विभक्त..

विश्वासच बसत नव्हता एकेकाळी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे आम्ही दाेघे एकमेकां समाेर काेर्टात उभे राहीलो. तेही घटस्पोट घेण्यासाठी. ब-याच दिवसांपासून आमच्या दोघांच्यात खूप भांडणे चालू हाेती. कशावरून होतात कशी होतात आमचे आम्हाला ही कळायचे नाही.

शुल्लक शुल्लक गाेष्टी अचानक टाेकाला जायच्या. मी शांत असले कि, त्याला भांडणाचा जाेर यायचा आणि ताे शांत असला कि, मी भांडण करायचे. अर्थात जे घडत होते ते दोघांच्याही मना विरुद्धछ होते पण आम्हा दोघांचाही त्यावर जराही ताबा राहीला नव्हता.

आणि अखेर आम्ही विभक्त हाेण्याचा निर्णय घेतला कार्टाच्या नियमाप्रमाणे सहा महीने आम्ही एकत्र राहीलोही पण, त्या सहा महीन्यातही आमच्यात विशेष असे काही बदल झाले नाहीत. मग काय पुढे दोघांच्या संमतीने आम्हाला घटस्पाेट मिळाला आणि आश्चर्य म्हणजे आम्हाला दाेघांनाही असे करण्याचा जराही त्रास हाेत नव्हता.

Loading...

असे वागत होतो कि, सुटलो एकदाचे.एक वर्ष झाले होते आमच्या लग्नाला जेव्हा आम्ही घटस्पोट घेतला. आम्ही एकाच ठिकाणी पण वेगवेगळ्या बिल्डींग मध्ये रहात हाेताे. मी नववीला असताना त्याची आणि माझी ओळख झाली हाेती. आम्ही दांडीया खेळायला ज्या मंडळात जायचो तिथे निहारही असायचा. मी दांडीया खेळण्यात दंग असायचे आणि निहार मित्रांच्यात बसून माझ्याकडे एकटक पहायचा. माझ्या मैत्रीणींनी त्याचे माझ्याकडे पहाने माझ्या निदर्शनास आणून दिले नाहीतर माझे त्याच्याकडे कधी लक्ष गेलेच नसते.

मलाही तो पहाता क्षणीच आवडला होता त्यामुळे त्याच्या पहाण्याला मीही दुजोरा द्यायचे. हळूहळू त्याची हिंम्मत वाढली आणि दुर बसून मला पहाणारा निहार माझ्यासाठी स्वतःही दांडीया खेळायला येऊ लागला. दांडीया खेळताना माझ्या समोर आला कि, माझ्या पेक्षा तोच जास्त लाजायचा.

Loading...

मी मंडळात दिसले कि त्याचे मित्र त्याला जाऊन मी आल्याचे सांगायचे आणि तो जिथे कुठे असेल तिथून मला पहाण्यासाठी धावत यायचा. माझे नाव काय मी कुठे रहाते त्याला काहीच माहीत नव्हते. ब-याचदा त्याने हिंम्मत करून मला माझे नाव विचारलेही पण, मी तो समोर आला कि, पळून जायचे. मलाही निहार खुप आवडायचा पण माझे त्याच्यावर प्रेम आहे कि, नाही माझे मलाच कळायचे नाही.

नुसते एकमेकांकडे पहाने असे जवळ जवळ तीन वर्षे चालू हाते नवरात्रीत एकमेकांना पहाता यायचे म्हणून आम्ही वेड्यासारखी या सणाची आतूरतेने वाट पहायचो. पुढे पुढे माझ्या लक्षात आले कि, मी त्याच्यावर प्रेम करू लागले आहे माझी भिती मेल्यावर आम्ही एकमेकांकडे पाहून हसू लागलो. कधी जर चुकून मला जायला वेळ झाला तर निहार वेड्यासारखी मला शोधत रहायचा.

आणि तो मंडळत दिसला नाही कि, मला ही अस्वस्थ वाटायचे. असे दर वर्षी व्हायचे नवरात्री यायच्या आणि जायच्या आणि आम्ही एकमेकांना काहीही बोलायचो नाही आणि नंतर मात्र पुढच्या नवरात्री पर्यंत पश्चाताप करत बसायचो. अखेर तिस-या वर्षी निहाराने मला प्रपोज केले आणि मी त्याच्या दुसचले-याच दिवशी त्याला माझा हाेकार कळवला. त्यावेळी मी अकरावीला हाते आणि निहार कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता.

असेच आमचे प्रेमाचे गाेड दिवस जात होते पुढे माझे ग्र्यज्युएशन पूर्ण झाले आणि घरात माझ्या लग्नाचा विषय सुरु झाला. निहार त्यावेळी नोकरीच्या शोधात हाेता खूप प्रयत्न करूनही त्याला कुठे नोकरी मिळत नसल्याने आम्हाला लग्न करायचे आहे असे आम्ही घरात सांगू शकत नव्हताे. शिवाय जातीचा प्रश्न होताच त्याच्या घरचे कट्टर ब्राम्हण आणि आम्ही मालवणी माश्यांशिवाय पोट भरत नाही आमचे. पण निहारवर प्रेम करू लागल्या पासून मी पुर्ण शाकाहारी झाले होते.

पण त्याच्या घरच्यांना ब्राम्हण समाजातील मुलगीच हवी होती सुन म्हणून. महत्वाचे म्हणजे त्याला नाेकरी मिळत नाही तोवर त्याच्या घरचे त्याच्या लग्नाचा विचारच करणार नव्हते आणि माझे घराचे माझ्यासाठी चांगला परमनंट नोकरी असणारा मुलगाच पहात होते. पण मी मात्र निहार शिवाय दुसऱ्या कोणासोबतही लग्णाचा विचारही करू शकत नव्हते. आणि तोही मला दुसऱ्या कोणाची होताना पाहू शकत नव्हता. अखेर मी एक युक्ती केली निहारच्या नाेकरीचे होई पर्यंत मी येणाऱ्या प्रत्येक स्थळाला नकार द्यायचे ठरवले.

काही दिवस ही युक्ती कामास आली पण माझ्या घरच्यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी माझे मत न विचारताच माझे लग्न ठरवले. ही गाेष्ट निहारका कळाल्यावर तो मला भेटायला आला. माझा नाईलाज हाेता मी निहारला मला विसरून जाण्यास सांगितले. निहार माझ्या बाबतीत खूप पजेसिव्ह हाेता मी तसे म्हंटल्या बराेबर त्याने माझा गळा पकडला आणि म्हणाला जीव घेईन तुझा माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाची झालीस तर आणि स्वतःलाही संपवेन.

मी त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले तुझ्या शिवाय मी तरी कशी कोणाची होईन रे प्लिज तू कर ना काहीतरी. निहार म्हणाला काय करू प्रणीता मलाच कळत नाही. आपण लग्न केले तर आपल्या दाघांचेही घरचे आपल्या सोबात संबंध ठेवणार नाहीत माझ्या घराचे तर मला उभे ही करणार नाहीत. शिवाय मी काहीही कमवत नाही घरच्यांच्या विरोधात जाऊण लग्न केले तरी कुठे ठेऊ तुला. मी म्हणाले मग राहूदे सगळेच आपण जिव देऊ.

जिवंतपणी नाही निदान मेल्यानंतर तरी एकमेकांचे होऊ. निहार मला जवळ घेऊण रडू लागला आणि म्हणाला किती प्रेम करतेस माझ्यावर प्रणीता. पण मी इतका स्वार्थी नाही कि, माझ्या प्रेमासाठी मी तुझे जगने तुझ्यापासून हिरावून घेईन. जा कर तू लग्न आई बाबा सागतील त्याच्यासोबत काही नाही तर निदान तूला दुरून पहाता तरी येईल. त्यादिवशी आमची शेवटची भेट म्हणून आम्ही एकमेकांच्या गळयात पडून खुप रडलो. आणि एकमेकांचा निरोप घेतला.

निहारला भेटून आल्यावर घरात माझ्या लग्नाची तयारी सुरु झाली. माझे लग्न ठराल्यापासून जवळ जवळ सहा महिने मी आणि निहारने एकमेकांना पाहीले ही नव्हते. बघता बघता लग्न महीन्यावर आले आणि अचानक निहार मला भेटायला आला. त्याने मला त्याला नोकरी लागल्याचे सांगीतले. ऐकून मला खूप आनंद झाला पण, आमच्या हातातून वेळ निघून गेली होती माझ्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या अर्ध्या निम्म्या तर वाटूनही झाल्या होत्या. तरीही निहार ऐकत नव्हता.

दुसऱ्याच दिवशी निहार आमच्या घरी आई बाबां सोबत बोलण्यासाठी आला. माझा मोठा भाऊ त्यावेळी घरातच होता त्याने निहाराचे बोलणे झाल्यावर मला विचारले तुझे काय म्हणने आहे. दादाची मला लहानपणा पासूनच खूप भीती वाटायची त्याच्या समोर माझ्या तोंडातून आवाजच निघायचा नाही. मी भितीने थरथर कापत होते. मला पाहून दादाला माझ्या मनात काय आहे ते काळाले असावे दादा निहारला माझ्या समोरच खूप मारू लागला. मी दादाला खूप समजावत होते पण त्याला त्याच्या रागापुढे काहीही ऐकू येत नव्हते.

शेवटी मी दादाला बाजूला ढकलले आणि त्याला म्हणाले, हो आहे माझेही याच्यावर प्रेम काय करणार आहेस ? मारणार का मलाही मार. मार ना तूला काय वाटले तो तूला मारू शकत नाही का ? ताे गप्प आहे ते फक्त माझ्यासाठी. आईबाबा कोणीही दादाला काहीच बाेलत नव्हते कारण दादाचा राग त्या दाघांनाही चांगलाच माहीत हाेता. दादाला माझ्यावरही खूप राग आला त्याने मला माझ्या खोलीत काेंडून ठेवले आणि निहारला मारत मारत घराबाहेर काढून टाकले.

मला काय करावे काहीच सुचत नव्हते. निहारच्या काळजीने मला कशातच मन लागत नव्हते दादाने त्याला खूप मारले हाेते. मला त्याला काही करून एकदा भेटायचेच होते निहार आणि त्याचे मित्र रात्री खूप वेळ चौकात बसायचे मला ठाऊक होते माझ्या घरचे अकरालाच झाेपून जायचे. आई माझ्या बाजूला झापालेली हाेती. तिचा माझ्या अंगावरचा हात काढून मी गुपचूप घरातुन बाहेर निघाले. त्यावेळी निहार चौकातच बसलेला होता. त्याच्या मित्राने त्याला मी आल्याचे सांगितले निहार माझ्याकडे चालत येऊ लागला त्याला नीट चालताही येत नव्हते.

त्याला तसे पाहून मला खूप रडू आला मी रडत रडतच जाऊन त्याला मिठी मारली. त्यावेळी त्यांच्यासोबत पळून जायचे माझ्या डोक्यातही नव्हते निहारने मला समजावला पुन्हा अशी संधी मिळणार नाही. त्याच दिवशी त्याच्या मित्रांच्या मदतीने आम्ही दाेघे पळून गेलाे. निहार घरी जाऊन त्याचे सर्व कागदपत्र आणि थोडे पैसे घेऊन आला. त्याचे मित्रही आमच्या साेबत आले आधी आम्ही त्याच्या मित्राच्या बहिणीच्या घरी गेलो. दुसऱ्याच दिवशी एका मंदिरात जाऊन आम्ही लग्न केले. फार वाईट वाटत हाते आईबाबा आणि दादा शिवाय लग्न करणे पण, ते काेणीच आम्हाला समजूनच घेत नव्हते.

निहार शिवाय मी काेणाचाही विचार सुद्धा करू शकत नव्हते. निहारच्या मित्राच्या बहिणीच्या घरी राहूनच आम्ही दुसरीकडे भाड्याने घर पाहीले आणि काही दिवसातच आम्ही त्याघरी रहायला गेलाे. दाघांचेच पण छान हाते घर आमचे. बघता बघता वर्ष गेले स्थीर होईपर्यंत बाळाचा विचार नाही करायचे असे ठरवले हाते आम्ही.

पुढे मी अधून मधून आई सोबात फोन वर बोलू लागले. काही दिवसांनी आईबाबा माझ्या घरीही येऊ लागले. दादाला एक दिवस शंका आली आणि तो आईबाबांच्या मागे मागे माझ्या घरी आला. अचानक त्याला समोर पाहून भीतीने माझ्या हातापायातून जीव गेल्यासारखे झाले. आई बाबा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत हाेते. दादा माझ्या दिशेने चालत येऊ लागला आणि जे कधी स्वप्नातही वाटले नव्हते ते घडले.

दादाने मला प्रेमाने जवळ घेतले आणि तो खुप रडू लागला, आणि म्हणाला दादाची जराही आठवण आली नाही ना तूला ? दादा असा म्हणल्या बरोबर मीही रडू लागले त्यादिवशी मी खूप खुश हाेते माझे हरवलेले सर्व मला परत मिळाले सर्व छान सुरु होते अगदी माझ्या मनासारखे.

माझ्या प्रेमा सोबत माझी माणसॆही मला मिळाल्यामुळे मी खुप खुश होते. पण सगळे भेटल्यापासून माझे निहारकडे जरा दुर्लक्ष होऊ लागले. निहार तसातर मला काही बोलायचा नाही पण सतत चिडचीड करायचा माझ्यावर. मला जे आवडत नाही ते मुद्दाम करायचा. मला पसारा आवडायचा नाही म्हणून मुद्दाम पसारा करायचा. कामावरून आल्यावर बॅग सोफ्यावर फेकून द्यायचा. सोक्स इकडे तिकडे टाकायचा. त्याची कोणतीही वस्तू निट जागेवर ठेवायचा नाही.

त्यावरून मी काही बोलायला गेले तर खुप वाद घालायचा. किरकोळ वादाचे पुढे भांडणात रुपांतर व्हायचे. खरे तर हे सर्व तो एकटा पडू लागल्यामुळे होत आहे हे माझ्या लक्षातच आले नाही. निहारचे आई बाबा खुप शिष्ठ होते. ते निहारला कधीही माफ़ करणार नाहीत हे निहारला ठाऊक होते शिवाय निहार स्वतः खुप हट्टी होता तो स्वताहून त्यांच्याकडे कितीही सांगीतले तरी जायचा नाही.

मला काही करून आमचे नाते पुन्हा पहील्या सारखे करायचे होते म्हणून, मी खूप वेळा त्याच्या समोर बसून त्याच्या साेबत बाेलण्याचा प्रयत्नही करायचे आमचे नाते सुधारण्याच्या दृष्टीने पण, त्याचा काहीही उपयाेग व्हायचा नाही. बोलता बोलता अचानक आमच्या वागण्याचे खापर आम्ही एकमकांवर फाेडून पुन्हा भांडू लागायचाे.

हे सर्व असह्य हाेऊ लागल्यावर मी आईच्या कानावर घातले. माझी आई थाडी देवभोळ्या स्वभावाची हाेती ती मला ब्राम्हणाकडे घेऊन गेली. तिथे आम्ही आमच्या दोघांच्या पत्रीका बणवून घेतल्या. त्यानंतर ब्राम्हणाने आमच्या पत्रिका जुळवून पाहील्यावर सांगितले कि, निहार आणि माझे नाते आयुष्याच्या शेवटापर्यंत जाणार नाही. भांडणे होतच रहणार आणि एकदिवस या भांडणात आमच्या पैकी कोणा एकाचा जीव जाणार. माझे निहारावर खूप प्रेम होते पण ब्राम्हणाने सांगीतल्या पासून मला खूप भीती वाटू लागली होती. मला माझा जीव जाण्याची आजीबात पर्वा नव्हती पण, निहारला काही झाले तर? या कल्पनेने मला खूप अस्वस्थ वाटायचे.

सतत तोच तोच विचार करून माझे कशातही मन लागायचे नाही. राेजची भांडणे मात्र तशीच चालू होती. शेवटी थकून मी एकदिवस निहारला घटस्पाेटा बाबत बालले. मी असे बोलल्यावर निहार माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. आणि म्हणाला अरे वाह छान काय झाले उतरले प्रेमाचे भुत कि, तुझ्या घरचे भेटल्यामुळे आता माझी गरज नाही राहीली. माझ्यात त्याच्या साेबत पुन्हा वाद घालण्याचे अजिबात त्राण नव्हते मी त्याला म्हणाले तूला जे समजायचे ते समज पण मला आता नाही रहायचे तुझ्या सोबत.

निहारने माझा गळा आवळला आणि म्हणाला वाट लावलीस प्रणीता तू माझ्या आयुष्याची. खुप पश्चाताप होतो आहे आज मला तुझ्यासोबत लग्न केल्याचा. तुझ्यासाठी आई बाप घरदार साेडून आलो याचीच शिक्षा आहे ही. पण ठीक आहे तुझी हीच इच्छा आहे तर देताे मी तुला घटस्पोट हो मोकळी.

त्यादिवशी नंतर आम्ही एकमेकांसाेबत बोलणेही सोडून दिले. एका घरात राहूनही आम्ही परक्यासारखे राहू लागलो. घटस्पाेट फाईल केल्यानंतर काेर्टाच्या आदेषानुसार आम्हाला सहा महिने एकत्र रहायचे हाेते. मजबूरी म्हणून आम्ही एकत्र राहू लागलो. तेव्हा खूप वेळा असे व्हायचे की नकळत आम्ही एकमेकांच्या जवळ यायचाे पण, नंतर घटस्पोटाचे लक्षात यायचे आणि आम्ही वेगळे व्हायचाे.

खूपदा वाटायचे त्याने मिठी साेडून जाताना त्याला पकडून त्याच्यात पुन्हा आधी सारखेच विरघळून जावे. पण, ब्राम्हणाने सांगीतलेले सर्व आठवायचे आणि मी माझ्या भावनांना आवरते घ्यायची. निहारची अवस्था काही वेगळी नव्हती त्याचीही खूप इच्छा व्हायची तेव्हा मला मिठीत घेऊन माझ्यावरती पुन्हा पाहील्या सारखे प्रेम करण्याची पण जवळ येता येता त्याच्या लक्षात यायचे कि, मी त्याला घटस्पोट मागीतला आहे आणि तिरस्काराच्या नजरेन तो माझ्याकडे पाहून माझ्यापासून दूर व्हायचा.

एकमेकांसमोर असूनही असे रहाणे अगदी असह्य वाटू लागले हाेते. हे सर्व तेव्हाच संपणार हाेते जेव्हा आम्ही एकमेकांपासून वेगळे हाेऊ
अखेर ते जीव घेणे दिवस संपले आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत पाहून कोर्टाने आमचा घटस्पोट मंजूर केला. आमचे लग्न झाल्यानंतर निहार त्याच्या घरी कधीही परत गेला नाही ना त्याने काेणाशीही संबंध ठेवले.

घटस्पोट घेताल्यावर मी आईकडे जाऊन राहू लागले. पण निहार शिवाय कशातही मन लागायचे नाही. माझ्याकडे घराची दुसरी चावी हाेती असेच एकदिवस मनात आले निहार कामला जातो त्यावेळी घरी जावे. आणि माझ्या स्वप्नातील त्या घराला मनसोक्त पाहून यावे. दुपारच्या वेळी मी त्या घरी गेले तेव्हा निहार घरात नव्हता. मी दरवाजा उघडून आत गेले घरात कसलातरी कुबट वास येत हाेता. पसारा तर असा केला हाेता जसा काय कि, असे करून बदला घेत आहे माझा.

सगळे कपडे अस्थाव्यस्थ पडले हाेते त्याचे. घरात साधा झाडूही मारला नव्हता. घराची अवस्था पाहून मला तिथे क्षणभरही थांबवत नव्हते. त्यानंतर मीे गॅलेरी मध्ये गेले. माझी सर्व झाडे सुकून गेली हाेती झाडांकडे पाहील्यावर मात्र मला रहावले नाही. म्हंटले काही नाही तर निदान झाडांना पाणी तरी द्यावे म्हणून मी पटकन झाडांना पाणी घातले. तितक्यात दरवाजाचा आवाज आला मी गॅलेरीमधेच लपून राहीले. निहार आला होता त्याने दरवाजा उघडला आणि आत आला त्यादिवशी निहार खूप प्यायला हाेता.

नशेमधे ताे माझ्या नावाने काहीही बडबडत हाेता त्याचे वागणे पाहून मला हसू कि, रडू काहीही कळत नव्हते. निहारने आल्या आल्या घरात त्याची बॅग साफ्यावर फेकून दिली आणि वेड्यासारखा एकटाच बडबडत हाेता. म्हणत होता साला नुसती पीर पीर पीर पीर घे टाकली बॅग आता मी कुठेही काय करणार ? नाही काढणार साॅक्स मी काय करणार ? नुसती हुकूमशाही करायची बर झाल गेली सोडून हा……. मस्त वाटत आहे.

काेणाच एक नाही ना दोन नाही. मी आणि माझी लाईफ असे म्हणून ताे तसाच बेडवर आडवा झाला. मला फार वाईट वाटले मी घरातून जाऊनही त्याच्यात काहीही बदल झाला नव्हता निहारला झोप लागल्यावर मी घरातून गपचूप निघून गेले. निहारच्या मनातील माझ्या बद्दलचा राग पाहून मलाही फार राग आला. त्यानंतर मी आमच्या दाघांचे ते घर जे कि, आता फक्त निहारचे राहीले हाेते त्याकडे फिरकले ही नाही.

पुढे काही दिवसांनी दादाचेही लग्न झाले. दादा आणि वहीणीला त्यांच्या आयुष्यात आनंदात पहाताना मला फार वाईट वाटायचे आणि निहारची आठवण यायची. मला माझे आणि निहारचे छान छान दिवस आठवायचे. आईने माझा चेहरा बराेबर वाचला आणि ती मला म्हणाली, प्रणाली बेटा किती दिवस अशीच रहाणार? आता तूही तुझ्या भविष्याचा विचार करायला पाहिजेस. मी आईकडे पाहीले आणि म्हणाले म्हणजे? काय म्हणायचे आहे तूला स्पष्ट बाेल! आई म्हणाली तू दुसऱ्या लग्नाचा विचार करायाला हरकत नाही आता.

असे एकटीने आयुष्य कडेला नाही जात बाळा. निहारनेही एव्हाना लग्न केले असेल. कोण कोणासाठी रहात नाही बाळा.आई असे बोलल्यावर मला खूप कसे तरी वाटले. त्यावेळीही मी स्वतःला आवरू शकले नाही आणि मी पुन्हा एकदा निहारच्या अनुपस्थीत घरी गेले त्याचे काय चालले आहे ते पहाण्यासाठी.

मी गेले तेव्हा घर खूप बदलले हाेते घरात अगदी मी ठेवायचे तशीच स्वच्छता हाेती. मी पटकन गॅलेरीमध्ये जाऊन पाहीले तर माझी सर्व झाडेही छान टवटवीत झाली हाेती आणि त्या झाडांत काही नवीन झाडांचीही भरती झाली हाेती. क्षणभर मला काही कळतच नव्हते. कारण मला चांगलेच ठाऊक हाेते निहाराला बाग सजवण्याचे जराही वेड नव्हते. मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. निहारने नाही तर मग काेणी? आणि घर इतके छान फक्त एक बाईच ठेऊ शकते.

निहारने खरच लग्न तर केले नसावे. तितक्यात किचन मधून बांगड्यांचा आवाज आला मला रहावले नाही मी किचनकडे गेले किचनमध्ये एक माझ्याच वयाची गाेरी पान बाई जेवण बनवत हाेती. तिला पाहून माझ्या पायाखानची जमीन सरकलीआणि माझा स्वतःवर ताबा राहीला नाही मी थेट जाऊन रागानेच तीला विचाराने काेण ग तू ? तीही माझ्या साेबत उद्धटपाने बाेलू लागली मला म्हणाली आधी तू काण ते सांग आणि आमच्या घरात कशी काय घुसलीस?

मी म्हणाले, वा ग वा तू माझ्या घरात घुसली कि, मी तुझ्या आमच्या दाेघींच्यात खूप बाचाबाच झाली तिने मला हाताला पकडून घराबाहेर काढले. मी रागाने लालबूंद झाले हाेते काय करू काय नको काही सुचत नव्हते. निहारचा तर खूप राग येत हाेता त्यावेळी निहार समोर असता तर जिव घेतला असता मी त्याचा. क्षणभरासाठी मी विसरून गेले हाेते कि, आमचा घटस्पोट झाला आहे.

मी निहार शिवाय कधीच काेणाचा विचार करत नव्हते आणि ताे कसा काय असे करू शकताे या विचाराने मनाची नुसती तगमग हाेत हाेती. निहार येई पर्यंत मी तिथेच बसून राहीले मला त्याला जाब विचारायचाच होता. काही वेळाने निहार आला.

मी दरवाजातच त्याला बडबड करू लागले. निहार म्हणाला, बाहेर तमाशा करू नको तूला जे काही बाेलायचे आहे ते घरात येऊन बाेल. मी घरात गेले ती निहाराचा आवाज ऐकून बाहेर आली आणि झाला प्रकार त्याला सांगू लागली.

निहार तीला म्हणाना तू कशाला ऐकून घेतालेस मला फोन करायचास ना! ती म्हणाली जाऊद्या हाे अश्या बायकांना सरळ करायला येते मला उगाच एवढ्याश्या गाेष्टीसाठी कशाला तुम्हाला त्रास म्हणून नाही केला फाेन. मला खूप रडू येऊ लागलेे. त्या रागामधे मी निहारला काहीही कसेही बाेलू लागले.

तू फसवलेस मला माझ्या आयुष्याची माती केलीस तू. निहार म्हणाला काय फसवले मी तूला घटस्पोट झाला आहे आपला आता. मी काहीही करेन आता त्याच्याशी तुझा काय संबंध ? निहार तसॆ बोलल्यावर माझ्याही लक्षात आले अरे हाे आता माझा काय संबंध तो तरी तरी का एकटा राहील ना आता. मी त्याची आणि तिची माफी मागून जायला निघाले.

जे काही चालू होते ते पाहून तिच्या सर्व लक्षात आले. आणि ती निहारला म्हणाली साहेब मी पण जाते माझी सर्व कामे संपाली आहेत. मी डोळयातील पाणी पुसत पुसत निहाराकडे आश्चर्याने पहातच राहीले. आणि ति बिचारी खाली मान घालून घरातून निघून गेली. निहार हाताची घडी करून गालातल्या गालात हसत होता.

मी निहारला म्हणाले हसतोस काय वेड्यासारखा, ती बाई ? निहार म्हणाला काम वाली आहे माझी. मला खूप लाजल्यासारखे झाले काय बाेलावे काय नाही काहीच कळत नव्हते. आम्ही दिघेही एकमेकांकडे पाहून हसू लागलो. थोड्यावेळामे निहार माझ्याकडे चालत चालत आला आणि माझ्या खुप जवळ येऊन म्हणाला तू इकडेकशी ? नजर चोरून थोडीशी मागे जाऊण मी म्हणाले, सहजच आले हाेते माझे काही सामान राहीले हाेते इथे ते घ्यायचे हाेते.

निहारने मला घरात जाण्यासाठी वाट दिली आणि म्हणाला ठिक आहे ? जा मग घे जे हवे आहे ते. मी खाेट बाेलत हाेते हे निहारलाही ठाऊक हाेते.

मला काय घ्यावे ते कळत नव्हते. मी उगाच बेडरूममधे जाऊन काहीतरी शाधू लागले. थाड्यावेळाने निहारही आत आला आणि म्हणाला, मिळाले का जे हवे हाेते ते मी म्हणाले नाही शोधात आहे. शाेधता शाेधता मी निहारला म्हणाले घर छाान ठेवले आहेस.

निहार म्हणाला हाे घरात एकटाच असताे ना म्हणून वेळ जाण्यासाठी घर आवारात बसताे. तसेही घर छान असेल तर मनालाही प्रसन्न वाटते.

मी म्हणाले हो ना. बागेतही नवीन जाडे लावली आहेत. निहार म्हणाला हो या घरात फक्त ती झाडे आणि मीच सजीव आहे त्यांना जगताना पाहून, त्यांना नवी पालवी फुटताना पाहून, त्यांना फुले आलेली पाहून खूप छान वाटते मला आणि कसे आहे तू गेल्यापासून मी त्या झाडांकडे पहातच नव्हताे सुकत चाललेली बिचारी तरीही मला त्यांची दया येत नव्हती आणि शेवटी झाडेच थकून गेली माझी वाट पाहून पाहून आणि एक दिवस त्यांनी स्वतःच स्वतःला पाणी टाकून घेतले. माझ्या लक्षात आले कि, निहारला मी घरात येऊन गेल्याचे कळाले हाेते.

मी नजर चोरून घरातून निघू लागले निहारने माझा हात पकडला आणि म्हणाला प्रणीता नकाे जाऊस मला गरज आहे तुझी. तू गेल्यावर मला तुझी खऱ्याअर्थाने किंमत कळाली. मी नाही ग जगू शकत तुझ्याशिवाय तू गेल्यापासून राेज तूला हवे तसे वागण्याचा प्रयत्न करताे. बघना तूला नाही का जाणवत किती बदललाे आहे मी ते.

पुन्हा नाही मी तसा वागणार मला माफ कर. मी म्हणाले त्याचा काहाही उपयाेग नाही निहार. एका ज्यातीषाने मला सांगीतले आहे आपले कधीही पटणार नाही.

आपले नाते आयुष्याच्या शेवटापर्यंत जाणार नाही आणि आपण एकत्र राहीलो तर आपल्यातील कोणा एकाचा जीव जाणार. निहार म्हणाला त्या ज्योतीषाच्या तर आईचा घो… वेडी आहेस का तू काय काेणत्याही बाबा वर विश्वास ठेवतेस. काय म्हणाला ताे बाबा आपले पटणार नाही विसारलीस का काही दिवसांपूर्वी आपण एकमेकांशिवाय रहात नव्हताे.

लग्ना आधीचे दिवस आणि त्यांनतरचे काही दिवस आपण किती छान रहात हाेतो. आणि काय म्हणाला तो आपले नाते शेवटापर्यंत जाणार नाही का नाही जाणार आपण अजिबात भांडायचे नाही मीच नाही भांडणार तू समजदार आहेस मीच वाईट हाेताे.

पण मी सुधारलो आहे ना आता आपल्यात वादच झाले नाहीत तर का नाही जाणार आपले नाते शेवटाला? आणि काय म्हणाला ताे बाबा आपल्यातील कोणााचा तरी मृत्यू निश्चित आहे तू बराेबर असताणा माहीत नाही पण, बराेबर नसशील तर नक्कीच मरेन मी. तुझ्या साेबत प्रेमाणे रहाताना तुझ्या समाेर मरण आले तर ते कधीही येऊदे मला ते मान्य आहे.

काेणाच्याही सांगण्यावरून अशी मला साेडून जाऊ नकाे खुप असह्य हाेते मला तुझ्याशिवाय जगणे. मी निहारच्या हातातून माझा हात साॆडवला आणि घरातून बाहेर जाऊ लागले.

निहारने पुन्हा मला आवाज दिला ए साेना प्लिज ना…मी दरवाजा उघडला आणि बाहेर पडण्याआधी पुन्हा एकदा मागे वळून पाहीले तर निहारच्या दाेन्ही डोळ्यातून अश्रू वाहत हाेते. मी दरवाजा पूर्ण उघडला आणि पाऊल बाहेर टाकताना क्षणभर थांबून जोरात दरवाजा बंद केला आणि मागे वळून दोन्ही हात पसरून निहारकडे पाहीले निहार तसाच धावत आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली आणि रडू लागला आणि म्हणाला thanku thanku thanku आणि प्लिज आता मला कधीही सोडून जाऊ नकाे मी नाही जगू शकणार तुझा शिवाय.

त्यादिवशी नंतर आम्ही पुन्हा एकत्र राहू लागलो. घटस्पोट घेतल्यामुळे आई बाबांनी पुन्हा एकदा आमचे लग्न लावून दिले. चला या निमित्ताने आई बाबांची माझे कन्यादान करण्याची इच्छा तर पुर्ण झाली. आज आम्हाला दाेन मुलेही आहेत. एकत्र रहाताे त्यामुळे आमच्यात अगदीच भांडणे हाेत नाहीत असे नाही म्हणता येणार.

अधून मधून छाटी माेठी धुसपूस चालू असते पण, ती तेवढ्या पुरती निहार लगेचच सर्व सावरून घेताे. बिचारा कधी कधी मलाच वाईट वाटते जराही माझ्या मनाविरूद्ध वागत नाही तो. थोडे मजेशीर आहे पण कधी कधी वाटते मला कि, त्याने माझ्यासोबत कडाक्याचे भांडण करावे. आणि मी रुसून बसावे आणि त्याने प्रेमाणे माझी समजूत काढावी.

पण, तसे नाही होत भांडणे तर दुर तो वेडा आवाज चढवून बोलतही नाही माझ्या सोबत. एकंदरीत काय ग्रह तारे मानावेत पण ते आपल्या साेई नुसार मनातील शंका काढाव्यात पण त्यामुळे मन विटवून नाही घ्यावे. नाती टिकवणे, ती संभाळने, त्यांना आयुष्याच्या शेवटापर्यंत न्हेने हे केवळ माणसाच्या हातात असते कुंडल्या मिळवून देवा ब्राम्हणांच्या साक्षीने केलेली सगळीच लग्ने यशस्वी हाेतातच असे नाही ना अगदी तसेच….

तूझ्या पासून दुर गेल्यावर तुझी किंमत कळाली,

तूला पुन्हा मिळवून मात्र हरवलेली मीही मला पुन्हा मिळाली.

गैरसमजाच्या विळख्याने दुरावत चालले होतो,

स्वतः पुरते जगता जगता एकमेकांचॆ जराही उरलॆ नव्हतो….

वेळच अशी होती कि,एकमेकांना एकमेकांची कदरच नव्हती,

तेव्हा मात्र कळाले नाही,खुप कठीन होईल मिळवने एकदा गमावलेली नाती….

फार वाटायचे तेव्हा जगू शकतो आपण एकमेकांपासून दुर जाऊन,

पण गेलेले आयुष्य मिळते कुठे एकदा जिवशी खेेळून…

वेडी होते मी कि, ग्रह ता-यांना घाबरून तूझ्या पासून दूर गेले

कशी सांगू तुझ्या शिवायचे ते क्षण कसे त्या जिवघेण्या एकांतात जगले.

तू मात्र झुरत राहीलास माझ्या आठवणींत माझा होऊण

माझा नाईलाज असला तरी मी तरी कुठे आनंदात जगले तुझ्यापासून दूर जाऊण…

हरवलेल्या जगातून तू घेऊण आलास मला तुझी होण्यासाठी

अण बघता बघता पुन्हा जुळाल्या त्या नाजूक रेशीमगाठी

विस्कटून मात्र पुन्हा एक झालो आणि एकमेकांचॆ होऊण गेलो,

ग्रह ता-यांवरही मात करून जन्मोजन्मीचे सोबती झालो…

Please follow and like us:

Leave a Reply