दुस-या दिवशीच्या पहाटे पर्यंत ऋषी माझे शोषन करत राहीले अगदी स्वतःला हवे तसे शेवटी थकून मी माझ्या शरीरातून जिव गेल्यासारखी निपचीत पडून राहीले होते. पहाट झाली ऋषी त्यांचे मन भरल्यावर मला बाजूला ढकलून झोपून गेले. मी उठून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते पण उठण्याचेही माझ्यामधे त्राण नव्हते. कशीबशी भिंतीला पकडून मी हळूहळू दरवाजापर्यंत आले दरवाजा उघडला आणि बाहेर येऊ लागले पण तिथेच माझा तोल गेला आणि मी कोसळले. आई झाडू मारत होत्या मला पडलेले पाहून त्या धावतच माझ्याकडे आल्या.

माझी अवस्था पाहून त्याही रडू लागल्या माझ्या ओठातून रक्त येत होते हातातल्या सर्व बांगड्या फुटून हातात घुसल्या होत्या शरीरावर दातांचे आणि नखांचे व्रण होते.आईंनी माझ्या तोंडावर पाणी मारून मला उठवले. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला मी जागी झाल्यानंतरही त्या रडतच होत्या मी त्यांच्याकडे पाहीले आणि खोलीकडे बोट दाखवून म्हणाले ऋषी आणि रडू लागले. आई रडत रडतच मान हलवून हात जोडून म्हणाल्या होय ग बाळा आम्ही तुझे गुन्हेगार आहोत आम्हाला माफ कर.

मी आश्चर्याने आईंकडे पाहू लागले आई म्हणाल्या ऋषी ड्र्ग्स घेतो ही गोष्ट आम्ही लपवली तुझ्या घरच्यांपासून आणि तुझ्या पासूनही पण बाळा त्याच्यावर उपचार सुरू आहेत लग्न केल्यावर सुधारेल असे खुप लोकांनी सांगीतले होते आम्हाला म्हणून आम्ही त्याचे लग्न लावून दिले आणि त्याचे परीणाम तुला भोगावे लागत आहेत खरच आम्हाला माफ कर…

आईंनी ऋषी बद्दल सांगीतल्यानंतर माझ्या पायाखालची जमिन सरकली. माझ्या नशीबावर रडू यायचे कधी कधी वाटायचे जावे सर्व सोडून कुठेतरी खुप दुर पण आईंचा केवीलवाणा चेहरा डोळयासमोर यायचा. त्यांना आशा होती त्यांचा मुलगा लग्न झाल्यावर सुधारेल. पण सगळे उलटेच होऊण बसले. एका आईने आपल्या मुलासाठी स्वार्थी असणे मला चुकीचे वाटत नाही. माझी आईंबद्दल कसलीही तक्रार नव्हती. आईंना फार अपराध्यासारखे वाटायचे पण मला त्या नाही वाटल्या कधीही अपराधी.

आई मला खुप वेऴा माहेरी जायला बोलल्या पण माझी जराही इच्छा नव्हती तिकडे जाण्याची कारण कुठे ना कुठे तरी माझे आई बाबाही जवाबदार होते या सगळयासाठी त्यांनी व्यवस्थीत चाैकशी केली असती तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. ते माझे लग्न लावून माझ्या त्यांच्यावरच्या जवाबदारीतून मुक्त झालॆ होते त्यामुळॆ त्यांना पुन्हा मी तिकडे जाऊन काळजीमधे टाकणे मला योग्य वाटत नव्हते. कारण बिन लग्नाची पोर संभाळणे जितके कठीण असते, त्याहून जास्त नव-याने टाकलेली पोर संभाळने कठीण असते याची कल्पना होती मला.

लग्न झाल्यावर काही दिवसांनी बाबा मला माहेरी घेऊण जाण्यासाठी आले होते पण ऋषीने मला माहेरी पाठवायला संमत्ती दिली नाही. शिवाय बाबांनाही त्यांनी स्पष्ट सांगीतले पोरीला घेऊन जायचे असेल तर कायमचे घेऊन जा पुन्हा आणून सोडायचे नाही. तिकडेच ठेऊन घ्यायचे. बाबा बिचारे निराश होऊन तिथून निघून गेले. त्यादिवशी नंतर माझे माहेर तुटले ते कायमचेच पुन्हा कधीही कोणीही माझ्या घरी आले नाही. त्यादिवशी बाबा मला घेऊण जाऊ शकत होते पण त्यांनी तसे नाही केले. कदाचीत त्यांनाच माझी जवाबदारी नको असेल. मग कशी जाणार मी त्यांच्याकडे.

आता आलेल्या परीस्थीतीला सामोरे जाण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता. हळूहळू मी रमू लागले होते त्या घरात आईंमुळे. दिवसभर मी आणि आई खुप छान रहायचो अगदी मायलेकीं सारख्या जिवाभावाच्या मैत्रीणीं सारख्या पण, संध्याकाऴ झाली की,मला भिती वाटू लागायची. ऋषी नऊ वाजता घरी यायचे त्यांच्या गाडीचा आवाज ऐकला की, हात पाय गळून जायचे.

आई मला खुप धिर द्यायच्या कित्येक वेळा आईंनी ऋषीला समजावण्याचा प्रयत्नही केला पण ते तेवढ्या पुरते ऐकल्यासारखे करायचे आणि खोलीमधे गेल्यावर तसेच वागायचे. एक दिवस आईंनी आणि मी ड्रग्सच्या पुढ्या शोधून लपवून ठेवल्या. झोपायला गेल्यावर ऋषी खुप शोधाशोध करू लागले.

पुडया भेटत नव्हत्या पाहून आदळ आपट करू लागले. तेव्हाही त्यांनी मला खुप मारले तेही चमड्याच्या पट्याने मला मारण्याचा आवाज बाहेर पर्यंत जात होता शेवटी आईंना रहावले नाही त्यांनी ऋषीला पुड्या परत केल्या. आई म्हणाल्या ऋषी दरवाजा खोल तुला जे हवे आहे ते माझ्याकडे आहे. ऋषीने दरवाजा उघडला आईंनी त्यांच्या हातात पुड्या दिल्या आणि माझ्याकडे आल्या मला पाहून त्या ऋषीवर खुप भडकल्या त्यांना बडबड करू लागल्या पण त्याचा ऋषीवर काहीही परीणाम होत नव्हता.

आईंनी मला उठवले आणि मला बाहेर घेऊन जाऊ लागल्या तोवर ऋषीने नशा केली होती. त्यांनी आईंचा हात पकडला आणि म्हणाले सोड तिला , आई खुप भडकल्या आणि म्हणाल्या हात सोड ऋषी माझा , मी तिला इथे मुळीच सोडून जाणार नाही. अरे जरातरी लाज असल्या सारखा वाग आयुष्यभर आम्हाला छऴलेस आता तिच्यामागे लागला आहेस जिव घेशील अश्याने तिचा एक दिवस.

ऋषींना आईंच्या बोलण्याचा खुप राग आला त्यांनी जोरात आईंचा मला पकडलेला हात सोडवला आणि त्यांना खोलीच्या बाहेर ढकलून दिले. मी आईंना संभाळण्यासाठी बाहेर जात होते तेव्हा मलाही ऋषीने जोरात धक्का देऊन जमीणीवर पाडले.

अजूणही तो क्षण तसाच आठवतो मला आई हताश होऊन बाहेरून केवीलवान्या नजरेने माझ्याकडे पहात होत्या आणि मी आशेने त्यांच्याकडे पहात होती की, मला वाचवा आई. दरवाजा लावून ऋषी माझ्याकडे आले आणि मला उठून वर झोप म्हणाले मी खुप घाबरले होते मी गपचूप पलंगावर गेले आणि ऋषी नेहमीप्रमाणे माझ्यावर जबरदस्ती करू लागले.

ऋषीने मला कधीही माणूस म्हणून वागवले नाही ते कायम मला विकत आणलेल्या वस्तू प्रमाणे वागणूक द्यायचे. आणि मन भरले की, मला बाजूला ढकलून झोपून जायचे. दिवसें दिवस ऋषींचे अत्याचार आणखीनच वाढू लागले. पुढे पुढे तर कामावरून आल्या आल्या त्यांना मी खोलीत हवी असायची. सुट्टीच्या दिवशी तर त्या खोलीच्या बाहेरही मला निघू द्यायचे नाहीत.

मि ही मुद्दाम ते सर्व टाळण्यासाठी कामामधे गुंतून रहायचे. सुरूवातीला ऋषी काही बोलले नाहीत पण काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की, मी हे मुद्दाम करत आहे. मी किचन मधे असताना ते चिडून किचनमधे आले माझे केस पकडून मला म्हणाले मुद्दाम करत आहेस ना तू हे. पण मी निर्लज्य आहे तुला बघायचे आहे का कसे ते ? साडी काढ चल मी म्हणाले ऋषी असे काय करता आई बाबा आहेत घरात.

प्लिज मी येते ना काम आवरून तर म्हणाले ए तुला सांगीतलेले कळते का? काढ साडी, शेवटी लाजे खातर हातातील काम सोडून मी गुपचूप खोली मधे गेले. हळूहळू सवय लावून घेतली मी त्या बलात्कराची वाटायचे मार खाऊणही हेच सर्व होणार आहे तर कशाला विरोध करा.

ऋषी आलेले दिसले की मिच स्वताहून साड़ी सोडून पलंगावर जाऊन फेकून द्यायचे माझ्या मन मेलेल्या देहाला त्या जनावरा समोर. वेदना झाल्यातरी तोंडातून अवाक्षरही काढायचे नाही.

एकदा ऋषीच्या आत्या आल्या होत्या आमच्या घरी. वयाने बाबांपेक्षाही मोठ्या असल्याने खुप जुण्या विचारांच्या होत्या त्या. नवरा बायकोने शेजारी बसून बोललेलेही त्यांना आवडायचे नाही. आईंना आणि मला भिती वाटू लागली होती. सगऴे आवरायला आधीच खुप उशीर झाला होता त्यातूनही मी पटापट आवरून खोलीकडे निघाले आत्यांनी मला थांबवले.

म्हणाल्या बस जरा गप्पा मार आल्यापासून कामातच आहेस. मी थोडावेळ बसले तिथे पण तितक्यात ऋषी नशा करून बाहेर आले. आत्यांसमोर ते माझ्या हाताला पकडून खेचू लागले मला आत्यांना ऋषी बद्दल काही कऴू द्यायचे नव्हते आमचे नाते खुप छान असल्यासारखे मी आत्यांना दाखवत होते. मी चेह-यावर खोटे हसू आणून ऋषींना म्हणाले काय झाले ओ काही हवे आहे का? येते हा जरा दोन मिनिट थांबा.

आत्यांसोबत जरा गप्पा मारते. ऋषी तिथेच बसले आणि मला कुठेही स्पर्ष करू लागले आत्यांसमोर माझी सर्व इज्जत निघण्याआधी मिच काही न बोलता खोलीमधे गेली. खुप लाजल्यासारखे झाले होते मला. आत्यांच्या लक्षात आले आणि त्या मला आणि ऋषीला नावे ठेऊ लागल्या. आत्या आईंना म्हणाल्या काय ही मेली आजकालची पिढी माणूस-कानूसही पहात नाहीत.

काही नाही गं आपला ऋषी चांगलाच आहे या पोरीनी बिघडवला आहे त्याला. पाहीलत ना मघाशी पण कशी काम आवरून गपचूप चोरा सारखी निघाली होती आत. आई भडकल्या आणि म्हणाल्या हे बघा वंन्स माझी सुन कशी आहे ते मला चांगलेच ठाऊक आहे. पाहूण्या आल्या आहात चार दिवस रहा खा प्या आणि निघूण जा आमच्या घरातील खासगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका.

बिचा-या आई कधीही कोणाला दुखवायच्या नाहीत पण ऋषीमुळे माझ्यासाठी तेव्हा तेही त्यांना करावे लागले. आत्यांना राग आला त्या दुस-याच दिवशी त्यांच्या घरी निघूण गेल्या. त्यानंतर आमच्या घरी कोणीही यायचे नाही.

तिकडे कॉलेज सुरू होऊन महीणा झाला होता. मी कॉलेजला जात नसल्याने माझ्या सर्व मित्र मैत्रीणींना माझी काळजी वाटू लागली. सुरूवातीला काही दिवस वाट पाहीली त्यांनी पण प्रणवला काहीच सुचत नव्हते तो रोज मैत्रीणींना माझ्या घरी जाऊन पहाण्यास सांगायचा. एकदिवस मैत्रीणी माझ्या घरी गेल्या तिथे त्यांना माझ्या लग्नाचे कळाले त्यांनी जाऊन प्रणवला सांगीतले.

माझ्या लग्नाचे कळाल्यावर प्रणव खुप रडू लागला. तसे तर सर्वांनाच माहीत होते प्रणव आणि मी एकमेकांकडे चोरून चोरून पहायचो. पण त्याला रडताना पाहून त्याच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल सर्वांना खात्री पटली.

सर्वांनी मला माझ्या सासरी येऊन भेटायचे ठरवले. पण प्रणवला मला पहाण्याची जराही इच्छा नव्हती. सर्वांनीच त्यालाही बरोबर येण्या साठी खुप आग्रह केला पण, तो ऐकतच नव्हता. मैत्रीणी त्याला म्हणाल्या तिने नाही सांगीतले ना आपल्याला लग्नाचे म्हणून आपण स्वतः जायचे आणि तिला तिची चुक दाखवून द्यायची आणि प्रणव तू जिच्यासाठी इथे बसून रडत आहेस तिच्या डोळयात तुझा घात केल्याचा पश्चाताप तरी आहे का हे ही तुला पहाता येईल नाहीतर तिच्यासाठी इथे त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे.

ग्रुप मधील मुलेही म्हणाली प्रणव शिवाय मुलींना घेऊण जायचे आहे. फोर व्हिलर फक्त तुझ्याकडे आहे तू नाही म्हणालास तर सगळेच कँसल होतील. प्रणव म्हणाला ठीक आहे येतो मी पण मी तिच्या घरी येणार नाही. मी गाडीतच बसून राहीन. दुपारचे चार वाजले होते साधारण. अचानक दारावर बेल वाजली दरवाजा मिच उघडला तर समोर ही सगळी भुतावळ.

अचानक सर्वांना पाहून मला खुप आनंद झाला. आनंदानेच मैत्रीणींच्या गळयात पडून मी रडू लागले आई म्हणाल्या मिरा अगं आत तरी घे त्या सर्वांना या रे बाळांनो आत या. मी सर्वांसोबत गप्पा मारू लागले सगळे मला लग्नाला बोलवले नाही म्हणून बडबड करत होते. आईंनी तो पर्यंत सर्वांना पाणी आणून दिले मी म्हणाले अहो आई तुम्ही कशाला आणलेत मी आणले असते ना आणि मी उठले तर आई म्हणाल्या राहूदे गं तु बैस गप्पा मार खुप दिवसांनी भेटलात ना सगळे मी नाष्ट्याचॆ पहाते.

घर पाहून मैत्रीणी म्हणाल्या वाह मिरे मस्त एकदम शेठ नवरा मिळाला आहे हा तुला. सासू तर किती छान आहे तुझी. मी फक्त हसत होते कारण माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते माझ्याबद्दल. माझी नजर कोणाला तरी शोधत होती शेवटी न राहून मी विचारलेच आपल्या ग्रुपचे बाकीचे सर्व कसे आहेत? त्यावेळी प्रणव सोडून सगऴे आले होते माझ्या प्रश्नाचा अर्थ कळाला सर्वांना कोणीतरी पटकन म्हणाले आला आहे तो पण खालीच थांबला आहे.

मी टेडी आमचा मित्र, त्याला सांगीतले प्लिज त्याला वर घेऊण ये. सगळे प्रश्नार्थी नजरेने माझ्याकडे पाहू लागले. माझ्या ते लक्षात आले मी म्हणाले म्हणजे, बरोबर नाही वाटत ना असे घरा जवळ येऊणही न बोलवणे. काही वेळाने टेडी प्रणवला घेऊन आला. बाकीचे सगळे आमच्या लग्नाचे फोटो पहाण्यात मग्न होते. प्रणवला पाहून माझे डोळे टचकण भरले.

असे वाटत होते धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारावी आणि रडून मोकळे व्हावे. प्रणवही रडून लाल झालेल्या डोळयांनी माझ्याकडे एकटक पहात होता. आजवर नजरेनेच बोलले होतो आम्ही त्यामुळे त्याची नजर मला सहज वाचता आली. त्याची नजर विचारत होती मला की, का तू असे केलॆस माझ्यासोबत? आणि मी त्याला नजरेनेच सांगत होते प्लिज निदान तू तरी मला समजून घे.

आणि विसरून जा मला. दुस-या कोणासोबत तरी लग्न करून सुखाने संसार कर. आम्ही एकमेकांकडे पहात असताना आईंनी आम्हाला पाहीले. कदाचीत तेव्हाच त्यांच्या सर्व लक्षात आले.चहा नाष्टा झाल्यावर सगळे निघूण गेले. सगळे निघून गेल्यावर आई आणि मी घर आवरत होतो. आई सर्वांबद्दल मला विचारू लागल्या खासकरून प्रणव बद्दल म्हणाल्या तो शेवटी आला तो कोण होता ग? मी थोडी घाबरले पण सांगीतले आईंना तो ना तो प्रणव होता. आमच्याच कॉलेज मधे शिकतो.

फार संस्कारी मुलगा आहे तो. त्याचे बाबा इथले तहसीलदार आहेत. त्यांच्या स्वतःच्या वडीलोपार्जीत सात कंपन्या आहेत. प्रणव पुढे MBA करून हेच सर्व संभाळणार आहे. इतका श्रिमंत असूणही त्याला जराही गर्व नाही. बराच वेळ मी प्रणव बद्दलच बोलत राहीले. आईही फार प्रेमाणे सर्व ऐकून घेत होत्या.

काही वेळाने म्हणाल्या मिरा तुला पुढे शिकावे असे नाही वाटत का ग? मी म्हणाले आधी वाटायचे ना खुप शिकावे आणि नोकरी करावी. पण आता नाही तसे वाटत आणि वाटून तरी काय फायदा, शक्य तरी आहे का ते? आई म्हणाल्या का नाही? आहे का तुझी पुढे शिकण्याची इच्छा? मी म्हणाले नाही ओ आई आणि असली तरी ऋषींना नाही आवडायचे ते.

आई दबक्या आवाजात म्हणाल्या त्याला कोण सांगणार आहे. मी आश्चर्याने आईंकडे पाहू लागले. आई म्हणाल्या अगं खरचं आज तुझ्या मित्र मैत्रीणीं सोबत तुला जितकी आनंदी पाहीली ना मी तितकी आनंदी या आधी कधीही पाहीली नाही तुला. विचार कर! ऋषी सकाळी नऊला जातो ते रात्री नऊलाच येतो आणि तुझ्या कॉलेजची वेळ सकाळी अकरा ते पाच आहे.

तुझे कॉलेज इथुन फक्त तासाभराच्या अंतरावर आहे. ऋषी येण्याआधी तू पोहोचशीलही घरी त्याला सुट्टी असेल त्यादिवशी नको जात जाऊ कॉलेजला. आणि तुझे कॉलेजचे जे काही सामन आहे ते तू आमच्या खोलीत ठेव ऋषी तिकडे फिरकतही नाही. कॉलेजला जाशील तर निदान काही वेळ आनंदात तर रहाशील.

मी आईंकडे पाहीले आणि म्हणाले आई खरच हे सर्व शक्य आहे का ? आई म्हणाल्या हो ग बाळा अगदी तुझ्या गळया शप्पत. मला खुप आनंद झाला मी आईंना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले थँक्यू आई…..पुढे ऋषीच्या बाबांनी मला अॅडमीशन घेऊण दिले. मी कॉलेजलाही जाऊ लागले. सर्वांनाच मला पुन्हा कॉलेजमधे पाहून खुप आनंद झाला.

प्रणवलाही मला पाहील्यावर खुप आनंद झाला मला अचानक पाहिल्यावर त्याचा चेहरा खुप खुलला पण काही वेळाने कदाचीत त्याच्या लक्षात आले कि, आता ही आपली मिरा नसूण कोणाची तरी पत्नी आहे आणि अचानक त्याचा खुललेला चेहरा उतरला. तो माझ्या सोबत खुप तुटक तुटक वागायचा. खरतर तेच योग्य होते आमच्या दोघांसाठी.

मलाही त्याला माझ्यामधे जराही गुंतू द्यायचे नव्हते. मी त्याच्याकडे लक्ष नाही असे दाखवायचे पण मनातून त्याची तगमग पाहून खुप वाईट वाटायचे मला.

एक दिवस आमच्या ग्रुपमधे अशीच प्रेमावरून चर्चा चालू होती. मुली खरे प्रेम करतात कि, मुले काहीवेऴाने विषय खुप रंगला चर्चेला भांडणाचे वळन लागले. मुली म्हणत होत्या मुलीच सिरीअस असतात मुले फक्त टाईम पास करतात. ते ऐकून प्रणवला काय झाल काय माहीत तो माझ्याकडे पाहून बोलू लागला.

मुलेच करतात खरे प्रेम ते मुलींच्या आठवणींत झुरतात, रात्र रात्र जागतात, रडतात, अन्न पाण्याचा त्याग करतात आणि मुली श्रिमंत मुलगा पाहून त्याच्यासोबत लग्न करून निघुण जातात. त्यांच्यावर प्रेम करणा-या मुलाला आयुष्यभरासाठी एकटे सोडून , त्याला तो किती मुर्ख होता याची जाणीव करून देऊण.

तो जे काही बोलत होता ते माझ्यासाठी होते हे मला कळाले होते त्याचा प्रत्येक शब्द कटारी सारखा माझ्या काळजात घाव करत होता. त्याचे बोलने मला सहण झाले नाही. मला खुप गहीवरून आले मी तिथून उठून कॉलेजच्या गच्चीवर निघूण गेले. प्रणवने माझ्या डोळयात आलेले पाणी पाहीले होते तो वेड्यासारखा मला पुर्ण कॉलेज मधे शोधत होता.

अखेर तो गच्चीवर आला. मी भिंतीला टेकून गुडघ्यात मान घालून रडत बसले होते. प्रणवचा माझ्यावर राग असणे स्वाभावीक होते पण त्याच्या मनात माझ्याबद्दल जो गैरसमज होता त्याने माझी खुप तडफड होत होती. प्रणव आला आणि म्हणाला हुशश …इकडे बसली आहेस होय? मी काहीच बोलत नव्हते प्रणव माझ्याजवऴ आला. त्याने घाबरत घाबरतच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मिरा वर बघ काय झाले का रडतेस? वर बघ ना! मी त्याला मान हलवून नाही म्हणून सांगीतले.

काय झाले पण? मी बोललो म्हणून रडतेस का? मला माहीत आहे सत्य नेहमी कडूच असते पण तेच स्विकारायचे असते. तुला नाही कळणार माझी अवस्था मला माहीत आहे तुला गमवल्यानंतर मी काय काय गमावले आहे ते. तू मात्र माझा जराही विचार केला नाहीस आणि निघूण गेलीस मला एकटा सोडून पैसेवाला मुलगा भेटला की.

मला त्याचे बोलणे अगदी असह्य झाले मी रडत रडतच वर पाहीले आणि बोलू लागले त्याला ताडताड. काय श्रिमंत श्रिमंत लावले आहेस, तसे पहायला गेले तर तू पण तर श्रिमंतच होतास ना. मी ऋषीच्या श्रिमंतीमुळे नाही तर माझ्या गरीबीमुळे त्याच्यासोबत लग्न केले. आणि ज्या प्रेमाच्या तुटण्यावर तुला इतका त्रास होत आहे ते प्रेम कधी व्यक्त तरी केले होतेस का तू?. माझे लग्न अचानक ठरले मला विचारलेही नाही कोणी.

तू कधी बोललाच नव्हतास तर काय सांगणार मी माझ्या घरच्यांना? लग्ना आधी मी ऋषीला कधी पाहीले ही नव्हते. ते श्रिमंत आहेत कि गरीब मला काहीही माहीत नव्हते. मला कधी स्वतःच्या मनासारखे जगता आले सांग ना? आईबाबा म्हणाले म्हणून त्यांच्यासाठी माझ्या सर्व भावनांचा बळी देऊन उभी राहीले लग्नाला.

कायम दुस-यांच्या मर्जीने जगत आले म्हणूनच तर आज भोगतीय. माझ्या लक्षात आले . माझे प्रोब्लेम्स मला कोणालाही सांगायचे नाहीत मी बोलता बोलता शांत झाले आणि उठून म्हणाले चल जाऊ खाली उगीच कोणी आपल्याला इथे असे पाहीले तर विणाकारण चर्चा होईल.

प्रणवच्या लक्षात आले मी काहीतरी लपवत असल्याचे तो मला म्हणाला थांब मिरा काय लपवत आहेस तू? काय भोगावे लागत आहे तुला? मी म्हणाले काहीच नाही असेच चुकून निघाले तोंडातून प्रणव म्हणाला मिरा मी तुला चांगलाच ओळखतो सांग काय झाले मी म्हणाले ओळखत असतास तर इतके घालून पाडून बोलला नसतास मला. प्रणवने मला त्याची शप्पथ दिली आणि नाईलाजाने मला त्याला सर्व सांगावेच लागले.

मी जे काही सहण करत होते ते ऐकताना प्रणवही रडू लागला तो मला म्हणाला बास आता त्याच्याकडे तू क्षणभरही थांबणार नाहीस. तू डिव्होर्स घे त्याच्यासोबत मी घरात बोलतो आपण लग्न करू. मी म्हणाले काही नको प्रणव मला कोणाचे उपकार नको आहेत. प्रणव चिडला आणि म्हणाला अग मुर्ख उपकार म्हणून नाही करत आहे मी हे माझे खरच खुप प्रेम आहे तुझ्यावर.

त्याच्या बोलण्याने मी वितळत चालले होते. त्यातूणही मी स्वतःला सावरले आणि ओरडले त्याच्यावर प्रेम असले म्हणून काय झाले प्रणव? आता उतरण आहे मी कोणाची तरी. रस्त्यावर चालताना पायाखाली आलेले फुल देवाला वहात नाही कोणी. ऋषीने माझ्या शरीराचे खेळने करून टाकलेले आहे .

मनाने आणि शरीराने सुद्धा तिरस्कार करते मी शरीरसंबधांचा मी तुला काहीही देऊ शकणार नाही ना माझ्या शरीराचे पावित्र्य ना त्याचे सुख. माझा विचार काढून टाक तुझ्या मनातून प्रणव आज नाही तर उद्या ऋषी बरे होतील व्यसने सोडून देतील आणि आम्ही सुखाने संसार करू. हे ऐकून प्रणव म्हणाला वाह! छान भाषण देतेस हा तू आणि आश्वासनही.

अगं मुर्ख कोणत्या आशेवर रहाणार आहेस तू त्याच्यासोबत? त्याच्या आईबाबांनी याच आशेवर तुझे त्याच्यासोबत लग्न लावून दिले ना, काय झाले त्याचे? पश्चातापाशिवाय काय मिळाले त्यांना? तुलाही दुसरे काहीही मिऴणार नाही ऐक माझे अजूणही वेळ गेलेली नाही. माझे बाबा कँसरने शेवटचे क्षण जगत आहेत माझे लग्न होताना पहाण्याची त्यांची फार इच्छा आहे.

घरात माझ्या लग्नाची पहाणी सुरू झाली आहे. एकदा लग्न झाले कि, मला काहीही करता येणार नाही. आणि हो तू असे का म्हणालीस कि, तू मला काहीही देऊ शकणार नाहीस. हेच ओळखलेस का तू मला? मला खरच काहीही नको आहे तुझ्याकडून तु फक्त सोबत रहा माझ्या. एक गोष्ट लक्षात घे मला जर ते सर्व हवे असते ना तर कधीच तुला प्रपोज करुन ते सर्व मिळवले असते मी.

पण नाही मी तसे नाही केले कारण मी नेहमी तुला माझी भावी पत्नी म्हणूनच पाहीले. कायम आदर केला मी तुझा आजही करतो माझ्यासाठी तुझ्या मनाचे पावीत्र्यच खुप आहे शरीराच्या पावीत्र्यापेक्षा. माझ्यामनावर त्याच्या बोलण्याचा काहीही परीणाम होत नव्हता. मी माझ्या निर्णयावर ठाम राहीले. नाही म्हणजे नाही.

शेवटी त्याने हार माणून माघार घेतली आणि म्हणाला बर ठिक आहे नाही करायचे तुला माझ्यासोबत लग्न नको करू. आजपासून आपन फक्त छान मित्र बणून राहू तू कधीही स्वतःला एकटे समजायचे नाहीस काहीही बोलावेसे वाटले तरी माझ्याकडे बिनधास्त बोलायचे आणि आनंदाने रहायचे तेवढे तरी जमेल ना? मी डोळे पुसले आणि हसून मान हलवून हो म्हणाले.

त्यानंतर सर्वच छान चालू होते पण फक्त घराबाहेर. ऋषी मधे मात्र काहीही बदल झाला नव्हता. रोज माझ्या चेह-यावर गळयावर हातांवर नवीन नवीन व्रण असायचे. प्रणवला ते पाहून खुप राग यायचा रागाने लालबूंद होऊण निघून जाऊण एकटाच बसायचा कुठेही. मग मला त्याला पुन्हा समजवावे लागायचे.

राग शांत झाला कि, पुन्हा येऊण आमच्यात छान मिसळून जायचा. मनातील वेदना स्वतःच्या खोट्या हास्यामधे लपवून.

आईंचा स्वभाव सर्वांनाच खुप आवडायचा . अधून मधून घरीही यायचे सगळेच आईंना भेटायला. त्याही खुप खुष व्हायच्या सर्वांना पाहून आणि मिसळून जायच्या त्यांच्यात. प्रणव आणि आईंचे तर फार छान पटायचे आई किचनमधे काही करत असतील तर हा तिकडे जाऊन त्यांना मदत करायचा. कधी कांदा कापून देईल कधी पोहे बणवून देईल.

सगऴे प्रणवला चिडवण्यासाठी आईंना बोलायचे आई याला घर जावई करून घ्या आणि तुमच्याकडेच ठेवा आईही गंम्मतीने म्हणायच्या होना माझी लग्नाची पोरगी असती तर नक्कीच करून घेतले असते. आई नेहमी बोलायच्या प्रणव सारखा मुलगा सर्वांना मिळावा. खुप भाग्यवान आहेत त्याचे आईवडील.

काही दिवसांनी प्रणवचा वाढदिवस होता. सर्वांनी पिकनीकला जायचे ठरवले.माझ्या सोयी नुसार प्रणवने व्यवस्थीत प्लान केला. ऋषी नऊला घरी येतात हे त्याला माहीत होते आठ वाजता घरी सोडण्याचे त्याने मला प्रॉमीस केले पण, मी काही तयार होत नव्हते. प्रणवने आईंना विचारले आणि आईंनीही मला जाण्याची परवानगी दिली.

पिकनीकला गेल्यावर आम्ही सर्वांनी खुप धमाल केली. बरोबर आठ वाजता प्रणवने मला घरी सोडले. त्यादिवशी कसे काय कोण जाणे पण ऋषी लवकर आले होते घरी. आईंनी दरवाजा उघडला मी त्यांना पिकनीकची मज्जा सांगतच होते तितक्यात ऋषी समोर दिसले. ऋषीला पाहूण माझे हात पाय थरथरू लागले.

ऋषींचा पहीला प्रश्न कोण होता तो? कोणासोबत इतक्या रात्री पर्यंत फिरत होती? आई ऋषीला समजवत त्यांच्या पुढे जाऊण उभ्या राहील्या आणि त्यांना पकडून मला म्हणाल्या मिरा धाव जिव घेईल तो आज तुझा. मी मागे वळून बाहेर पडणार तितक्यात ऋषी आईंना धक्का देऊन माझ्या मागे आले दरवाजातूनच त्यांनी माझ्या केसांना पकडून मला फरफटत ओढून खोलीमधे न्हेले.

आत न्हेल्यावर नेहमी प्रमाणे ते मला मारहान करू लागले. मला म्हणाले घरातला कमी पडतो म्हणून बाहेर जातेस काय तुझी भुक भागवायला आज तुझी तहाण आणि भुक अशी भागवतो कि, तुझी हौसच फिटेल. ऋषी माझ्या प्रत्येक अवयवाला स्पर्श करून मला विचारत होते बोल इथे स्पर्श केला का त्याने तुला , मी नाही म्हणाले कि, पट्याने जिव खाऊन ते मला मारत होते. मी जिवाच्या आकांताने ओरडत होते आई बाबा वाचवा मला.

आई बाबा दोघेही मला वाचवण्यासाठी धडपडत होते. तितक्यात प्रणव त्याच्या गाडीमधे राहीलेली माझी बॅग देण्यासाठी परत आला. घरातील गोंधळ पाहून त्याला काय चालू आहे काहीही कळत नव्हते. आईंनी त्याला पाहीले आणि म्हणाल्या प्रणव मिराला वाचव ऋषी मारतोय तिला.

प्रणव दरवाजा तोडून आत आला मी विवस्त्र पलंगावर जिव गेल्यासारखी पडले होते ओरडून ओरडून घसा कोरडा झाला होता. पट्याच्या माराने पुर्ण शरीर लाल झाले होते. आईंनी मला पटकन कपडे घातले प्रणव आत आल्या बरोबर ऋषीला वेड्यासारखा मारू लागला. त्यातच ऋषीच्या डोक्यावर लागले आणि तो बेशुद्ध झाला.

प्रणव तरीही त्याला मारतच होता आई त्याला म्हणाल्या प्रणव त्याला सोड मिराला डॉक्टरकडे घेऊण जा. त्यानंतर प्रणवने मला उचलून दवाखान्यात न्हेले. तिन दिवसांनी मला शुद्ध आली. प्रणव माझ्या पायाशी बसून पेंगत होता कदाचीत तो ते तिन दिवस माझ्यासोबत दवाखान्यातच होता.

मला त्याला तसे पाहून फार रडू आले.मी उठण्याचा प्रयत्न केला माझ्या धडपडीने प्रणवला लगेच जाग आली. तो मला म्हणाला पडून रहा काही हवे आहे का तुला. मी मनाशी एक निर्धार केला होता मी प्रणवला म्हणाले मला घरी घेऊण चल. प्रणव म्हणाला मिरा तुझी तब्बेत ठिक नाही बरी हो आधी मग जाऊ. मी म्हणाले नको ऋषी आले असतील घरी.

प्रणव खुप भडकला ऋषी ऋषी ऋषी झक मारत जाऊ दे त्याला. आठवतय का तुला ? त्याने काय केले आहे तुझ्यासोबत… माझे आई तिन दिवसापासून तू इथे पडून आहेस इतके मारले आहे त्याने तुला. आता काहीही झाले तरी मी तुला अजीबात त्याच्याकडे जाऊ देणार नाही. मी डिश्चार्ज घेतो आपण माझ्या घरी जाऊ.

मी त्याचे तेव्हाही ऐकले नाही मी त्याला म्हणाले तू मला सोडणार आहेस कि, मी जाऊ माझी माझी. प्रणव खुपच भडकला आणि म्हणाला ठिक आहे तुझी हिच इच्छा आहे तर माझाही नाईलाज आहे. प्रणवने डिश्चार्ज घेऊण मला घरी आणून सोडले. आणि बाहेरच्या बाहेर निघूण गेला.

मी घरात गेले तेव्हा ऋषी घरी नव्हते. आईंनी मला पाहील्या पाहील्या जवळ घेतले आणि रडू लागल्या. मी आईंना ऋषी बद्दल विचारले . तेव्हा मला कळाले कि, ऋषींना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले आहे. आईंनी मला ऋषींनी सही केलेले डिव्होर्स पेपर दिले. मी आईंना विचारले कशी सही केली त्यांनी? आई म्हणाल्या पुडी देत नव्हते सही केल्यावर देते म्हणून करून घेतली सही.

मी आईंना म्हणाले पण आई आता याची काय गरज? ऋषी ठिक होऊण येतील आता. तेव्हा आई म्हणाल्या ठिक होऊण आला तरी तुझ्या मनावर जे त्याने आघात केले आहेत ते कधीही मिटणार नाहीत. माझे ऐक मिरा ऋषीला डिव्होर्स देऊण प्रणव सोबत लग्न कर , खुप प्रेम करतो तो तुझ्यावर.

त्यादिवशी आई बाबांचा निरोप घेऊण मी कायमची ऋषीच्या आयुष्यातून निघूण गेले. तिथून पुढे मी एका गर्ल्स हॉस्टेलवर राहू लागले. निघताना आईंनी काही पैसे दिले होते तेच अॅडमीशन साठी उपयोगात आले. आईंना वाटायचे मी प्रणवकडे गेले आणि प्रणवला वाटायचे मी आईंकडे आहे. दोन चार दिवसात मी कॉलेजला जाऊ लागले. लग्न नवरा घर संसार सारे काही मी माझ्या मनातून काढून टाकले होते. त्यादिवशी पासून प्रणव माझ्यासोबत बोलत नव्हता.

एक दिवस अचानक प्रणव माझ्याकडे बोलण्यासाठी आला म्हणाला मिरा कसे चालू आहे आता सर्व ऋषी कसा आहे? मी म्हणाले छान चालू आहे आता. ऋषी आता नशा नाही करत त्यामुळे मला त्रासही नाही देत हे बघ आता माझे हात, गळा, चेह-यावर कसलेही व्रण नाहीत. प्रणव पुढे म्हणाला छान, खुप छान वाटले ऐकून अशीच आनंदात रहा.

मिरा लग्न ठरले आहे माझे. बाबांची प्रकृती दिवसेंदिवस खुप बिघडत चालली आहे. अजूणही विचार कर अजुणही वेळ आहे तुझ्याकडे. प्रणवचे लग्न ठरलेले ऐकून मला धक्का बसला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण मला स्वार्थी व्हायचॆ नव्हते. प्रणवचे बाबा आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होते.

बायकोने नव-याला सोडलॆ किंवा नव-याने बायकोला सोडले तरी समाज स्त्रीलाच बोलतो नव-याने टाकलेली. पुरूषांना कोणी म्हणत नाही बायकोने टाकलेला. प्रणव असे माझ्या सारख्या नव-याने टाकलेल्या मुलीसोबत, एका दुस-याच्या उतरणी सोबत लग्न करत आहे हे कळाल्यावर त्याच्या बाबांनी त्याचे लग्न पहाण्याआधीच जिव सोडला असता.

माझ्या मनात प्रणवला गमवताना ज्या वेदना होत होत्या त्या मला शब्दात नाही सांगता येणार. मनातील भावनांवर आवर घालून मी प्रणवकडे पाहून खोटेच हसले आणि म्हणाले अरे वा अभिनंदन कधी आहे मग लग्न? प्रणव म्हणाला ओह धन्यवाद त्याचे डोळे पाण्याने भरले होते तो मला म्हणाला मुहूर्त तसा दोन आठवड्यानंतरचा आहे पण आता मी पुढच्या आठवड्यातच लग्न करणार.

लग्नाला यायचं हं तुला आग्रहाचे निमंत्रण आहे आणि तो तिथून निघूण गेला.

प्रणवच्या लग्नाची तयारी सुरू झाली. आम्ही सर्व मित्र मैत्रीणी दोन दिवस आधीच त्याच्या घरी रहाते गेलो होतो. मेहेंदी काढायचे चालू होते प्रणव आम्ही बसले होतो तिथे आला आणि माझ्याकडे पाहून मेहेंदी काढणा-या मुलीला म्हणाला, या मिरा मॅडमला चांगली मेहेंदी काढा. त्यांच्या लग्नात त्यांनी किती हौस केली आम्हाला माहीत नाही निदान माझ्या लग्नात तरी करू दे. मी तिथून उठून बाहेर निघाले प्रणवने मला अडवले आणि म्हणाला का सहण होत नाही का माझे बोचरे बोलणे.

पण माझ्या जागेवर येऊन विचार करून पहा जरा. माझ्या लग्नाच्या तयारी मधे मी जिच्यावर प्रेम करतो तीही आहे आणि माझ्या लग्नाच्या तयारीत मदत करत आहे. काय वाटत असेल माझ्या मनाला. मी त्याला बाजू देऊण जाऊ लागले त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला मिरा मेहेंदी काढ सर्वांना वाटेल तूला मांझे लग्न ठरलेले पहावत नाही म्हणून तू मेहेंदी काढत नाही आहेस. शिवाय तुझ्या नव-यालाही खात्री होईल तू लग्नालाच गेली होतीस.

मी गुपचूप जाऊन मेहेंदी काढून घेतली. प्रणवच्या आईंनी आम्हा सर्वांना छान छान साड्या घेतल्या. जसे जसे लग्न जवळ येत होते तसे तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते. खुप काहीतरी हातातून सुटून चालल्या सारखे वाटत होते. प्रणव मात्र येता जाता मला टोमणे मारत होता. लग्नाच्या आदल्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही.

मी पाणी आणण्यासाठी किचन मधे गेले होते. प्रणवने मला तिथेही गाठले आणि म्हणाला मिरा लग्न आहे उद्या माझे जिव कासावीस नाही होत का ग तुझा? फक्त एकदाच माझ्या डोळयात डोळॆ घालूण सांग तुझे माझ्यावर प्रेम नाही , तुला माझ्या लग्नाचा त्रास होत नाही. मी म्हणाले हो नाही आहे माझे तुझ्यावर प्रेम आणि मला नाही होत आहे कसलाही त्रास.

प्रणव म्हणाला बास आता मी लग्न करायला मोकळा आजपासून आता पासून तुझा विचार मी माझ्या डोक्यातून मनातून मुळापासून काढून टाकला आहे. असे म्हणून तो निघूण गेला आणि मी तिथेच उभी राहून गहीवरून रडू लागले.

अखेर लग्नाचा दिवस उजाडला. प्रणवच्या कुरवल्या म्हणून आम्ही त्याच्यासोबतच होतो. पण प्रणवने माझ्याकडे पाहीलेही नाही. आम्ही सगऴॆ लग्न पहात खुर्च्यांवर बसले होतो. भटजींनी नवरा मुलगा आणि नव-या मुलीला बोलवले माझी तगमग वाढू लागली. मला भरून आले पण मला रडायचे नव्हते मी हुंदका आवरत हसण्याचा प्रयत्न करत होते. तितक्यात प्रणव आला खुप छान दिसत होता तो. मला त्याचे लग्न होताना पहाने अशक्य झाले होते. त्यानंतर भटजी पुन्हा नव-या मुलीला बोलवा म्हणाले.

मला सहन होत नव्हते मला रडू आवरले नसते मी तिथून जायला निघाले मागे वळून निघणार तितक्यात समोर आई आणि बाबा उभे. आईंनी माझ्या हाताला पकडले आणि म्हणाल्या चल मी आईंकडे पाहू लागले आणि त्यांना म्हणाले कुठे? तितक्यात प्रणव उठून खाली आला तो आई बाबांच्या पाया पडला आणि त्याने मला उचलून न्हेऊन भटजींच्या समोर बसवले. काय चालू होते मला काहीच कळत नव्हते. मी उठून जाण्याचा प्रयत्न करत होते तर प्रणव म्हणाला आता जरा वेळ शांत बस विधी होऊ दे मग सर्व सांगतो.

लग्नाचे सर्व विधीही झाले. थोडक्यात आमचे लग्न लागलेही. मग आई आणि प्रणव मला सांगू लागले कि, प्रणव जेव्हा आईंना लग्नाचे आमंत्रण द्यायला गेला तेव्हाच त्या दोघांनाही माझ्या बद्दल सर्व काही कळाले त्याच दिवशी प्रणवने त्याचे होणारे लग्न मोडले. त्याच्या घरात जी लग्नाची तयारी सुरू होती ती त्याच्या आणि माझ्याच लग्नाची तयारी सुरू होती. प्रणवच्या घरच्यांना माझ्याबद्दल सर्व माहीत होते. त्यांची प्रणव आणि माझ्या लग्ना बद्दल काहीही हरकत नव्हती.

आई बाबांनीच माझे कन्यादान केले. प्रणव सोबत लग्न करून मी खुप सुखात होते. पण ऋषी डोक्यातून जात नव्हते . लग्नाची पहीली रात्र होती मनात खुप भिती होती सर्व मागचे आठवत होते हातापायातून जिव गेल्यासारखे वाटत होते. पण मला खात्री होती प्रणव मला समजून घेईल. मी त्याच्या खोलीत गेले आणि घातलेले सर्व दागीने उतरवू लागले. प्रणवचे माझ्याकडे लक्ष नव्हते तो काही तरी करत होता ते पहाण्यासाठी मी त्याच्याजवळ गेले.

तर तो जे काही करत होता ते पाहून मी खुप घाबारले प्रणवला ढकलून मी बाहेर पळू लागले. प्रणवच्या हातात ड्रग्स होते. प्रणवने मला जोरात पकडले मी खुप घाबारले ओरडू लागले प्रणवने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला ओरडू नको सगळॆ येतील आवाज बंद कर मी सूटण्यासाठी धडपडत होते.

पुन्हा मी माझ्या नशीबावर रडू लागले प्रणवने मला मिठीत घेतले आणि म्हणाला शांत हो येडू पिठीसाखर आहे ही ड्रग्स नाही मस्करी करत होतो मी.

तुला एकदा गमवने,गमवून मिळवणे

आणि पुन्हा गमवताना पहाणे खरच खुप असह्य झाले होते.

पुन्हा तुला गमवले असते तर मात्र खरच

माझ्याकडे जगण्यासाठी कारणच उरले नसते.

मनी ध्यानी नसताना तू मला लग्नासाठी न्हेऊण बसवले,

सासू सासरे झाले आईबाप

आणि त्यांनीच माझे कन्यादान केले….

नऊ महीने पोटात वाढवणा-या आईपेक्षा

मला माझी सासू आईच जास्त जवळची वाटते,

तिच्यापासून दुर गेल्याने काळीज माझे फाटते……

होते माझेही खुप प्रेम तुझ्यावर

पण तुझ्याचसाठी तुझ्यापासून मी दुर जात राहीले,

तू विश्वासाने सप्तपदी घेतल्यास आणि

मी माझे तन,मन,धन स्वखुशीने तुझ्या चरणी वाहीले……

प्रेमातील खरा गोडवा मला मी तुझी झाल्यानंतरच कळाला

तुझ्या सोबत लग्न झाले आणि एकाच जन्मात मला पुन्हा दुसरा जन्म मिळाला ….

पायदळी चुरगळलेल्या फुलाला

तू तुझ्या मनात प्रेमाने समावून घेतलेस,

विटलेल्या माझ्या देहाला तू तुझ्या स्पर्शाने पुन्हा

पावन केलेस…

Please follow and like us:

Leave a Reply